प्रकरण ५-रासायनिक व भौतिक गुणवत्ता
रासायनिक व भौतिक गुणवत्तेबाबत ठरविलेली मानके :
नवीन पाणीपुरवठा शोधणे व पाण्याची उद्योगांच्या मागणीच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता बघणे यासाठी रासायनिक विशलेषणांचा उपयोग बऱ्याच संशोधनात होतो.
रासायनिक खते वापरलेल्या शेतातून वाहेर पडणारे शेतपाणी वा उद्योगातून बाहेर पडणारी अपशिष्टे पाण्यात निस्सारित होत असल्याची शंका आल्यास घातक द्रव्यांच्या परीक्षणार्थ अनुपचारित पाणी व उपचारित पाणी यांचे नमुने दर ३ महिन्यांतून किमान एकदा तरी गोळा केलेच पाहिंजेत. पाणीपुरवठ्याच्या उगमस्थानापाशी घातक पदार्थ अनुमेय मर्यादेच्या खाली थोड्या प्रमाणात जरी असले तरी अशा तर्हेचे नमुने गोळा करण्याची वारंवारता अधिक ठेवावी लागते. त्याचप्रमाणे प्रदूषणाची संभाव्यता जिथे जिथे असेल तिथे व औद्योगिक वसाहतींचे साहचर्य असलेल्या क्षेत्राजवळील पाणीपुरवठ्यामधील नमुने घेण्याची वारंवारता अधिक ठेवणे नेहमीच शहाणपणाचे ठरते.
वारंवार कराव्या लागणार्या रासायनिक परिक्षणासाठी गोळा करावयाचे. नमुने पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे गोळा करण्यात येतात. ५०,००० हन अधिक लोकवस्तीला पाणी-पुरवठा करणारे उद्गम असतील तर तेथील नमुने ३ महिन्यांतून किमान एकदा व ५०,००० पर्यंतच्या लोकवस्तीला पाणीपुरवठा करणारे उद्गम असतील तर तेथील पाण्याचे नमुने बर्याच वेळा व जास्त वारंवारता ठेवून गोळा करावेत. उद्गम नवीन अगर प्रस्तावित असतील तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन बऱ्याच वेळा परीक्षण करावे लागते व त्यावरून वारंवारता निश्चित करावी लागते.
सारणी ५.३: रासायनिक विश्लेषणासाठी निर्धारित मानक *
(अ) घातक पदार्थ :
पदार्थ -------------------------------कमाल अनुमेय सांद्रता प्रती लिटरला मिलिग्रॅम (mg/l)
सायनाईड (CN) ---------------------------- ०.०१
शिसे (Pb) ----------------------------०.१०
अर्सेनिक (As) ---------------------------- ०.२०
क्रोमियम (Cr6+) ----------------------------०.०५
(आ) आरोग्यावर परिणाम घडवून आणणारी विशिष्ट रासायनिक द्रव्ये:
काही रासायनिक द्रव्ये पिण्याच्या पाण्यात विशिष्ट सांद्रतेपेक्षा अधिक असली तर ती आरोग्याला विघातक ठरतात. यापैकी काही द्रव्ये ठराविक सांद्रतेपेक्षा कमी असली (विशिष्ट सांद्रतेपेक्षा कमी) तरीही त्यांचा आरोग्यावर विघातक परिणाम घडून येतो
(१). फ्लोराइडे---यांची सांद्रता ०.५ ते १.५ मि. ग्रॅ/लिटर या मर्यादेत हवी. ०. ५ मि. ग्रॅ/लि. पेक्षा कमी किवा १.५ मि. ग्रॅ./ लि. पेक्षा जास्त सांद्रता आरोग्यावरं विघातक परिणाम घडवून आणते.
(२) नायद्रेटे यांची सांद्रता ४५ मि. ग्रॅ./लि. पेक्षा जास्त नको.
