श्रीखंडाची पोळी

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
एक वाटी चक्का, तीन वाट्या साखर, अर्धे जायफळ, रंग येण्यापुरते केशर अगर खाण्याचा केशरी रंग, रवा व मैदा प्रत्येकी एक वाटी, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी, ५-६ वेलदोडे.

कृती :
चक्का व साखर एकत्र करून मऊसर गोळा होईपर्यंत आटवावे. आटवून झाल्यावर तो गोळा चांगला मळावा. त्यात केशर (खलून) अथवा खाण्याचा रंग घालावा व जायफळाची पूड करून घालावी. तेल व मीठ घालून रवा व मैदा चांगला घट्ट भिजवावा व नंतर गोळा चांगला कुटून मऊ करून घ्यावा. गुळाच्या पोळीप्रमाणे दोन रव्या-मैद्याच्या गोळया व त्यांपैकी एका गोळीपेक्षा किंचित जास्त श्रीखंडाची गोळी घ्यावी व गुळाच्या पोळीप्रमाणेच पातळ पोळी लाटून भाजावी. आंबट-गोड चवीमुळे ही पोळी खाण्यास चांगली लागते.
Hits: 401
X

Right Click

No right click