किर्लोस्कर खबर - १
त्यावेळच्या आपल्या समाजात पाहावे तो आळस, निरुत्साह, स्वत:विषयी औदासीन्य या अवगुणांची वाढ झालेली आढळत होती. तेथे वाचकांच्या मनात स्वावलंबन, आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा व साहस इत्यादी गुणांचे बीजारोपण करण्याचे कार्य पद्धतशोरपणे करता येईल आणि त्यामुळे जीवन यशस्वी व सुखी करण्यास हे मासिक मदत करील असे शंकरभाऊंना वाटू लागले.
१९२० च्या जानेवारीत पुन्हा पहिला चार पानी अंक तयार झाला. त्या दुपारी शंकरभाऊ आणि गणपतराव यांनी पत्राप्रमाणे पाकिटात घालून आप्त-मित्र-ग्राहकबंधू अशा ३०० मंडळींना हा अंक पाठविला. या अंकाच्या शिरोभागी
आळस अवघाची दवडावा । यत्न उदंड करावा ।
शब्द मत्सर न करावा । कोणा एकाचा ।॥।
असे रामदासांचे वचन छापले होते. अंकामध्ये '' किर्लोस्कर खबर'' हे एक छोटेखानी वर्तमानपत्र असून, त्यामधून कारखान्याचे ग्राहक, मित्र व चाहते यांना कारखान्याच्या उद्योगाची व प्रगतीची नि्यामित माहिती देऊ. वाचकांनीही त्यांचे अनुभव व माहिती कळवून 'किर्लोस्कर खबर'ची उपयुक्तता वाढवाबी'' अशी संपादक या नात्यांनी विनंती केली होती. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंक बिनचूक प्रसिद्ध होईल, मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक लेखाला ऐपतीप्रमाणे मोबदला दिला जाईल असे सुरुवातीपासून धोरण ठेवले होते.,
याच अंकात ''एफिशिएन्सी'' या मासिकावरून अनुवादित केलेली एक गोष्ट दिली होती. वर्तमानपत्र टाकणारा एक मुलगा बर्फाच्या वादळात सापडून अपंग झाला; पण अनाथाश्रमात राहण्याचे नाकारून, भीक न मागता, आपलो बुद्धी चालवून-शिक्षण घेऊन नंतर तो बॅंकिंग असोसिएशनचा अध्यक्ष झाला. त्याची स्फर्तिदायक हकिगत दिली होती. दुसरा लेख 'युद्धोत्तर साम्राज्याचा व्यापार' या इंग्रजी पुस्तकावरून लिहिलेला होतां. 'शांतता झाल्यावर सर्वच राष्ट्रे हिंदुस्थानावर बुभुक्षिताप्रमाणे तुटून पडण्याची तयारी करीत आहेत. ' हे सांगून, 'जोपर्यंत आमच्या देशबांधवांना स्वदेशी धंद्याबद्दल प्रेम ब स्वाभिमान वाटत नाही, तोवर कुणी घरही धुवून नेले तरी तक्रार करायला काय जागा आहे?' असे उपरोधाचे उद्रारही नमूद केले होते. शंकरभाऊंची देशी उद्योगाबद्दलची कळकळ हे उद्गार उत्तम प्रकारे दाखवितात. या अंकात दूत मासिक, सोलापूर हंडलूम विव्हींग कंपनी, ओगले यांचे काचसामान अशा जाहिराती आहेत.
Hits: 92