या प्रकरणात दिलेली मानके पिण्याच्या व इतर घरगुती वापरावयाच्या पाण्यापुरतीच मर्यादित आहेत. पोहण्याच्या तलावातील पाण्याची गुणवत्ता, सिंचनासाठी वापरल्या जाणा-या पाण्याची गुणवत्ता, शीतनासाठी किवा प्रक्षालनासाठी किवा सर्वसाधारण प्रक्रियांसाठी वापरल्या जाणार्या पाण्याची गुणवत्ता दाखविणारी वेगवेगळी मानके प्रस्थापित केली आहेत. ती या प्रकरणाच्या शेवटी दिली आहेत. औद्योगिक वापरासाठी वापरली जाणारी मानके प्रकरण ९ मध्ये पहा.
या मानकांच्या पार्श्वभूमीवर पाण्यातील निरनिराळी द्रव्ये व त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम पुढील प्रकरणात विस्तृतपणे च्चिलेले आहेत.
---------
* रंग, गढुळता, मूल्य सोडून सवे द्रव्यांची अभिव्यक्ती मिलीग्रॅम लिटर अशी केली:
आहे. हे मानक कुटुंब कल्याण व स्वास्थ्य मंत्रालय, भारत सरकार यांच्यामाफंत १९७१ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
-----------
प्रकरण ५ -जीवाणुविषयक मानके
जीवाणुविषयक मानके:
पाण्याची 'पेयता ' पारखत असताना ही मानके अत्यंत उपयुक्त असतात. पिण्याच्या पाण्याशी संबंधित असलेला महत्त्वाचा धोका म्हणजे वाहिंत मल वा मानवी विष्ठेमुळे होणारे संदुषण. अश्या तर्हेचे संदूषण अगदी 'ताजे ' असेल व संदूषण करणारे हे दूषित आजारामुळे पछाडलेले रोगी अथवा दूषित तापाच्या 'कारक-कोषिकांना-रोगाणूंना-आसरा देणारे वाहक असतील तर पाण्यात रोगाणू असण्याची शक्यता निर्माण होते. अशा त-हेने संदूषित झालेल्या पाण्याच्या सेवनामुळे रोग फैलावण्यास अधिक मदत होते. जेंव्हा मलात अथवा विष्ठेत रोगाणूंचे अस्तित्व असते तेव्हा त्यामध्ये त्यांच्याहीपेक्षा जास्त संख्येत, आंतड्यात नेहमीच वसती करून राहणारे सामान्य पण निरुपद्रवी 'आन्त्रनिवासी जीवाणूही ' असतात. या निरुपद्रवी जीवाणूंची पाण्यातील संख्या व त्यांचा रोगाणूंशी असलेले अनुपात सर्वसाधारणत: साठ हजारास एक असा असतो. या निरुपद्रवी जीवाणूंचे पाण्यातील, पाण्यातील अस्तित्व शोधणे सोपे आहे. रोगाणूंना शोधण्यापेक्षा तर बरेच सोपे! म्हणूनच अशा तर्हेच्या सामान्य आत्त्रिनिवासी जीवाणूंची पाण्यातील अनुपस्थिती रोगाणूंच्या अंनुपस्थितीची बर्याच निश्चित प्रमाणात हमी देऊ शकते. याच कारणांसाठी विष्ठेतील 'दण्डाकृती जीवाणू ' हे 'विष्ठा प्रदूषणाचे निदर्शक समजले जातात. विष्ठा प्रदूषणाचे निदर्शक जीवाणू म्हणजे ' इश्चेरिश्चिया कोली ' आणि कोलींचा संपूर्ण समाज वा समुच्चय. यांनाच अलिकडे 'विष्ठीय कोली' अशा सामान्य नामाने ओळखतात. हे कोली-समुच्चयातील जीवाणू पाण्याच्या संबंधात पाहुणे असल्याने त्यांना ' प्रदूषणाचे निदर्शक ' समजण्यात येते.
गेल्या २-३ दशकात 'विषाणू-रोगांचा ' प्रादुर्भाव चांगलाच जाणवू लागला आहे. १९५५-५६ साली दिल्लीत ज्या रोगाने धुमाकूळ घालून असंख्य निष्पाप मानवांचे बळी घेतले, (ज्यात मराठी भाषिकांना परिचित कवी बा. सी. मर्ढेकर हेही होते) तो काविळीचा रोग विषाणूपासूनच उद्भवला होता. या रोगांचा छडा लावण्यासाठी ' निदर्शक विषाणू कोषिकांची' माहिती विद्यमान शास्त्राला नसल्याने, त्यांच्या पाण्यातील उपस्थितीविषयी निश्चयात्मक रीतीने काहीही सांगता येत नाही. अशा वेळी विष्ठींय' कोलींची अनुपस्थिती व पाण्यातील अवशिष्ट क्लोरिन हीच सुरक्षिततेची हमी समजावी लागते.
