प्रकरण ५ - नमुन्यांचे विश्लेशण

Parent Category: मराठी पुस्तके Category: पाणी - जीवन Written by सौ. शुभांगी रानडे

या दोन्हीही विश्लेषणांचे यश पाण्याचा जो 'नमुना ' घेतला जातो त्या नमुन्यावर अवलंबून असते. ज्या पाण्याची पारख करावयाची त्या पाण्यात आणि गोळा केलेल्या नमुन्यात गुणवत्तेच्या बाबतीत अभेदत्व असेल तरच त्या विश्लेषणास अर्थ प्राप्त होईल. म्हणजेच नमुना गोळा करतेवेळी पारख करावयाच्या पाण्याचा तो नमुना ' प्रातिनिधिक' असला पाहिजे व त्याकरता खबरदारी घेण्याची आत्यंतिक गरज असते. विश्लेषण पद्धती वापरण्यातील अचूकता अगर 'परिकलनातील़ ' अचुकता, यांच्यापेक्षा नमुना गोळा करण्याच्या पद्धतीतील अचूकतेवर अधिक भर द्यावा लागतो. यासाठीच कोणत्याही पाण्याचे विशेषण करत असताना केवळ एकाच नमुन्यावर विसंबून न राहता एकाच पद्धतीने एकाच जलाशयातून एकावेळी व निरनिराळ्या वेळी गोळा केलेल्या दोन, तीन किवा अधिक नमुन्यांच्या विश्लेषणांचे निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहण्यात येतात. त्यासाठी 'सांख्यिकीय विश्लेषण' पद्धतीचा उपयोग करण्यात येतो.

रासायनिक विश्लेषण पद्धती :
या पद्धतीसाठी गोळा करावयाचा नमुना सामान्यतः २ लि. क्षमतेच्या स्वच्छ व 'उदासीन' काचेच्या पक्के बूच असलेल्या बाटलीत गोळा करतात. बाटलीचे तोंड रुंद असते व बूच शक्‍यतो 'घर्षित-कांच-जोडाचे' असते. ज्या पाण्याचा नमुना गोळा करावयाचा असेल त्या पाण्याने बाटली प्रथमतः विसळून घेतात. ' विकिरणशीलता ' मोजावयाची असल्यास काचेपेक्षा पॉलिथिनच्या बाटलीचा वापर करतात. तसेच 'जीवरासायनिक-ऑक्सिजन-मागणी ' (BOD) परिकलित करावयाची असल्यास वेगळ्या लहान बाटलीत पाणी भरून त्यात मॅंगेनिज सल्फेट व अल्कीय सोडीयम्‌ अझाइड घालून पाण्यातील विलीन अवस्थेतील ऑक्सिजन 'आबद्ध ' करून घेतात. यामुळे त्या विशिष्ट वेळी असलेली “जीवाणू ऑक्सिजन मागणी ” (BOD) काढणे शक्‍य होते. गोळा केलेल्या पाण्यात जीवरासायनिक क्रिया सुरू होऊ नयेत ब त्याची गुणवत्ता बदलू नये म्हणून नमुना शक्‍यतो निम्न तपमानात विशेषेकरून ० से. मध्ये ठेवतात.

जीवाणुशास्त्रीय विश्लेषण पद्धती:
या पद्धतीसाठी नमुना गोळा करावयाचा असल्यास बाटलीसंबंधीचे 'विनिर्देश' वर वर्णन केल्याप्रमाणेच असतात; फक्त तिची जलधारण क्षमता ३०० मि. लि. इतकीच असते. नमुना गोळा करण्यापूर्वी बाटली ऑटोक्लेव्हमध्ये प्रती इंच वर्ग १५ पौंड अगर प्रति सें. मी. वर्ग १. ०५४ कि. ग्रॅ. इतक्या दाबाखाली (या दाबाखाली १२१.६ सें. इतके तापमान असते) १५ मिनिटे ठेवून ' निर्जंतुक ' करून घेणे अत्यावश्‍यक असते. नाहींतर बाटलीतील जंतू एरव्ही शुद्ध असलेल्या पाण्यास अशुद्ध बनवून विश्‍लेषण फसवे बनवू शकतात. बाटलीचा, गळा व घर्षित-कांच-जोडाचे झाकण यांच्यामध्ये बाटली निर्जंतुक करण्यापुर्वी ब्राऊन पेपरचा तुकडा ठेवतात. त्यामुळे उच्च तपमानात बूच गळ्याला चिकटून बसत नाही. बुचाला कागद गुंडाळून ट्वाईन दोऱ्याने कागद बांधण्याची पद्धत कसोशीने पाळतात. नमुना गोळा करावयाचे वेळी ' संदूषण ' होऊ नये म्हणून बाटली वा
---------
जंतु हा शब्द “ जिवाणू ', ' रोगाणू', ' विषाणू ' व इतर एककोषिक जीवमात्र या सर्वांना मिळून वापरलेला आहे.
-----------

