४. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन - ५
परंतु निवडणुकीच्या निकालानंतर पुण्यामध्ये झालेल्या समाजवादी पक्षाच्या प्रांतिक कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या वेळी एस्. एम्. मात्र नेहमीप्रमाणे उत्साही आणि आनंदी होते. ते कार्यकर्त्यांना म्हणाले, "राजकारणात यशाने हुरळून जाता कामा नये. आपण सर्वजण समाजवादी समाजरचना व्हावी म्हणून झगडतो आहोत. पाच वर्षं या उद्दिष्टासाठी मी असेंब्लीत आणि नानासाहेबांनी पार्लमेंटमध्ये काम केले. परंतु समाजवादासाठी कार्य करण्याच्या त्याच केवळ जागा नाहीत. तुमच्यापैकी बहुसंख्य - जवळजवळ सर्व कार्यकर्ते-आमदार खासदार नसताना श्रमिकांचे लढे लढवता, आता आम्ही दोघेही तुमच्याबयेबर काम करू. निराश झालात तर कामावर परिणाम होईल, ते होऊन चालणार नाही. सामाजिक न्यायासाठी आपण सुरू केलेली लढाई चालूच गहिली पाहिजे." बैठकीच्या शेवटी खानदेशातील लोढूभाऊ फेगडे बोलले. ते म्हणाले, "एस्. एम्. आणि मी फैजपूर कॉँग्रेसपासूनचे दोस्त. एस्. एम्. पडल्याथे मला रावेरला कळले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मला पुण्याच्या मतदारांचा संताप आला. ज्या माणसाने संयुक्त महाराष्ट्र मिळवून देण्यासाठी प्राण पणाला लावले त्याची मतदारांना कदर नाही. यामुळे मला त्या रात्री जेवण गेले नाहे. पण आज मी एस्. एम्.चे भाषण ऐकले. मी आता पुन्हा जोराने कामाला लागणार.
फैजपूर काँग्रेसच्या वेळी प्रचार मोहिमेत एका गावात लोकांनी आमची हु्र्यो केलो. मी निराश झालो. एस्: एम्. मात्र जोशात होते. ते म्हणाले, "लोढूभाऊ, चल पुढच्या गावात लोक आपली वाट पहात असतील आणि तसच झालं. त्या वेळी आणि आजही मला कळलं की आपला हा सेनापती कधी रणांगण सोडणार नाही. तेव्हा एस्. एम्.नी जे सांगितले तेच मी आज सांगतो. लढाई हरली म्हणून थांबायचं, पळायचं नसतं. कारण आपल्याला युद्ध जिंकायचं असतं. आपण निवडणुकीची लढाई आज हरलो आहेत. पण समाजवादाचं युद्ध जिकणार आहोत. कारण आपला सेनापती आहे एस्. एम्"
लोढूभाऊंनी सगळ्या कार्यकर्त्याच्या मनातली भावना बोलून दाखवली. एस्. एम्. नी पुन्हा उत्साह्मने कामाला सुरुवात केली आणि त्यांचे समाजवादी पक्षातील कार्यकर्ते गीत म्हणू लागले.
"समाजवादी साथी गाती एका आवाजात,
ध्येयाचे हे गीत घुमवू अवघ्या अवकाशात!
कसणाराची आता होऊ दे धरणो,
श्रमणाराची आता होऊ दे गिरणी
ध्येय आमुचे हे ठरले,
कार्य दुसरे ना ठरले
क्षणभर आता राहू न आम्ही शांत
कधी ना शांत, कधी ना शांत
समाजवादी साथी गाती एका आवाजात,
ध्येयाचे हे गीत धुमवू अवघ्या अवकाशात"