जीवाणुश्यास्त्रीय दृष्टीने परीक्षण करून पाण्याची गुणवत्ता ठरविताना पाण्याचे (१) अनुपचारित पाणी, (२) उपचारित पाणी व (३) ग्रामीण पाण्याचे नमुने असे ढोबळमानाने तींन विभाग पाडता येतात. प्रत्येक पाण्याची गुणवत्ता पुढे दिल्याप्रमाणे पडताळून पाहण्यात येते .
(१) अनुपचारित पाणी.
कोंणत्याही महिन्यातील कोणत्याही नमुन्यात कोली. जीवाणूंचा अतिसंभाव्य अंक दर १०० मि. लि. मध्ये १० हून जास्त नसावा.
इ. कोली अनुपस्थित असतील तर क्वचित् प्रसंगी दर १०० मि. लि. मध्ये हा अतिसंभाव्य अंक (MPN) २० पर्यंत “अनुमेय'' धरला जातो. मात्र अशा परिस्थितीत कोलोंचा MPN सातत्याने २० किवा त्याहून अधिक आढळल्यास पाण्यावर उपचार करणे अटळ असते.
(२) उपचारित पाणी.--जर प्रती १०० मि. लि. मध्ये कोली-जीवाणू संपूर्णतः अनुपस्थित असतील तर ते पाणी आदर्श समजावे. कोणत्याही एका महिन्यात गोळा केलेल्या व विश्लेषण झालेल्या ९० प्रतिशत नमुन्यांमध्ये कोली-जीवाणुंची अनुपस्थिती किंवा कोली-जीवाणूंचा MPN हा दर १०० मि. लि. ला १ पेक्षा कमी' असावा (म्हणजे शून्यच असावा). कोणत्याही एका नमुन्यात हा MPN प्रती १०० मि.लि. ला १० हुन अधिक नसावा व कोणत्याही दोन अनुक्रमिक नमुन्यात प्रती १०० मि. लि. ला ८---१० या मर्यादेत सातत्याने नसावा (आठपेक्षा कमी असावा).
(३) ग्रामीण नमुने---पाणी पुरवठ्यांच्या उद्गमांची सुरक्षितता , राखण्यात काळजी घेतलीं जावी. अनुपचारित पाण्यासाठी ठरविलेली मानके या बाबतीत कटाक्षाने पाळली जावीत.
ICMR ने प्रकाशित केलेल्या 'पाणीपुरवठ्यांसाठी निर्घारित केलेले गुणवत्ता दर्शक मानकांची पुस्तिका ', मालिका क्रमांक ४४, १९६२.
प्रकरण ५ - जलशुद्धता मानके
जलशुद्धता पारखण्यासाठी निर्धारित मानके
शुद्ध पाणी म्हणजे रंगहीन, गंधहीन, रुचिहीन, रोगाणू व अपायकारक द्रव्यरहिंत परंतु प्रमाणित जीवनावश्यक घटकांनी युक्त असलेले पाणी होय. शुद्ध पाण्याची ही व्याख्या इतर व्याख्यांप्रमाणे आदर्श स्थिती सूचित करते. असे आदर्श पाणी मिळणे हा बर्याच वेळा एक दुग्धशर्करा योगच समजावा लागेल. व्यवहारात सामान्यतः वापरावे लागणारे पाणी जर नेहमी या आदर्शाच्या कसोटीवर पारखू म्हटले तर बर्याच वेळेस पाण्याशिवायच राहावे लागेल. याचा अर्थ, अगदी 'आदर्श पाणी' नसले तरी आदर्शाचा आभास उत्पन्न करणारे, आदर्शाप्रत जाऊ पाहणारे पण प्रकृतीस अपायकारक नसलेले पाणी स्वीकारावेच लागेल.
