९२ वे अ. भा. साहित्य संमेलन -

संमेलनाध्यक्ष अरुणाताई रामचंद्र ढेरे

डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय या संस्थेने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविले. 

लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण अनुचित पद्धतीने रद्द करणे ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब होती. आयोजकांकडून ही गंभीर चूक घडल्याचे आम्हाला मान्यआहे. मराठी साहित्य संमेलन साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जातेय, हे आयोजकांनी वेळीचओळखले नाही. त्यानंतरसाहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशांपुढे आयोजकांनी नमते घेतले. ही गोष्टआपल्याला शोभत नाही, असे परखड मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. 

वयाची नव्वदी पार केलेल्या नयनतारा सहगल इतक्या दूर संमेलनाला येणार होत्या. त्यांना याठिकाणी मोकळेपणाने त्यांचे विचार मांडू द्यायला पाहिज ेहोते. हे विचार आपल्या विवेकबुद्धीने स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आपल्याला होते. मात्र, आपण या सगळ्याकडे त्यादृष्टीने पाहू शकलो नाही. संमेलन ही भाबड्या वाचकांना भडकावण्याची जागा नव्हे. आपण भले सामान्य असू, पण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसेआहोत. त्यामुळे स्वत:च्या शक्तीवर विश्वास ठेवून असे प्रकार घडू न देणे, ही आपली जबाबदारी असल्याची आठवण अरुणा ढेरे यांनी साहित्यिक आणि वाचकांना करुन दिली.

तसेच विचारवंतांनी कायम सावध राहणे गरजेचे आहे. इतिहास मोठा आह ेअभिमास्पद आहे, मात्र, वेदनादायी आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. भविष्य महत्त्वाचं आहे माणूसआणि माणुसकी मोठी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कलावंत आणि साहित्यिकांच्या बाबतीत मृत गोष्टी गळून पडल्या पाहिजेत, जुने विचार, जुन्या जाणीवा साहित्यिकांनी झटकून टाकल्या पाहिजेत. आपल्या संवेदना कोरड्या पडू नयेत याचीही काळजीही साहित्यिकांनी घेतली पाहिजे. कोणत्याही तत्त्वज्ञानाशी साहित्यिकाची बांधिलकी नसते. साहित्यिकाशी बांधिलकी त्याच्या जगण्याशी असते. कलेच्याद्वारे येणारा मुक्ततेचा अनुभव हा कलाकाराचा ध्यास असतो असेही मत ढेरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.

Hits: 90
X

Right Click

No right click