प्रकरण २ - अन्नातील पाणी
प्रत्यक्ष पाण्याव्यतिरिक्त अन्नातूनही जवळजवळ १.१ लि. पाणी शरिरात जाते, हे आपण बघितलेच आहे. सेवन करीत असलेल्या अन्नात किती प्रतिशत पाणी असते याची कल्पना सारणी २.२ वरून अधिक स्पष्ट होईल.
अन्नावाटे अगर पिण्याच्या पाण्याबरोबर पोटात जाणारे पाणी म्हणजेच शरिरातील पाणी नव्हे. प्रत्येक जीवकोषिका, दोन कोषिकामधील अंतर, हाडामधील पोकळ नलिका, इतकेच नव्हे तर निरनिराळी उतके यामधे सापडणाऱ्या पाण्याचे प्रमाणही बरेच असते. या पाण्यामुळे शरिराच्या एकूण वजनात किती वाढ होऊ शकते हे सारणी २.३ मधे दाखविले आहे. रक्तवाहिन्यांची (नीला + धमन्या) ९६,००० कि. मी. लांबी सतत रक्ताने (पाण्याने ) व भरलेली असते ही एकच गोष्ट खूप बोलकी आहे.
सारणी २.२ : सेवन करण्यात येणाऱ्या पदार्थांमधील पाण्याचे प्रतिशत प्रमाण *
पदार्थ ----------------------------------------पाण्याचे पदार्थांचा वजनाशी प्रतिशत प्रमाण
सूर्यफुलाचे भाजलेले बी :
माणूस सेवन करू शकेल असा सर्वाधिक कोरडापदार्थ ---- ५
सफरचंद -------------------------------------- ८३-८४
द्राक्ष ------------------------------------------ ७८-७९
कलिंगड --------------------------------------- ९७
टोमॅटो ---------------------------------------- ९४
दूध : मातेचे ------------------------------------- ८८
शेळीचे --------------------------------------- ७७
गाईचे ---------------------------------------- ८७
म्हशीचे --------------------------------------- ७८
पालेभाज्या ------------------------------------ ६५-७५
गोमांस --------------------------------------- ६५
डकराचे मांस ---------------------------------- ५३
मेंढीचे मांस ------------------------------------ ६४
गहू ----------------------------------------- १४
ज्वारी --------------------------------------- ११
मका ---------------------------------------- ११.५
तांदूळ --------------------------------------- १२
--------------------------------------------------------------
* विन्थेन ब्लायथंड व इतर यांनी लिहिलेल्या “ Foods, their composition and analysis"
र्या पुस्तकातून.
सारणी २.२: अवयवान्तर्गात पाण्यामुळे शरिराच्या एकूण वजनात होणारी प्रतिशत वाढ *
अवयव .. .. ..पाण्याच्या वजनामुळे होणारी प्रतिशत वाढ
कोणिका .. .. ..४१
रक्तपेशी .. .- .. ४
पोकळ्या (आंतडे व नेत्रगोलाभोवतीची मोकळी जागा) ---- ५
-------------------------------------------------------------
* व्हाईट, हॅडलर व स्मिथ यांच्या “ A Textbook of Biochemistry” या पुस्तकातून:
जीवरासायनिक क्रिया व त्यामघील पाण्याचा वाटा:
वनस्पती आणि प्राणिजीवनातील वाढ (वय व जाडी) किंवा त्यामध्ये होणारी हानी ज्या रासायनिक क्रियांमुळे शक्य होते त्या रासायनिक क्रिया शरिरान्तर्गत व सजीव कोषिकांद्वारा होत असल्यामुळे त्यांना “जीव रासायनिक अभिक्रिया” असे म्हणतात. या जीवरासायनिक अभिक्रिया मुख्यत्वेकरून द्विविध स्वरुपाच्या असतात. एक प्रकार विघटनात्मक तर दुसरा संघटनात्मक. विघटनात्मक अभिक्रियांमधे जीवद्रव्याचे-कोषिकेत असणाऱ्या द्रवपदार्थाचे विघटन होते. रेणूचा मोठा आकार असलेली सेंद्रिय संयुगे प्राणिजीवामधील अगर वनस्पती जीवामंधील कोषिकेत शिरण्यासाठी लहान आकारांच्या रेणूत ( उपजपदार्थ) रुपान्तरीत होतात.
उदाहरण द्यावयाचे झाल्यास स्टाचे अगर सेल्युलोजचे देता येईल. हे दोन्हीही पदार्थ मोठ्या आकाराच्या रेणूंनी बनलेले असल्यामुळे जसेच्या तसे कोषिकेत प्रवेश करू शकत नाहीत.
जीवरासायनिक अभिक्रियांमुळे त्यांचे प्रथमत : ग्लूकोज शर्करेत रूपान्तर होते व मग हे ग्लूकोज शर्करेचे लहान रेणू कोषिकेत प्रवेश करून कोषिकांना ऊर्जा पुरवू शकतात. ही अभिक्रिया नेहमीच 'ऊर्जाप्रदायी' असते.
याच्या उलट संघटनात्मक अभिक्रियांमध्ये कोषिकानिर्मिती अगर कॉर्बोहायड्रेटे, प्रथिने, यासारख्या रेणूंची निर्मिती होते. या पदार्थाच्या निमितीसाठी शर्करा, अमिनो अम्ले यांच्याबरोबरच ऊर्जेचीही गरज असते. या अभिक्रियांना म्हणूनच 'ऊर्जा-उपभोगी' असे म्हटले जाते. या दोन्हीही अभिक्रिया परस्परावलंबित असतात. या दोन्हीही अभिक्रिया समुच्चय स्वरूपात, अपचयन (विघटनात्मंक अभिक्रिया) व उपचयन (संघटनात्मक अभिक्रिया) म्ह॒गून ओळखल्या जातात. दोन्हीही अभिक्रिया-समुच्चय एकत्रितपणे 'उपापचयन' म्हणून परिचित आहेत.
Hits: 83