आदर्शाप्रत पोहोचू पाहणारे अशा गुणवत्तेचे पाणी मिळविण्यासाठी देखील काही ठिकाणी कैक वेळा पाण्यावर 'उपचार' करणे भाग पडेल. विशेषत: वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होत चाललेले उद्योगीकरण, यांच्या संदर्भात नवीन जल्उद्गम आणि प्रदूषणाचा परिहार करणाऱ्या उपचारण पद्धती, यांच्यावर प्रचंड संशोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसे जर केले नाही तर १९७७ च्या मार्च महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या वतीने अर्जेंटिनात झालेल्या जागतिक पाणी परिषदेच्या अधिवेशनात सीरियन प्रतिनिधीने काढलेले, 'तेलापेक्षां पाण्याला अधिक किमत मोजावी लागेल असा दिवस दूर नाही,' हे उद्गार खरे ठरल्याविना राहणार नाहीत. पाण्याचा साठा मर्यादित असल्यास वापरलेले उपयुक्त पाणी पुन्हा वापरण्याची गरज उत्पन्न होते. अशा वेळी प्रथम वापरापूर्वीच्या मूळ अनुपचारित जलाशी बरोबरी करणारे पाणी मिळविण्यासाठी मलोपचारण करणे व त्यापासून मिळणार्या निस्त्रावाचे तृतीयक उपचारण करणे आवश्यक ठरते. (आकृती ५.१)
'आदर्शाशी बरोबरी करणारे पाणी' असा वाक्प्रचार स्वीकारल्यानंतर पाण्यात सामान्यपणे सापडणाऱ्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. घटकांचे पाण्यातील परिमाण आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. त्याचप्रमाणे काही घटकांच्या बाबतीत 'तडजोडीची वृती' स्वीकारावी लागेल. म्हणजेच प्रत्येक घटकाच्या बाबतीत 'स्वीकार्य सांद्रता' आणि 'अनुमय सांद्रता' निर्धारित कराव्या लागतील. त्यासाठी 'मानके' प्रस्थापित करावी लागतील. स्वीकार्य सांद्रतेपेक्षा जास्त परिमाणात पाण्यातील एखादा घटक जेव्हा आपले अस्तित्व दाखव् लागतो तेव्हा बऱ्याचशा लोकांना तो आक्षेपार्ह भासू लागतो व पाण्याच्या गुणवत्तेचे नियंत्रण करणाऱ्या प्रचलित पद्धतींचे उल्लंघन केले गेले असे समजण्यात येते. मात्र तोच घटक जेव्हा अनुमेय सांद्रतेचीही पातळी गाठू पाहतो त्यावेळी विशेष दक्षता घेणे जरुरीचे असते. कारण हे परिमाण अनुमेय सांद्रता पातळीच्या पलिकडे गेल्यास ते केवळ आक्षेपार्हच न राहता आरोग्यासही विघातक बनते. त्याचा निश्चित परिणाम समाजजीवनावर झाल्याचे दिसून येते आणि पाण्याची 'पेयता' निकृष्ट दर्जाची समजण्यात येते.
स्वास्थ्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून घटकांकरिता मानके निर्धारित करत असताना नियामक प्रधिकरणांना प्रत्येक घटकासाठी विशिष्ट हेतू लक्षात ठेवणे जरूर असते. आकृती ५. २ ही मानकासाठी तयार केलेला ' वस्तुनिष्ठ वर्णक्रम ' दाखविते. एखाद्या घटकासाठी मानक ठरवित असतानां कोणकोणते हेतू लक्षात ठेवावेत हे या आकृतीवरून लक्षात येते.
जगातील काही प्रगत राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रापुरती पाण्याच्या बावतीतील मानके प्रस्थापित केली आहेत. एवढेच नव्हे तर त्या राष्ट्रातील कोणत्याही भागात पाण्याचे विश्लेषण करणे सुलभ व्हावे म्हणून विश्लेषण पद्धती व परिमाणांची अभिव्यक्ती, यांबाबत कमालीची एकसूत्रता आणली आहे. बर्याचशा इतर विकसनशील व अविकसित राष्ट्रांत अशा तऱ्हेची मानके वा 'मानक विश्लेषण पद्धती' अस्तित्वात नसल्यामुळे जागतिक स्वास्थ्य संघटनेने-WHO ने एक स्वतंत्र समिती स्थापन करून व त्यावर निरनिराळया राष्ट्रातील निष्णात आरोग्याधिकारी वा ' जन:स्वास्थ्य अभियंते ' सभासद म्हणून घेऊन मानकांचा प्रश्न सोडविला आहे व विविध उपयोगांसाठी त्याबाबतची निर्धारित मानके तयार केली आहेत. पिण्याच्या पाण्याबाबत निर्धारित केलेली मानके पुढे दिली आहेत. या मानकांमुळे पाण्याची गुणवत्ता 'अविमितीय ' न राहता द्रव्यमानांप्रमाणे ' विमितीय' बनली आहे.
