मनोगत
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या व्यक्तिची चरित्र मालिका ' महाराष्ट्राचे शिल्पकार'' या योजनेतून प्रसिद्ध
करावयाचे ठरविले, त्यामध्ये श्री. शंकरराव किर्लोस्कर यांचे चरित्र लिहिण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी मंडळाची आभारी आहे. शंकररावांच्या सहवासात
अनेक वर्षे राहिल्यामुळे आणि त्यांनी लिहिलेल्या शंवाकिय, यांत्रिकाची यात्रा या पुस्तकांचा माझ्या लेखनास आधार मिळाला आहे.
किर्लोस्कर उद्योग समुहाची मूळसंस्था किर्लोस्कर ब्रदर्समध्ये शंकरराव संचालकातील एक होते. आणि पुढेही कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक म्हणून त्यांनी १२ वर्षे काम केले. त्या काळात येऊ घातलेल्या औद्योगिक युगास आवश्यक अशी प्रयलवादी, आत्मविश्वासू आणि आधुनिक विज्ञान दृष्टिची माणसे घडविण्यासाठी त्यांनी १९२० मध्ये ''किर्लोस्कर मासिक'' सुरू केले नंतर १९३० मध्ये स्त्रियांनीही आपल्या सामर्थ्याची ओळख करून घेऊन स्वत:ची उन्नती करावी म्हणून ''स्त्री मासिक'' काढले.
शंकरराव स्वत: उत्तम चित्रकार असल्याचा प्रत्यय. मासिकांची मुखपृष्ठे, कथा, लेख यामधील बोलकी चित्रे आणि मार्मिक टीका करणारी व्यंगचित्रे यामधून येतो आणि अशा माध्यमांचा उपयोग करून मासिकाच्या आकर्षक मांडणीचा त्यांनी धडाच घालून दिला. आणि वाचकांच्या मनात सौंदर्यदृष्टीची जाणीव पेरली.
आपला समाज डोळस, निर्भय ब लढाऊ होण्यासाठी त्याची वैचारिक ताकद वाढली पाहिजे. नव्या राष्ट्राबरोबर नवी संस्कृती, नवा मानवधर्म उदय पावणार आहे, हे विसरता कामा नये. व्यक्तीला क्षुद्र कस्पटासारखे वागविणे ही मोठी चूक होईल, म्हणून व्यक्तीच्या आणि समाजाच्या विचारशक्तीला आवाहन यांवर त्यांचा भर
होता याचे सुंदर बोलके प्रतिक म्हणजे निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी एका सामान्य शेतकऱ्याचा पुतळा कारखान्याच्या प्रवेशद्वागसमोर उभा केला त्याखाली शब्द होते,
''तुझा विसर न व्हावा''.
या पुस्तकाच्या वाचकानाही हे शब्द पुन्हा पुन्हा आठवावत.
-शांता किर्लोस्कर
Hits: 90