काढलेल्या बुचाचा मातीशी स्पर्श होऊ देत नाहीत. बूच हातात धरून ठेवतात व बाटली ओसंडून वाहीपर्यत काठोकाठ भरून' घेतात. तुडुंब भरलेल्या बाटलीला बूच बसवितात. नदी, नाला किवा तलाव, यातून पाण्याचा नमुना गोळा करावयाचा असल्यास बाटली काठापासून काहीशा दूर अंतरावर पाण्यात शक्य तितक्‍या खोलीपर्यंत बुडवून भरतात. पाणी खूप खोल असेल तर निर्जंतुक केलेल्या बादलीने (बादलीत थोडेसे स्पिरीट वा अल्कोहोल टाकून पेटवावे. बादलीऐवजी लहान भांडे वापरले असेल तर स्पिरीटचा बोळा टाकून तो पेटवावा) पाणी वर काढून त्यात बाटली बुडवतात. नमुना गोळा केल्यानंतर १२ ते २४ तासांच्या आत तो विश्लेषणासाठी वापरण्यात पेतो. तोपर्यंतच्या काळांत तो बर्फ-पेटीत वा फ्रीजमध्ये 00 सें. तपमानात ठेवण्यात येतो. नळातून पाण्याचा नमुना घ्यावयाचा असल्यास बाटलीत थायोसल्फेटचे ३-४थेंव टाकून मंग बाटलीत पाणी भरतात. (यामुळे अवशिष्ट क्लोरीन नाहीसे होते.)

पाण्यांचा नमुना गोळा करण्यासाठी जागेची निवड, एकूण पाणीपुरवठा, जलउदूगम, त्यातली निरनिराळी उपचारण संयंत्रे व त्यांच्या जागा, यांची संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर, मगच करतात. एकाद्या विशिष्ट ठिकाणच्याच पाण्याची शुद्धता पारखावयाची असेल तर तेथील नमुना प्रातिनिधिक असावा. यासाठी योग्य जागा शोधून (साधारणतः पाणी खळखळ वाहणारी अशी जागा) मगच तेथील नमुना गोळा करतात.

नमुन्यांची संख्या व ते गोळा करण्यामधील 'वारंवारता ', समस्येच्या तीव्रतेवर वा गांभिर्यावर अवलंबून असते. जर कोणतीही विशिष्ट समस्या नसेल, तर नेहमीच्या 'आंतराविंक ' विश्लेषणासाठी लोकसंख्येवर आधारभूत अशी वारंवारता ठेवतात. खाली
दिलेली माहिती या बाबतींत मार्गदर्शक ठरते. वाटप किवा वितरण पद्धतीत शिरणाऱ्या अनुपचारित पाण्याचे नमुने गोळा करताना खाली दिल्याप्रमाणे वारंवारता ठेवतात. वितरण पद्धतीत ज्या बिंदुच्यापाशी पाणी प्रवेश करते तेथील नमुने गोळा करण्यात येतात.

सारणी ५.१:

अनुपचारित पाणीपुरवठा होत असलेली लोकसंख्या व नमुने गोळा करण्याची वारंवारता

पाणीपुरवठा होत असलेली' लोकसंख्या ---एकापाठोपाठ घेतल्या जाणार्‍या दोन अन्‌ क्रमिक नमुन्यातील कमाल कालावधी

२०,००० लोकसंख्येपर्यंत ---------- एक महिना.
२०,०००-५०,००० ---------- दोन आठवडे.
५०,०००- १,००,०००----------चार दिवस.
१,००,००० पेक्षा जास्त---------- एक दिवस.
------------
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने निर्धारित केलेली वारंवारता.
----------
वितरण पद्धतीमधील पाण्याचे विश्लेषण करावयाचे असल्यास सारणी ५-२ मध्ये दिलेली वारंवारता उपयोगात आणली जाते.

सारणी ५.२ :
वितरण पद्धतीतूत पाणीपुरवठा होत असलेली लोकसंख्या, नमुने गोळा करण्यासाठी आवश्यक वारंवारता व नमुन्यांची किमान संख्या
----------
पाणीपुरवठा होत असलेली लोकसंख्या ---दोन अनुक्रमिक नमुन्यांमधील कमाल कालावधी--- संपुर्ण वितरण पद्धतीमधून गोळा करावयाच्या नमुन्यांची किमान संख्या
----------
२०,००० पर्यंत ---------- एक' महिना प्रत्येक ५,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे
२०,००१ -५०,००० ---------- दोन आठवडे प्रत्येक ५,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे
५०,००१ -१,००,००० ----------चार दिवस प्रत्येक ५,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे
१,००,००० पेक्षा जास्त----------एक दिवस प्रत्येक १०,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे.

ICMR या संस्थेने निर्धारित केल्याप्रमाणे

Hits: 123
X

Right Click

No right click