७. आणीबाणी विरुद्ध संघर्ष आणि जनता पक्ष - ८
अपेक्षापूर्ती
जनता पक्षाये सरकार दिल्लीत अधिकाररूढ झाल्यावर लोकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. सुरुवातीस नव्या सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्या, आणीबाणीच्या काळात घटनेची जी मोडतोड करण्यात आली होतो. ती फक्त दुरुस्त करून देशातील लोकशाही पुन्हा धोक्यात वेणार नाही, ही तरतूद जनता शासनाने तत्परतेने केली. ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे लोकशाहीवर पुन्हा आघात होणार नाही अशी तरतूद करण्यात आली. लोकांचे जीवित आणि स्वातंत्र्य अबाधित राहील अशी तरतूद असणारी ४४ वी घटना दुरुस्तीही मंजूर झाली, रेल्वेमंत्री आ. मधु दंडवते यांनी रेल्वेच्या अंदाजपत्रकात कोकण रेल्वेसाठी पैशांची तरतूद करून या उपेक्षित भागाला न्याय दिला. १९७८-७९ साली कृषी-उत्पादनाने उच्चांक गाठला आणि औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग ७ ते ८ टक्के राहिला. चलनवाढीचा वेगही कमी झाला.
अपेक्षाभंग
परंतु हे सारे होत असतानाच सत्तास्पर्धेमुळे जनता पक्षात कुरबुर सुरू झाली. काहो दिवसात ही तेढ वाढत गेली. जयप्रकाशजी आणि एस्. एम्. यांनी दिलेल्या इशार््यांकडे कोणी लक्ष दिले नाही आणि अखेर आपसांतील संघर्षामुळे जनता पक्षाचे सरकार कोसळले. नानासाहेब गोरे यांनी तात्काळ इंग्लंडमधील उच्चायुक्त पदाचा राजीनामा दिला. मंत्रिमंडळ पडल्यावर एस्. एम्. म्हणाले, 'जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकत्र आलो. परंतु सत्तेवर येताच अनेकांना जयप्रकाशजींचा सल्लाही नकोसा झाला. याचे पर्यवसान म्हणजे कोणीही खाली न खेचता सरकार भाऊबंदकीमुळेच कोसळले.'
नव्याने निवडणुका झाल्यावर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला लोकसभेत बहुमत मिळाले. केंद्रात इंदिरा गांधीचे सरकार आल्यावर काही दिवसांत महाराष्ट्राचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले आणि निवडणुकीनंतर इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले.
जयप्रकाशजींचे निधन
जयप्रकाश नारायण यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर ८ ऑक्टोबर १९७९ला त्यांचे निधन झाले. एस्. एम्. आणि जयप्रकाशजी यांच्यामध्ये एकमेकांबद्दल विलक्षण जिव्हाळा होता. १९३४ पासून दोघांमधील स्नेह अधिकाधिक दृढ होत गेला. जयप्रकाशजींच्या मृत्यूनंतर जे. पीं.च्या इन्छेनुसार सर्व व्यवस्था करून एस्. एम्. जड अंत:करणाने पाटण्याहून पुण्यास परतले.
जनता पक्षाचे केन्द्रातील आणि पुलोदचे महाराष्ट्रातील सरकार पडल्यानंतर एस्. एम्. यांचे शाळेपासूनचे निकटचे मित्र गोपीनाथ तळवलकरांची त्यांच्याशी भेट झाली तेव्हा तळवलकर म्हणाले, 'जयप्रकाश आणि तू इतक्या कष्टाने उभा केलेला हा इमला कोसळला यामुळे तुला किती दु:ख झाल असेल, हे मला समजतं.' एस्. एम्. यावर हसले आणि म्हणाले, 'जयप्रकाश माझ्यापेक्षा भावनाप्रधान होते त्यामुळे त्यांना जनता पक्षातील भांडणे पाहून फार दु:ख झाले आणि 'माझा बाग उद्ध्वस्त झाला', असा त्यांनी जणू टाहोच फोडला. माझ्या आयुष्यात मी इतक्या बाबत अपयश सोसले आहे की माझे मन निबर झाले आहे, मला खरं वाईट हे वाटतं की, आपलं सरकार असताना गरिबांना मदत करण्याची अधिक संधी मिळत असे. आता ते फारसं करता येत नाही, याच मात्र दु:ख होतं.