गुणवत्तेच्या बाबतीत विमिती आवश्यक ठेवण्याची ही कल्पना आधुनिक शास्त्राची मानवाला मिळालेली अपूर्व देणगी आहे. यामुळे आरोग्यसंवर्धन करणे सुलभ झाले आहे. जागतिक स्वास्थ्य संघटनेची मुख्य कचेरी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे असून वेळोवेळी त्या समितीच्या सभासदांच्या बैठकी होतात. त्यामध्ये आरोग्यावर विघातक परिणाम घडविणाऱ्या अनेकविध घटकांच्या विश्लेषण पद्धतीविषयी व मानक परिमाणाविषयी चर्चा होते. कधी कधी तर बाजारात येणाऱ्या नवीन औषधांच्या वा डी. डी. टी. सारखी कीटकनाशके, एल. एस. डी. सारखी मादक अफिमी द्रव्ये, संतती निरोधक गोळ्या इ. अन्य द्रव्यांच्या संभाव्य परिणामांविषयी ही चर्चा होते. पोटात घेतली जाणारी द्रव्ये संपूर्णतया पचविली जाऊ शकत नाहीत. त्यापैकी काही भाग मलमुत्रातून बाहेर पडतो. त्याची टक्केवारीही बरीच असते. बाहेर पडणारा भाग वाहित मलजलावाटे पाण्याच्या उद्गमाला जाऊन मिळण्याची शक्यता बरीच असते. अर्थात त्यामुळे त्या पदार्थांची पाण्यातील उपस्थिती व त्यांची परिमाणे वाढत जातात. .
जलविश्लेषणासाठो 'नमुना ' गोळा करण्याच्या पद्धती:
जलविश्लेषणाच्या दोन पद्धती सामान्यकरून वापरल्या जातात. एक रासायनिक विश्लेषण पद्धती व दुसरी जीवाणू-शास्त्रीय विश्लेषण पद्धती. काही विशिष्ट प्रसंगी औद्योगिक उच्छिष्ट, रासायनिक खतांचा शेतपाण्यावरोबर झालेला निचरा पाण्यात झाला असल्याची शक्यता आढळल्यास वा पिण्याव्यतिरिक्त इतर विशेष कारणांसाठी (जसे बाष्पित्रासाठी, शितनासाठी, थंड पेयांच्या कारखान्यासाठी इ.) पाणी वापरावयाचे असल्यास अगर एकादा घटक (रासायनिक) व रोग यांचा अन्योन्य संबंध प्रस्थापित करावयाचा असल्यास रासायनिक न विश्लेषण पद्धती वापरली जाते. एखाद्या उद्गमातील पाण्याची पेयता ठरविण्यासाठी मात्र या पद्धतीचा प्रत्यक्ष उपयोग होत नाही. पेयता पारखावयाची असल्यास इतर कोणत्याही घटकाच्या अस्तित्वापेक्षा रोगाणूंचे अस्तित्व पाहणे अधिक महत्त्वाचे असल्यामुळे जीवणुशास्त्रविषयक परीक्षाच ध्यावी लागते.
