७. बडोदा १९०९ - का. र. कीर्तीकर
Category: संमेलने १-१०
शास्त्रविषयक व कलाविषयक ग्रंथ देशी भाषांतून झाले तरच ज्ञानप्रसार होऊ शकेल. कवि म्हणजे सद्य स्थितीचे चित्रकार, भावी स्थितीचे प्रवक्ते व प्रेम, आशा, धैर्य इत्यादी मानससंपत्तीचे उदार दाते होत. मनोरंजन हो काव्याचे अंतिम कार्य नसावे. उत्तम मनोधर्मांचे पोषण हे काव्याचे अंतिम कार्य होय. एखाद्या माकडाला नटविणे हा जसा संपत्तीचा दुरुपयोग आहे तसाच भलत्यासलत्या विषयावर कविता करणे हा बुद्धीचा दुरुपयोग आहे. जे सुंदर नाही त्यावर गाणी रचणारा कवीच नाही.
Hits: 423