गीताई अध्याय आठवा

Parent Category: मराठी पुस्तके Category: गीताई - विनोबा भावे Written by सौ. शुभांगी रानडे

अर्जुन म्हणाला
ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते ।
अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥

अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे ।
प्रयाणी हि कसे योगी निग्रही तुज जाणती ॥ २ ॥

श्री भगवान्‌ म्हणाले
ब्रम्ह अक्षर ते थोर अध्यात्म निज-भाव जो ।
भूत-सृष्टि घडे सारी तो जो व्यापार कर्म ते ॥ 3 ॥

अधि-भूत विनाशी जे जीवत्व अधि-दैवत ।
अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्-पूत जो ॥ ४ ॥

अंत-काळी हि माझे चि चित्ती स्मरण राखुनी |
देह सोडूनि गेला तो मिळे मज न संशय ॥ ५ ॥

जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो ।
मिळे त्या त्या चि भावास सदा त्यांत चि रंगला ॥ ६ ॥

म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू ।
मन बुद्धि समर्पूनि मज निःशंक पावसी ॥ ७ ॥

अभ्यासी चित्त जोडूनि योगी अन्य न लक्षुनी ।
पुरुषास महा दिव्य पावे संतत चिंतुनी ॥ ८ ॥

सवज कती गुरू जो पुराण ।
सूक्ष्माहुनी सूक्ष्म अचिंत्य-रूप ॥
गिळूनि अंधार उजेडला जो ।
तो चिंतुनीया प्रभु सूर्य-वर्ण ॥ ९ ॥

हरयाणा काळी स्थिर चित्त राखे |
प्रेमे तसा योग-बळे कसूनि ॥
भ्रू-संगमी प्राण जडूनि ठेवी ।
तेंव्हा मिळे त्या पुरुषास ॥ १० ॥

जे घोकिती अक्षर वेद-वेत्ते ।
विरक्त यत्ने मिळती जयास ॥
जे ब्रहमचर्ये पद इच्छिताती ।
ते सांगतो मी तुज तत्त्व ॥ ११ ॥

लावूनि सगळी दवारे कोंडूनि मन अंतरी ।
मस्तकी प्राण राखूनि चढला धारणेवरी ॥ १२ ॥

मुखे -ब्रह्म उच्चारी अंतरी मज आठवी ।
ह्यापरी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो ॥ १३ ॥

अनन्य-चित्त जो नित्य स्मरे मज निरंतर |
सदा मिसळला योगी तो सुखे मज पावतो ॥ १४ ॥

पावले मोक्ष-सिद्धीस महात्मे मज भेटुनी ।
दुःखाचे घर तो जन्म न घेती चि अशाश्वत ॥ १५ ॥

ब्रहमादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा ।
माझी भेट घडे तेंव्हा जन्मणे मग खुंटले ॥ १६ ॥

होतसे ब्रहम-देवाचा सहस्र-युग तो दिन ।
तेवढी चि तशी रात्र कालोपासक जाणती ॥ १७ ॥

अव्यक्‍तापासुनी होती भूते व्यक्‍त दिनोदयी ।
रात्र होता लया जाती सगळी मग त्यात चि ॥ १८ ॥

ती चि ती चि पुन्हा भूते त्यांचे काही न चालता |
दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती ॥ १९ ॥

अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अव्यक्‍तापत्लीकडे ।
नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन ॥ २० ॥

त्यास अक्षर हे नाम ती चि शेवटची गति ।
माझे परम ते धाम जेथूनि परते चि नना ॥ २१ ॥

लाभे अनन्य-भकक्‍्तीने पार्था पुरुष थोर तो ।
ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारने जग ॥ २२ ॥

कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक ।
संसारी पडतो किंवा पावतो सिद्धि ऐक ते ॥ २३ ॥

अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी ।
जाय तो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रहम जाणुनी ॥ २४ ॥

धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी ।
जाय तो परते येथ चंद्र-लोकास पावुनी ॥ २५ ॥

उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे ।
सुटका करितो एक-एक फेऱ्यात टाकितो ॥ २६ ॥

असे हे मार्ग जाणूनी योगी मोह न पावतो ।
म्हणूनि सर्वदा राहे योगाने जडिला चि तू ॥ २७ ॥

यज्ञात दानात तपात तैसे ।
जे बोलिले अध्ययनात पुण्य ॥
ते लंघितो सर्व चि जाणुनी हे ।
योगी चढे आद्य पदास थोर ॥ २७ ॥

अध्याय आठवा संपूर्ण

Hits: 87
X

Right Click

No right click