प्रकरण ५ - नमुन्यांचे विश्लेशण
या दोन्हीही विश्लेषणांचे यश पाण्याचा जो 'नमुना ' घेतला जातो त्या नमुन्यावर अवलंबून असते. ज्या पाण्याची पारख करावयाची त्या पाण्यात आणि गोळा केलेल्या नमुन्यात गुणवत्तेच्या बाबतीत अभेदत्व असेल तरच त्या विश्लेषणास अर्थ प्राप्त होईल. म्हणजेच नमुना गोळा करतेवेळी पारख करावयाच्या पाण्याचा तो नमुना ' प्रातिनिधिक' असला पाहिजे व त्याकरता खबरदारी घेण्याची आत्यंतिक गरज असते. विश्लेषण पद्धती वापरण्यातील अचूकता अगर 'परिकलनातील़ ' अचुकता, यांच्यापेक्षा नमुना गोळा करण्याच्या पद्धतीतील अचूकतेवर अधिक भर द्यावा लागतो. यासाठीच कोणत्याही पाण्याचे विशेषण करत असताना केवळ एकाच नमुन्यावर विसंबून न राहता एकाच पद्धतीने एकाच जलाशयातून एकावेळी व निरनिराळ्या वेळी गोळा केलेल्या दोन, तीन किवा अधिक नमुन्यांच्या विश्लेषणांचे निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहण्यात येतात. त्यासाठी 'सांख्यिकीय विश्लेषण' पद्धतीचा उपयोग करण्यात येतो.
रासायनिक विश्लेषण पद्धती :
या पद्धतीसाठी गोळा करावयाचा नमुना सामान्यतः २ लि. क्षमतेच्या स्वच्छ व 'उदासीन' काचेच्या पक्के बूच असलेल्या बाटलीत गोळा करतात. बाटलीचे तोंड रुंद असते व बूच शक्यतो 'घर्षित-कांच-जोडाचे' असते. ज्या पाण्याचा नमुना गोळा करावयाचा असेल त्या पाण्याने बाटली प्रथमतः विसळून घेतात. ' विकिरणशीलता ' मोजावयाची असल्यास काचेपेक्षा पॉलिथिनच्या बाटलीचा वापर करतात. तसेच 'जीवरासायनिक-ऑक्सिजन-मागणी ' (BOD) परिकलित करावयाची असल्यास वेगळ्या लहान बाटलीत पाणी भरून त्यात मॅंगेनिज सल्फेट व अल्कीय सोडीयम् अझाइड घालून पाण्यातील विलीन अवस्थेतील ऑक्सिजन 'आबद्ध ' करून घेतात. यामुळे त्या विशिष्ट वेळी असलेली “जीवाणू ऑक्सिजन मागणी ” (BOD) काढणे शक्य होते. गोळा केलेल्या पाण्यात जीवरासायनिक क्रिया सुरू होऊ नयेत ब त्याची गुणवत्ता बदलू नये म्हणून नमुना शक्यतो निम्न तपमानात विशेषेकरून ० से. मध्ये ठेवतात.
जीवाणुशास्त्रीय विश्लेषण पद्धती:
या पद्धतीसाठी नमुना गोळा करावयाचा असल्यास बाटलीसंबंधीचे 'विनिर्देश' वर वर्णन केल्याप्रमाणेच असतात; फक्त तिची जलधारण क्षमता ३०० मि. लि. इतकीच असते. नमुना गोळा करण्यापूर्वी बाटली ऑटोक्लेव्हमध्ये प्रती इंच वर्ग १५ पौंड अगर प्रति सें. मी. वर्ग १. ०५४ कि. ग्रॅ. इतक्या दाबाखाली (या दाबाखाली १२१.६ सें. इतके तापमान असते) १५ मिनिटे ठेवून ' निर्जंतुक ' करून घेणे अत्यावश्यक असते. नाहींतर बाटलीतील जंतू एरव्ही शुद्ध असलेल्या पाण्यास अशुद्ध बनवून विश्लेषण फसवे बनवू शकतात. बाटलीचा, गळा व घर्षित-कांच-जोडाचे झाकण यांच्यामध्ये बाटली निर्जंतुक करण्यापुर्वी ब्राऊन पेपरचा तुकडा ठेवतात. त्यामुळे उच्च तपमानात बूच गळ्याला चिकटून बसत नाही. बुचाला कागद गुंडाळून ट्वाईन दोऱ्याने कागद बांधण्याची पद्धत कसोशीने पाळतात. नमुना गोळा करावयाचे वेळी ' संदूषण ' होऊ नये म्हणून बाटली वा
---------
जंतु हा शब्द “ जिवाणू ', ' रोगाणू', ' विषाणू ' व इतर एककोषिक जीवमात्र या सर्वांना मिळून वापरलेला आहे.
