६९. आळंदी १९९६ - शांताबाई शेळके
रसिकांना जसे साहित्य आवडते तसे साहित्यिकांना बघायला, त्यांच्याशी संवाद साधायलाही आवडते. यादृष्टीने साहित्य संमेलनांची उपयुक्तता निर्विवाद आहे. मराठी साहित्याचे क्षेत्र आज विस्तारत आहे. पांढरपेशा, मध्यमवर्गीय, शहरी साहित्याचा केंद्रबिंदू आता बदलला आहे. अनेक नवे प्रवाह मरा कोणतीही केवळ नक्कल साहित्यात यशस्वी होत नाही. प्रत्यक्ष अनुभवातूनच माणूस शिकतो. अनुभवाला सामोरे जाताना केवळ एक स्त्री किंवा एक पुरुष म्हणून न जाता एक माणूस म्हणून सामोरे जावे. वाङ्मयाला कुंपण घालू नये. आभाळापेक्षा मी मातीवर प्रेम करते. मराठी भाषा ही कधीच पूर्णत: संपून जाणार नाही. वारकरी संप्रदाय, लोकसाहित्य इत्यादीमुळे ती निश्चितच टिकून राहील. संस्कृतचा सुंदर वारसा आपण सोडला खरा. ही भाषा मला मुळीच मृतवत वाटत नाही. पण संस्कृतमध्ये काव्य आहे तत्त्वज्ञान आहे. आपण आपला संस्कृतचा वारसा दुर्लक्षितो आहोत, हे दुर्दैव आहे. आपण ज्या भूमीवर आहोत त्या भूमीखाली संपन्न धन आहे याची जाणीवही नसणं हे अभागीपणाचे लक्षण आहे. आपल्याला आपल्या मातृभाषेबद्दल न्यूनगंड वाटणे अत्यंत गैर आहे. आम्ही इंग्रजीच्या विरोधात नाही. पण घरात मराठी व बाहेर इंग्रजी हा त्यावर उपाय असू शकतो. आजी ही पूर्वी सुंदर संस्था होती. ती नातवंडांवर भाषेचे संस्कार करीत असे. शेवटी भाषा ही एक सवय, संस्कार आहे.
Hits: 386