६८. परभणी १९९५ - नारायण सुर्वे
Category: संमेलने ६१-७०
समीक्षणाच्या प्रचलित फुटपट्ट्या जर नवीन प्रवाह जोखण्यात कमी पडत असतील तर मानदंड बदलायला हवेत यात शंकाच नाही. पण नुसती आक्रस्ताळी भूमिका घेऊन चालणार नाही आणि एखाद्यानं भोगलंय म्हणून त्याचं साहित्य ते उत्तम यातही काही अर्थ नाही. साहित्यगुण, प्रतिभा या गोष्टी या सार्‍यापेक्षा वेगळ्या आहेत. ज्यांना भोगावं लागलंय असे खूप निघतील. पण केवळ भोगलंय म्हणून कोणी तुकाराम होत नाही.
Hits: 346