-----------
काढलेल्या बुचाचा मातीशी स्पर्श होऊ देत नाहीत. बूच हातात धरून ठेवतात व बाटली ओसंडून वाहीपर्यत काठोकाठ भरून' घेतात. तुडुंब भरलेल्या बाटलीला बूच बसवितात. नदी, नाला किवा तलाव, यातून पाण्याचा नमुना गोळा करावयाचा असल्यास बाटली काठापासून काहीशा दूर अंतरावर पाण्यात शक्य तितक्या खोलीपर्यंत बुडवून भरतात. पाणी खूप खोल असेल तर निर्जंतुक केलेल्या बादलीने (बादलीत थोडेसे स्पिरीट वा अल्कोहोल टाकून पेटवावे. बादलीऐवजी लहान भांडे वापरले असेल तर स्पिरीटचा बोळा टाकून तो पेटवावा) पाणी वर काढून त्यात बाटली बुडवतात. नमुना गोळा केल्यानंतर १२ ते २४ तासांच्या आत तो विश्लेषणासाठी वापरण्यात पेतो. तोपर्यंतच्या काळांत तो बर्फ-पेटीत वा फ्रीजमध्ये 00 सें. तपमानात ठेवण्यात येतो. नळातून पाण्याचा नमुना घ्यावयाचा असल्यास बाटलीत थायोसल्फेटचे ३-४थेंव टाकून मंग बाटलीत पाणी भरतात. (यामुळे अवशिष्ट क्लोरीन नाहीसे होते.)
पाण्यांचा नमुना गोळा करण्यासाठी जागेची निवड, एकूण पाणीपुरवठा, जलउदूगम, त्यातली निरनिराळी उपचारण संयंत्रे व त्यांच्या जागा, यांची संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर, मगच करतात. एकाद्या विशिष्ट ठिकाणच्याच पाण्याची शुद्धता पारखावयाची असेल तर तेथील नमुना प्रातिनिधिक असावा. यासाठी योग्य जागा शोधून (साधारणतः पाणी खळखळ वाहणारी अशी जागा) मगच तेथील नमुना गोळा करतात.
नमुन्यांची संख्या व ते गोळा करण्यामधील 'वारंवारता ', समस्येच्या तीव्रतेवर वा गांभिर्यावर अवलंबून असते. जर कोणतीही विशिष्ट समस्या नसेल, तर नेहमीच्या 'आंतराविंक ' विश्लेषणासाठी लोकसंख्येवर आधारभूत अशी वारंवारता ठेवतात. खाली
दिलेली माहिती या बाबतींत मार्गदर्शक ठरते. वाटप किवा वितरण पद्धतीत शिरणाऱ्या अनुपचारित पाण्याचे नमुने गोळा करताना खाली दिल्याप्रमाणे वारंवारता ठेवतात. वितरण पद्धतीत ज्या बिंदुच्यापाशी पाणी प्रवेश करते तेथील नमुने गोळा करण्यात येतात.
सारणी ५.१:
अनुपचारित पाणीपुरवठा होत असलेली लोकसंख्या व नमुने गोळा करण्याची वारंवारता
पाणीपुरवठा होत असलेली' लोकसंख्या ---एकापाठोपाठ घेतल्या जाणार्या दोन अन् क्रमिक नमुन्यातील कमाल कालावधी
२०,००० लोकसंख्येपर्यंत ---------- एक महिना.
२०,०००-५०,००० ---------- दोन आठवडे.
५०,०००- १,००,०००----------चार दिवस.
१,००,००० पेक्षा जास्त---------- एक दिवस.
------------
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने निर्धारित केलेली वारंवारता.
----------
वितरण पद्धतीमधील पाण्याचे विश्लेषण करावयाचे असल्यास सारणी ५-२ मध्ये दिलेली वारंवारता उपयोगात आणली जाते.
