तुळशीचं लगीन

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ५.प्रासंगिक Written by सौ. शुभांगी रानडे


वर्हागडी कोण कोण येणार
आमच्या तुळशीचं लगीन ---- १

दादा म्हणे मी मोठा
धरीन अंतर पाटा
आमच्या तुळशीचं लगीन ---- २

छोटू म्हणे मी छोटा
कामे करु पटापटा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ३

ताई म्हणे मी ताई
मेंदी लावीन बाई
आमच्या तुळशीचं लगीन ---- ४

काका म्हणे मी काका
उडवू लग्नाचा दणका
आमच्या तुळशीचं लगीन ---- ५

मामा म्हणे मी मामा
करीन पडेल त्या कामा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ६

मावसा म्हणे मी मावसा
म्हणेन सार्यार या बसा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ७

आजा म्हणे मी आजा
म्हणेन पेढे खा जा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ८

बाबा म्हणे मी बाबा
पैशाची काचकुच नायबा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ९

काकू म्हणे मी काकू
लावीन हळदी कुंकू
आमच्या तुळशीचं लगीन ---- १०

मामी म्हणे मी मामी
सांगीन युक्त्या नामी
आमच्या तुळशीचं लगीन ---- ११

मावशी म्हणे मी मावशी
सार्यांमची करु चौकशी
आमच्या तुळशीचं लगीन ---- १२

आजी म्हणे मी आजी
पंगत वाढीन खाशी
आमच्या तुळशीचं लगीन ---- १३

आई म्हणे मी आई
डोळा पाणी येई
आमच्या तुळशीचं लगीन ---- १४

वर्हााडी सगळे येणार
आमच्या तुळशीचं लगीन ---- १५

Hits: 154
X

Right Click

No right click