प्रकरण ४ - शुद्ध पाण्याच्या शोधात
पाणी आणि जीवन यांचा अन्योन्य संबध बघितल्यावर आणि पाण्याचे विशिष्ट गुणधर्म अभ्यासिल्यानंतर आरोग्याला विघातक नसणारे असे शुद्ध पाणी ही प्राणिसृष्टी आणि वनस्पतिसृष्टी यांची प्राथमिक गरज आहे हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. अनादी कालापासून स्वच्छ व सुरक्षित पाण्यासाठी मानव अविश्नान्त धडपड करीत आला आहे. '
जुन्या ग्रंथातून आढळणारे, “ व्यापन्नस्य च अग्निक्वथनं, सूर्यातपप्रतापनं, तप्तायपिंडदानं, सिकतालोष्टानां निर्वापणं प्रसादनं वा कर्तृव्यम् । ” हे संदर्भ याचीच साक्ष देतात. त्यावेळच्या आणि आताच्या शुद्धतेच्या कल्पनेत फरक एवढाच की, आता शुद्धतेची व्याख्या शास्त्रीय संशोधनाच्या वाढीबरोबर अधिकाधिक सुस्पष्ट होत चालली आहे. शास्त्रशुद्ध बनत चालली आहे. ' शुद्धता पारखून घेण्यासाठी निरनिराळ्या ' मानक कसोट्या ' विकसित केल्या जात आहेत. शुद्धता ही ' गुणात्मक' न राहतां परिमाणात्मक , अथवा ' मात्रात्मक ' होऊ पाहते आहे. 'तिच्या विमिती अधिक स्पष्ट केल्या जात आहेत.
उपयोगानुरुप पिण्यासाठी, सिंचनासाठी, शीतनासाठी, बाष्पित्नांसाठी इ. असे पाण्याचे वर्गीकरण करून त्यासाठी स्वतंत्र ' मानके ! तयार केली जात आहेत. या मानकांची ओळख करून घेण्यापूर्वी ' शुद्धता ' म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट केले पाहिजे व त्या अनुषंगाने शुद्ध पाण्याची व्याख्या करण्याचा यत्न केला पाहिजे. (या पुस्तकांत प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा विचार केला असल्याने व्याख्याही त्याच दृष्टीने करण्याचा प्रयत्न आहे.)
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून स्वास्थ्य-अभियंत्याला अभिप्रेत असलेली शुद्ध पाण्याची व्याख्या निखळ रसायनशास्त्रज्ञ किवा भौतिकिशास्त्रज्ञ यांच्या व्याख्येहून बरीचशी वेगळी आहे. रसायन शास्त्राप्रमाणे शुद्ध पाणी म्हणजे काय .व तसे पाणी उपलब्ध होते का हे आपणास प्रथम पहावे लागेल.
रासायनिकदृष्ट्या शुद्ध पाणी:
रासायनिकदृष्ट्या शुद्ध पाणी हे. हैड्रोजनचे दोन भाग आणि ऑक्सिजनचा एक भाग यापासून तयार झालेले संयुग H2O असते. यात हैड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या व्यतिरिक्त इतर रासायनिक पदार्थांचा अंतर्भाव संपूर्ण निषिद्ध मानला जातो. या दृष्टीने पाहता शून्य संवाहकता असलेले 'आसुत जल ' अगर ' विखनिजीकरण ' केलेले जल हेच फक्त शुद्ध पाणी म्हणून संबोधिता येईल.
हॅरॉल्ड यूरे या अमेरिकन शास्त्रज्ञाने १९३४ साली प्रथमत: असे दाखवून दिले की, प्रदूषित न झालेले नैसगिक पाणी वर उल्लेखिलेल्या. आसुत जलांसारखे शुद्ध कधीच तसते. ते एक मिश्रण असते.
---------------
*पिण्याचे पाणी उकळल्याने, उन्हात तापविंल्याने, लोखंड लाल करून पाण्यात घातल्याने वाळू, कोळसे यांतून गाळल्यानें वा फडक्यातून गाळल्याने शुद्ध होते.
-------
जर पाणी केवळ हैड्रोजन व ऑक्सिजन यांच्याच संयोगातून उत्पन्न झाले असते तर त्याच्या रेणूंचा भार १८. ०१६ इतकाच भरला असता. प्रत्यक्षात तो याहूनही जास्त असतो. याचा अर्थ हैड्रोजन आणि ऑक्सिजन या व्यतिरिक्त इतर अणूही त्यांच्या संघटनेत भाग घेतात. यूरेनें संशोधनाने नेमके हेच दाखवून दिले आहे. नैसर्गिक पाण्यात एक अणुभार असलेला हैड्रोजन आणि सोळा अणूभार असलेला ऑक्सिजन असतात, व त्याबरोबरच दोन व तीन अणुभार असलेली हैड्रोजनची दोन समस्थानिके आणि सतरा व अठरा अणुभार असलेली ऑक्सिजनची दोन समस्थानिके यांचाही समावेश असतो. हैड्रोजनच्या एकूण तीन समस्थानिकांपैकी प्रत्येक, ऑक्सिजनच्या तीनही समस्थानिकांशी स्वतत्ररित्या २: १ या प्रमाणांत संयोग साधतो व त्यातून पाण्याचा रेणू तयार होतो. इतकेच नव्हे तर ही सर्व समस्थानिके एकाच पद्धतीने आयनीकृतही होतात. याचाच सरळ सरळ अर्थ हा की नैसर्गिक पावसाचे तथाकथित शुद्ध पाणी हे कमीत कमी १८ विविध रेण्विक संयुगे आणि १५ निरनिराळया प्रकारची आयने यांचे एक मिश्रण असते. (आकूती ४.१).
स्वास्थ्याचे दृष्टिकोनातून शुद्ध पाणी:
रासायनिकदृष्ट्या शुद्ध पाणी निसर्गात सापडत नाही हे आपण पाहिले. शुद्ध म्हणून समजले जाणारे पावसाचे पाणी देखील पृथ्वीवर मानवाला उपलब्ध होईपर्यंत त्यात अनेक द्रव्ये समाविष्ट होतात व आपले अस्तित्व दाखवू लागतात. पाण्याची वाफ संघनित' होऊन खाली येत असतांना तिच्यात धुळीचे कण मिसळतात. ऑक्सिजन, कार्वनडाऑक्साइड व इतर वायू यांचे तीत विलयन होते. जमिनीच्या पृष्ठभागाशी संपर्क झाल्यानंतर तीत माती, असेंद्रीय क्षार यांचा शिरकाव होऊ लागतो. त्या पदार्थांबरोबर काही' जीवाणूंचाही प्रवेश होतो. काही जीवाणू हवेतून पाण्यात शिरकाव करतात, तर बरेच नदी वा प्रवाहाकडे वाहत जाणार्या पाण्यात मातीच्या माध्यमांतून प्रवेश करतात. जीवाणूंच्या बरोबर नायट्राइटे, नायट्रेटे व अमोनिया यांच्यासारखे सेंद्रीय पदार्थांच्या विधटनाचे उपज पदार्थ अल्प प्रमाणांत पाण्यात विलीन होतात ते वेगळेच. सारांश, सामान्यपणे मिळणारे नैसर्गिक पाणी' हे अनेक द्रव्यांचा समावेश असलेले पाणी असते. 'पृष्ठजल' काय किवा 'भू-जल' काय कमी अधिक प्रमाणात ते कशाचे तरी' विलयन अथवा निलंबन असते. या द्रव्यांपैकी काही द्रव्ये आरोग्यास हितावह असतात तर काही अत्यंत हानीकारक असतात.