सारणी ५.२ :
वितरण पद्धतीतूत पाणीपुरवठा होत असलेली लोकसंख्या, नमुने गोळा करण्यासाठी आवश्यक वारंवारता व नमुन्यांची किमान संख्या
----------
पाणीपुरवठा होत असलेली लोकसंख्या ---दोन अनुक्रमिक नमुन्यांमधील कमाल कालावधी--- संपुर्ण वितरण पद्धतीमधून गोळा करावयाच्या नमुन्यांची किमान संख्या
----------
२०,००० पर्यंत ---------- एक' महिना प्रत्येक ५,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे
२०,००१ -५०,००० ---------- दोन आठवडे प्रत्येक ५,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे
५०,००१ -१,००,००० ----------चार दिवस प्रत्येक ५,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे
१,००,००० पेक्षा जास्त----------एक दिवस प्रत्येक १०,००० लोकसंख्येस प्रति मास एक नमुना याप्रमाणे.
ICMR या संस्थेने निर्धारित केल्याप्रमाणे
प्रकरण ४ - शुद्ध पाणी
या साऱ्या गोष्टींचा विचार करूनच शुद्ध पाण्यांची व्याख्या करणे आवश्यक आहे. पिण्याच्या उपयोगासाठी 'शुद्ध पाणी' म्हणून जेव्हा आपण पाण्याचा विचार करतो तेव्हा रासायनिकदृष्ट्या शुद्ध असणारे आसुत जल हे देखील नापसंत करावे लागते. पिण्याच्या पाण्यात हैड्रोजन व ऑक्सीजन यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक रसायनांची आवश्यकता असते. मात्र ही रसायने एका विवक्षित मात्रेपर्यंतच 'संकेंद्रणित' व्हावी लागतात. त्या मात्रेचे उल्लंघन झाले की, त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते. पाण्यात कोणकोणती द्रव्ये असणे आवश्यक आहे आणि ती नसली किंवा कमी अधिक प्रमाणांत असली तर त्यांचे परिणाम काय' होऊ शकतात याचा उल्लेख पुढील प्रकरणात केला आहे.
शुद्ध पाण्याची सर्वमान्य व्याख्या करावयाची झाल्यास :--
“रंगहीन, गंधहीन, रूचिहीन, रोगाणूंचा व अन्य विषाक्त द्रव्यांचा अभाव असलेले; जीवनावश्यक घटकांच्या बाबतीत हितावह मात्रेने परिपूर्ण असणारे पारदर्शक पाणी” अशी' करता येंईल.
या व्याख्येत ज्या ज्या घटकांचा समावेश आहे ते सर्व घटक संध्येच्या वेळी करण्यात येणाऱ्या जलदेवतांच्या प्रार्थनेत अंतर्भूत आहेत. प्राचीन ऋषींना त्यांचे ज्ञान होते का नव्हते हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. परंतु पाणी हे गरिबातल्या गरिबाचे आरोग्यवर्धक पेय आहे ही' अगदी' आधुनिक कल्पनासुद्धा त्यात समाविष्ट केलेली आहे.
“आपोहिष्ठेति. . . . . . . . . .आपोजनयथाचन:। ” या प्रार्थनेत, “आम्हाला कल्याणकारक रस द्या. रोगांच्या नाशासाठी आम्ही तुमचा स्वीकार करतो. आम्हास प्रजोत्पादनास समर्थ करा. आम्हाला संपूर्ण आरोग्य द्या. जलात असलेल्या औषधीचा आम्हाला उपयोग होऊ द्या.” जल देवतेजवळ केलेल्या या मागण्या पाण्याची केवढी तरी महती सांगून जातात.
पाण्यात सामान्यत: सापडणारी द्रव्ये व त्यांचे संभाव्य परिणाम आ. ४-२ मध्ये दाखविले आहेत. त्यांची तपशीलवार चर्चा पुढील प्रकरणात करण्यात येईल. ढोबळ मानाने असे म्हणता येईल की, पाण्यातील रोगाणूंच्यामुळे विषमज्वर, जठरांत्रदाह, पटकी, आमांश, कावीळ यांच्यासारखे रोग प्रादुर्भूत होतात. शेवाळांच्या काही जाती अप्रिय वास व चव निर्माण करतात. क्षार जास्त मात्रेत राहिल्यामुळे अप्रिय चवी, दुष्फेनता, संक्षारकता यासारख्या उपद्रवांचा उद्भव होतो.