आंबामोहोर
आला चैत्र हा दारी लागे आंबा मोहरू
मोहराचा गंध आसमंती ये भरू . . . ध्रु.
पानोपानी आंबा हा कैसा डवरुनि येई
आम्रतरूवरी मंजुल कोकिलकूजन होई सुरू . . . १
मंद वात सुटता झुळूक गोडशी येई
आम्रमंजिरीसंगे भ्रमरगुंजारव हो सुरू . . . २
किमया देवाजीची ही पाहुनि मनमोहित होई
आनंदाने मनमोराचे नर्तन होई सुरु . . . ३
Hits: 140