प्रस्तावना
बरोबर शंभर वर्षांपूर्वी पुण्यांतून मराठेशाही नष्ट झाली ! प्रस्तुत पुस्तक हे तिचें प्रथम-शत-सांवत्सरिक वाडूमयश्राद्ध आहे.
मराठेशाहीचा खरा अंत कोणल्या दिवशी झाला याविषयी मतभेद होण्याचा संभव आहे. कित्येक तो दिवस ता. १२ केव्रुवारी सन १७९४ हा मानतात; कारण
या दिवशी प्रसिद्ध मराठा वीर महादजी शिंदा वारला. महादजी हा लष्करी दृष्टीनें मराठेशाहोचा मुल्य आधारस्तंभ होता याबद्दल मुळीच वाद नाही.
कित्येक तो दिवस ता. १३ मार्च सन १८०० हा मानतात; कारण, त्या दिवशी प्रसिद्ध मराठा मुत्सद्दी नाना फडणवीस द्या वारला. नानाबरोबर मराठेशाहीतील सर्व
शहाणपण गेले, असें इंग्रज इतिहासकारांनींही आपल्या ग्रंथांतून म्हटलें आहे.
कित्येक तो दिवस ३१ डिसेंबर १८०२ हा मानतात; कारण, त्या दिवशी वसईचा तह होऊन बाजीराच हा इंम्रजांचा सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजाची इंग्रजांच्या मध्यस्थीच्या पाचरीनें अनेक शकलं झाली.
कित्येक तो दिवस ता. २३ सप्टेंबर १८०३ हा मानतात; कारण, त्या दिवशी शिंद्यांचा वसई येथील लढाईत प्रत्यक्ष पराभव होऊन मराठा सरदारांचा मित्रसंघ फुटला व मराठेशाहीला आता तरणोपाय नाही हें जगजाहीर झाले.
कित्येक तो दिवस ता, १५७ माहे नवंबर १८१७ ह्वा मानतात, कारण, त्या दिवशी पुण्यांत शनिवारच्या वाड्यावर इंग्रजांचे निशाण लागलें.
कित्येक तो दिवस ता. ३ जून १८१८ हा मानतात; कारण, त्या दिवशी बाजीराव अश्लीरगडाजवळ ढोलकोट येथें जनरल माल्कम याच्या स्वाधीन होऊन त्याने राज्यावर उदक सोडले.
कित्येक तो दिवस ता. १६ मे सन १८४९ ह्या मानतात; कारण, त्या दिवशी मराठेशाहीची जी मूळची-सातारची-गादी ती खालसा झाली.
बरील सहा-सात तारखांपैकी कोणती तारीख मराठेशाहीची खरी श्राद्धतिथी मानावयाची ही ज्याच्या त्याच्या मनोधर्माची गोष्ट आहे. सामान्यतः सन १८१६-१८ हे साल मराठेशाहीच्या अंताचे साल मानतात, व तेंच स्थूलमान आम्हांलाही प्राह्म वाटतें.
प्रतिसांवत्सरिक श्राद्ध तिथीला करतात, शतसांवत्सरिक श्राद्ध त्या उभ्या वर्षात केव्हांही केलें तरी चालेल. न ी
__ प्रस्तुत पुस्तक बरोबर ता. ३ जून १९१८ रोजी प्रसिद्ध करावें असें प्रथम मनांत असल्यामुळं ते लिहून पुरे करावयाचें काम चालढकलीवर पडले होते. पण चालू
मे महिन्यांत आम्हांला हिंदुस्थानाबाहेर जावें लागेल ब कदाचित् १९१९ सालापूर्बी परत येतांही येणार नाही असें कांही दिवसांपूर्वी निश्चित झाल्यामुळें पुस्तक प्रसिद्धीचे काम शक्य तितक्या घाईने उरकून घ्यावें लागलें. मराठे व इंग्रज यांचा संबंध मूळ आला तेव्हांपासून तो पेशवाई नष्ट होईपर्यंतचा-पण फक्त या उभयतांच्या संबंधापुरता-त्रोटक इतिहास पूर्वार्धात दिला आहे व उत्तरार्धात कांही मुद्यांचें विवेचन केले आहे. तथापि, मराठे व इंग्रज यांच्यासंबंधाचे सांगोपांग आणि मनाजोगे विवेचन करावयाचें तर आणखी एक एवढेंच पुस्तक लिहावे लागेल, असे माहिती गोळा करतांना आढळून आलें. 'न' जाणो, पुढें केव्हां हवा तितका वेळ मिळाल्यास कदाचित् ही गोष्ट घडून येईलही.
प्रस्तुत पुस्तकांत योजिलेल्या अनेक विषयांच| विस्तार स्थलसंकोचामुळें यथाप्रमाण करितां आला नाही. यामुळें कांद्दी भागांना निव्वळ टिपणांचेंहि स्वरूप आलें आहे. हे आम्ही जाणून आहें.
वास्तविक पाहतां, प्रस्तुत विषयावरील पुस्तक ज्यानें इतिहासाचा व्यासंग जन्मभर केला आहे अशाच एकाद्या गृहत्थाकडून लिहिलें गेलें असतें तर ते हवे होतें. तथापि, आमच्या विनंतीवरून निदान या पुस्तकास उपोदूघात तरी लिहिण्याचे शु. रा. रा. वासुदेव वामनशात्री खरे यांनी कबूल केलें याबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहे.
हं पुस्तक छापून हातावेगळे करण्याच्या कामी मुख्य मदत येथील प्रिटिंग एजन्सीचे मालक रा. रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांची झाली. छापखान्यांकडे हेलपाटे घालणें, प्रुफे केवळ शुद्धाशुद्धाच्याच नव्हे तर युक्तायुक्ताच्याही दृष्टीनें वाचणे व दोन ठिकाणी छापण्याचे काम करावें लागल्यामुळें आमची घांदल वाचविण्याकरता स्वतःची धांदल करून घेणें या गोष्टी जर पराडकर यांनीं पत्करल्या नसत्या तर, हे पुस्तक या थोड्या मुदतीत निघणे शक्य नाही अशा समजुताीने कदाचित् ते छापखान्याकडे गेलेंही नसतें. म्हणून रा. पराडकर यांच्या श्रमांबद्दह त्यांचे आभार मानिले पाहिजेत. तसेंच छपाईचे काम लवकर उरकून देण्यास मदत केल्याबद्दल चित्रशाळा ब जगद्धितेच्छु छापखान्यांचे मालक, विषयाची वेळोवेळी चर्चा करून अखेर विषयानुक्रमणिका तयार केल्याबद्दल रा. रा. दत्तोपंत आपटे बी. ए., यांचेही आभार मानणें जरूर आहे.
पुणे तारीख १ माहे मार्च, सन १९१८
नरसिंह चिंतामण केळकर.
दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना
प्रस्तुत ग्रंथाची प्रथमावृत्ति एक महिन्यांतच संपली; व ग्रंथांतील मजकुरांत निर्विवाद फरक करावा लागेल इतकी प्रतिकूल टीकेची सामग्री उपलब्ध होण्यापूर्वीच लोकांची वाढती मागणी पुरविण्यांकरितां ही पुनमुद्रितावृत्ती काढावी लागली,
पुणें ता. २५-११-१८
तिसऱ्या! आवृत्तीची मस्तावना
पूर्वीच्या आवृत्तीत विशेष फरक न करितां ही तिसरी आवृत्ति काढलेली आहे.
ता. १-६-२२ प्रकाशक