शेंगदाण्याची पोळी

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
१ वाटी दाण्याचे कूट, २ वाट्या बारीक चिरलेला गूळ, २टेस्पून डाळीचे पीठ, १ टेस्पून भाजलेल्या खसखसशीची पूड थोडी वेलची पूड, थोडी जायफळ पूड, १ टेस्पून डालडा, २ मोठ्या वाट्या कणीक, ४ चमचे तेल व मीठ

कृती :

कणीक, तेल व मीठ एकत्र करून पुऱ्यांसाठी भिजवतो तसे पीठ भिजवावे. सारणासाठी गूळ, दाण्याचे कूट, खसखशीची पूड, वेलची पूड, जायफळ पूड सर्व एकत्र करावे. डाळीचे पीठ तुपावर भाजून घ्यावे व सारण तयार करावे व गुळाच्या पोळीप्रमाणे पोळया कराव्यात.

Hits: 836
X

Right Click

No right click