८. अकोला १९१२ - हरि नारायण आपटे
Category: संमेलने १-१०
मराठी भाषा संपन्न करण्यासाठी युरोपीय व इंग्रजी वाङ्मयभांडारे लुटली पाहिजेत. मराठी भाषा व वाङ्मयाचे वैभव वाढावे असे स्वप्न बाळगणारा हा खरा श्रेष्ठ लेखक. वाङ्मयाची उद्दिष्टे -
१) शिक्षण देणे
२) मनोविकार किंवा विचार जागृत करणे
३) मनोरंजन करणे.
वाङ्मय हे राष्ट्राच्या उन्नतीचे कारण आहे आणि कार्यही आहे. वाङ्मयाच्या योगाने आमची विचारसरणी उद्दीप्त होते, आमचे मनोविकार जागृत होतात, आमचे अंत:करण उल्हसित होते..