७. आणीबाणी विरुद्ध संघर्ष आणि जनता पक्ष - ७
पावित्र्याची विटंबना
नामान्तरप्रकरणी एस्. एम्. यांच्यावर नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतानेही चिखलफेक केली आणि 'मराठवाड्यातील दंगलीस एस्. एम्.च जबाबदार आहेत' असे बेजबाबदार उद्गार काढले. सर्वात निंद्य घटना उदगीर येथे घडली. प्राचार्य डोळे यांच्या घरी एस्. एम्. उतरले होते. प्राचार्य डोळे म्हणाले, 'विद्यार्थी तुम्हांला निवेदन देऊ इच्छितात. तुम्ही ते घ्याल का?' एस्. एम्. म्हणाले,'घेईन हो.' प्रा. डोळ्यांचे घर लहान होते म्हणून एस्. एम्. आणि पन्नालाल सुगणा शेजारच्या मोठ्या घरात जाऊन बसले. पुढे जे घडले त्याचे वर्णन एस. एम्. यांनी त्यांच्या आत्मकथेत पुढीलप्रमाणे केले आहे.
"मी व पन्नालाल जाऊत बसलो, दहा बारा मंडळी आली. त्यांच्यातून विशीच्या आतील दोन तरुण उठले. निवेदन देण्यासाठी त्यांनो कागद पुढे केले व चटकन एकाने प्रथम पन्नालाल सुराणा यांच्या गळ्यात व दुसऱ्याने माझ्या गळ्यात जोड्यांची एकेक माळ घातली. तो सगळाच प्रकार अकल्पित होता. माळा आम्हा दोघांच्या गळ्यात पडताच आलेल्यांनी चटकन त्या काढून टाकल्या, ते दोघे तरुण उभेच होते. त्यांना बसावयास सांगून मी विचारले, 'तुम्ही हे हार घालून काव मिळकलेत?' ते तरूण पढल्याप्रमाणे म्हणाले, 'दंगलोस तुम्ही जबाबदार आहात' मग मी त्यांना थोडे सुनावलेच. मी म्हणालो, 'तुम्ही फार मोठी चूक केली आहे. तुम्ही तुमच्या प्राचार्यांचा - डॉ. डोळ्यांचा विश्वासघात केला आहे. हा अक्षम्य गुन्हा आहे. जोड्यांची माळ घातली, यात माझी बदनामी केलीत असे तुम्हांला वाटत असेल, तर तुमचे साफ चुकले आहे. माझा अपमान मी वाईट वागलो तरच होईल. माझा अपमान दुसरा कोणी करू शकत नाही. अरे वेड्यांनो, जोड्यांची माळ घालायची होती तर निदान नवीन जोडे तरी आणायचेत. मला ते उपयोगी पडले असते.'
या सर्व घटनेबद्दल महाराष्ट्रात सर्व जाणकारांना फार दु:ख झाले. अनेकांना तीव्र संताप आला. वस्तुत: ज्यांची घरे जाळली गेली, त्या दलितांना धीर द्यायला एस्. एम्. गेले होते. अनेक दलित मंडळी त्यांना म्हणाली, 'राखीव जागा हव्या तर काढून टाका, कारण खेडोपाडी आम्हाला संरक्षण कोण देणार?* एक दंगलग्रस्त दलित एस. एम्.ना म्हणाला, 'आमचे गाडगे-मडक्याचे संसार तरी सुरक्षित असू देत." हे उद्गार ऐकून एस्. एम्.च्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. एस्. एम्. नी लिहिले आहे, 'त्या दलिताचे उद्गार सहदय माणसाचे काळीज कातरून टाकणारे होते.'
उदगीर येथील दुर्दैवी घटनेनंतरही एस्. एम्. यांनी मराठवाड्यात खेडोपाडी जाऊन दलितांचे अश्रू पुसले. मुंबईस आल्यावर पत्रकार परिषदेत एस् एम. म्हणाले, 'सरकारने मराठवाड्यातील दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी, त्या चौकशीत दंगलीस मी जबाबदार आहे, असे ठरले तर मो देहान्त शासनही भोगण्यास तयार आहे.'
या. आग्निदिव्यातूनही एस्. एम.चे व्यक्तिमत्व उजळून निघाले. एस्. एम्.'उलणीयाजी विर्ड॒ संघर्य आणि डजता पक १०१ यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलेल्या नामाऱ्तर या प्रकरणात शेवटी लिहिले आहे, 'या नामान्तर प्रकरणात मतपरिवर्तन झाल्याचे एक तरी उदाहरण दाखवा असे कोणी मला म्हणाले तर ते आव्हान मी आता सहज स्वीकारू शकतो. मला तो दिवस आठवतो. १९८० साली नामान्तराच्या प्रश्नावर मुंबईत मोर्चा निघून सत्याग्रह व्हायचा होता. आझाद मैदानापासून मोर्चा निघणार म्हणून सत्याग्रही तेथे जमू लागले. मी तेथे मैदानावरच होतो. एवढ्यात कोणीतरी तरुणाने पायाला स्पर्श करून मला नमस्कार केला. या तरुणाचा चेहरा ओळखीचा दिसला, पण नाव गाव आठवेना. मी त्याला कोण, कुठचे विचारल्यावर, तो म्हणाला, 'ओळखल॑ नाहीत? मीच तो उदगीरला आपल्या गळ्यात जोड्यांची माळ घालणारा. आता मी तो पूर्वीचा उरलो नाही. त्या कृत्याचा मला पश्चाताप झाला, आज मी नामान्तराच्या लढ्यातला एक सत्याग्रही म्हणून इथे आलो आहे.' त्याचे ते मनापासुन उच्चारलेले शब्द ऐकत असता मला वाटले, मराठवाड्यात आयुष्यातील सर्वांत मोठा पराभव मी पत्करला. ही गोष्ट खरी असली तरी पराभवाच्या मिट्ट काळोखात अशी एखादी पणती यथाशक्ती प्रकाश देण्याचं काम करीत आहे. ही काही कमी समाधानाची बाब नव्हे."
Hits: 133