मुंबईतील संप
याच वेळो मुंबईत कापड गिरणी कामगारांचा संप डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ चालला होता. या संपातील बहुसंख्य कामगार महाराष्ट्रातील, बिशेषत: कोकणातील होते. हा संप मिटणे उचित होईल असे एस्. एम्. यांना वाटत होते. म्हणून त्यांनी डॉ. दत्ता सामंत यांना बोलावून घेतले आणि विचारले, 'संप मिटविण्यासाठी मी दिल्लीला जाऊन संबंधित मंत्र्यांशी बोलायला तयार आहे. कोणत्या मागण्या मान्य झाल्यावर तू तडजोडीस तयार होशील ते सांग.' परंतु दत्ता सामंत यांनी एस. एम्.ना 'आपण मध्यस्थी करू नये. मी संप यशस्वी करण्यास समर्थ आहे', असे सांगितले. यावर एस्. एम्. म्हणाले, 'मी ट्रेड युनियन क्षेत्रात १९४० पासून काम करीत आलो आहे.
मलाही मुंबईतील कामगारांच्या ताकदीचा अंदाज आहे. तू साहसी धोरण स्वीकारून कामगारांच्या जीवाशी खेळतो आहेस, असे मला वाटते.' परंतु डॉ. दता सामंत यांनी एस्. एम् चा सल्ला मानण्यास नकार दिला. एस्. एम्, हे लढाऊ कामगार नेते असले तरी सन्माननीय तडजोड करण्यास ते तयार असत. त्यामुळे ते वैतागाने दत्ता सामंत यांना म्हणाले, 'तुझे धोरण मला आत्मघातकी वाटते. अर्थात निर्णय तूच घ्यायचा आहेस.' येथेच दोघांची बोलणी संपली आणि दत्ता सामंत उठून गेले. त्या वेळी मी विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेता होतो आणि ही बोलणी माझ्याच निवासस्थानी झाली. डॉ. दत्ता सामंत गेल्यावर एस्. एम्. विषादाने मला म्हणाले, 'प्रधान, मी आता कालबाह्य झालो, असं वाटतं."
गौरव आणि लो. टिळक पुरस्कार
१९८४ नंतर एस्. एम्.ना हे फारच तीव्रतेने वाटू लागले. एस्. एम्.चा ५०वा, ६०वा आणि ७५वा हे सारे वाढदिवस सार्वजनिक समारंभ करून त्यांच्या मित्रांनी, अनुयायांनी आणि चाहत्यांनी साजरे केले. पुणे महानगर पालिकेने मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीव डी. लिट् पदवी देऊन त्यांच्या देशसेवेचा गौरव केला. 'मी एसेम्' या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाला मॅजेस्टिक प्रकाशनाचा पहिला पुरस्कार मिळाला. त्यांच्या जीवनाचा आणि कार्यांचा अभ्यास करून चाळीसगावचे प्रा. स. म. विसपुते यांनी पीएच्. डी.साठी प्रबंध लिहिला आणि त्यांना पीएच.डी. मिळाली.
एस्. एम. म्हणाले, 'या अनेक गौरव समारंभांमुळे मी संकोचून गेलो. मला माझ्या मित्रांचे मन मोडणे शक्य नव्हते. त्यांच्या माझ्याबद्दलच्या सद्धावनांचा मी आदर करतो. पण मी तसा मोठा नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, याची मला जाणीव आहे. अर्थात् मी माणूसच आहे. त्यामुळे लोकांनी माझ्या ठिकाणच्या अल्प गुणांचेही कौतुक केले, याचा मला आनंद वाटलाच. समाजाने मला आयुष्यभर सांभाळून घेतले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.'
१९८३ साली टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 'लोकमान्य टिळक सन्मान पारितोषिक' एस्. एम्. यांना देण्यात आले, तेव्हा मात्र एस्. एम. यांना धन्य वाटले. एस्. एम्. यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे, "टिळक सन्मान पारितोषिक" मला देण्याचे विश्वस्तांनी ठरविले, तेव्हा गेली पंचावन्न वर्षे मी माझे जीवन ज्या प्रकारे व्यतीत केले त्याबद्दलची प्रसाद-पावतीच लोकमान्यांच्या नावाने चालणाऱ्या ट्रस्टकडून मला मिळाली, असे मी समजलो. मी अर्थात् निमित्तमात्र होतो. राष्ट्रीय कार्यात सहकार्य केलेल्या हजारो ज्ञात-अज्ञात सहकाऱ्यांचाही सन्मान त्या पारितोषिकामुळे झाला आहे, अशी माझी भावना आहे. लोकमान्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत हायस्कूलपासून पदवी परीक्षेपर्यंत मला विनामूल्य शिक्षण मिळाले. हाही त्यांचा प्रसादच होता. पुढे सार्वजनिक जीवनात मी उतरलो तेव्हांही काही वर्षे 'केसरी'ने माझा प्रतिपाळ करावा, हाही लोकमान्यांचा माझ्यावर अनुग्रह नव्हता काय? आणि अखेर आयुष्याच्या सायंकाळी हे सन्मान पारितोषिक व महावस्त्रांची ऊब! माझे अवघे जीवनच त्यामुळे प्रसादमय झाले."
Hits: 126