९३ वे अ. भा. संमेलन, उस्मानाबाद
संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो
१०, ११ आणि १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबादमध्ये ९३ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची संमेलनाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
भाषणात, ‘सहनेतेत ेसाहित्य’ अशी जीवनाधारित व्याख्या मान्य करून साहित्य आणि जगणे यांचा संबंध त्यांनी स्पष्ट केला. महाश्वेतादेवी, नयनतारा सहगल, दुर्गा भागवत या स्पष्टवक्त्या तिघींची नावे त्यांनी घेतली आणि दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेआणि गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्याचा दाखला त्यांनी अभिव्यक्ति स्वातंत्र्यासंदर्भात दिला.
जमावाकडून, गायीच्या नावाने विशिष्ट धर्मीयांच्या केल्या जाणाऱ्या हत्या हा सावरकर-विचारांचा पराभवच असल्याचे त्यांनी सूचित केले.
सरकारने पुतळ ेउभारण्याऐवजी साहित्यसंमेलनाला पुरेसेअनुदान द्यावे, अशी अपेक्षा दिब्रिटोंनी छापील भाषणात व्यक्त केली.
पर्यावरण रक्षणासाठी संवाद दिब्रेटोनीं चार पातळ्यांवर सूचित केला. देवाशी किंवा परमतत्त्वाशी, निसर्गाशी, माणसांचा एकमेकांशीआणि प्रत्येकाचा स्वत:शी.
पालकांना मार्गदर्शन करणे, परीक्षेतील गुणांनाच सर्वस्व समजण्यातून आलेल्या टय़ूशन संस्कृतीला बोल लावणे, मराठीप्रेमींना दिलासा देणे, ‘भाषाशुद्धी की भाषावृद्धी?’ असा प्रश्न उभा करून मराठीच्या बोलींचाआदर करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
Hits: 96