२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ११

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

यानंतर काही दिवसांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धूमिगत चळवळीतल्या अमुख नेत्यांची बैठक झालो. बैठकोस जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, डॉ. लोहिया, अरुणा असफअल्ली, एस्‌. एम्‌. जोशी हे हजर हेते. स्वातंत्र्य आंदोलनाचा जोर ओसरला होता. हजारो लोक तुरुंगात होते. भूमिगत चळवळीतीलही अनेक जण पकडले गेले होते. अनेकांवर खटले चालू होते. अरुणाबाई त्या दिवशी फारच खिन्न होत्या. बैठकीच्या सुरुवातीस त्यांच्या क्षेत्रातील कामाचा आढावा घेतान! त्यांच्या बोलण्यात निराशेचा सूर उमटला. त्यांचे बोलणे पुरे झाल्यावर जयप्रकाश नारायण यांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, 'आपल्या लढ्याचा एक अध्याय संपला आहे हे खरे, परंतु दुसरा सुरू होण्याची शक्यता नक्कीच आहे. तुम्हाला माहीत आहे ना की सुभाषचंद्र जर्मनीहून पाणयुडीने हजारो मैल समुद्र ओलांडून ६ मे ला पूर्वेकडे सेवान इथे पोहोचले आणि नंतर ते १६ मे ला टोकिओला पोहोचले. तेथे त्यांनी ब्रिटिश सेनेतील जे भारतीय लष्करी अधिकारी आणि जवान जपानच्या ताब्यात कैदो होते त्यांना एकत्र करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढण्याचे आवाहन केले आणि सुभाषबाबूंनी या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांची आणि जवानांची आझाद हिंद फौज स्थापन झाल्याची घोषणा चारच दिवसांपूर्व रंगून येथे केली. हे जाहीर केल्यावर सरसेनापती या नात्याने या सेनेला उद्देशून भाषण करताना सुभाषबाबूंनी 'चलो दिल्ली' ही स्फूर्तिदायी घोषणा केली आहे. आपला भारतातील स्वातंत्र्य लढा ज्या वेळो जोरात होता, त्या वेळी हे घडावयास हवे होते. परंतु मला अशी खात्री वाटते की सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना जेव्हा भारतात प्रवेश करील तेव्हा आपण पुन्हा प्रचंड उठाव करू, यासाठी आपल्याला तयारी केली पाहिजे. देशाच्या सर्व ठिकाणचे कार्यकर्ते मणिपूरकडे न्यावयाचे आणि भारताच्या ईशान्य आणि पूर्व भागात 'आझाद दस्ते' उभे करायचे, असा माझा इरादा आहे, आता आपण या कामाला लागले पाहिजे.

पावसाळा संपला की कोहिमामार्गे मी गुप्तपणे ब्रह्मदेशात जाऊन सुभाषबाबूंना भेटेन आणि नंतर काय करावयाचे ते आपण ठरवू.' जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्वा माहितीमुळे बैठकीचा रंगच पालटला. एस्‌. एम्‌. म्हणाले की, लांब काळोख्या बोगद्यातून बाहेर यावे आणि उजेड दिसावा असे वाटले. जयप्रकाशजींनी १ सप्टेंबरला 'सर्व स्वातंत्र्य सैनिकांस पत्र' यामध्ये सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेची ही माहिती दिली. १८ सप्टेंबरला एस्‌. एम्‌. जोशी, मधू लिमये आणि विनायकराव कुलकर्णी या तिघांना त्यांच्या नळबाजारातील दलाल बिल्डिंग या निवासस्थानी पोलिसांनी अटक केली आणि सप्टेंबर महिन्यातच फ्रॉंटियर मेलमधून प्रवास करीत असताना जयप्रकाश नारायण यांनाही पकडण्यात आले. एस्‌. एम्‌. यांना अटकेनंतर मुंबईस पोलिस लॉक अपमध्ये ठेवले. एक वर्षभरच्या भूमिगत जीवनात एस्‌. एम्‌. यांना विविध प्रकारचे अनुधव आले. नंतर चळवळ संपल्यावर एकदा ते आम्हांला सांगत होते, 'भूमिगत असताना स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना जी आपुलकी होती त्यामुळे मला अपार प्रेम अनपेक्षित मदत मिळाली.' एस्‌. एम्‌. एकदा म्हणाले, 'गांधीजींचा उपास चालू असताना आम्हा भूमिगतांची जी तडफड झाली ती आजही आठवते. गांधीजींच्या उपासाच्या दहाव्या दिवशी पुण्याहून असा निरोप आला की गांधीजी आता केवळ काही तासांचे सोबती आहेत. जयप्रकाशजी अच्युतरावांना म्हणाले, 'भूमिगत चळवळ चालेवणाऱ्यांसाठी आणि आम जनतेसाठी ताबडतोब काहीतरी लिहिले पाहिजे.' या बुलेटिनचा इंग्रजी मसुदा अच्युतराव पटवर्धनांनी आणि मराठी मसुदा साने गुरुजींनी लिहावा असे ठरले. दोघेही लिहायला बसले पण दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. गांधीजी हयात नाहीत, ही कल्पनाही आम्हां सर्वांना असह्य होत होती. सुदैवाने दुसऱ्या दिवशी गांधीजींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी आली आणि आमच्या मनावरथे ओझे उतरले.'

महाराष्ट्र कटाचा खटला एस्‌. एम्‌. यांना काही दिवसांनी मुंबईला आर्थर रोड तुरुंगात पाठविण्यात आले. पुण्यात कॅपिटॉल बॉम्ब खटला प्रथम सुरू झाला. सरकारने महाराष्ट्र कटाचा खटलाही भरण्याचे ठरविले. या खटल्यात शिरुभाऊ लिमये, एस्. एम्‌. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी आदींना आरोपी करण्यात आले. परंतु पुरेसा पुरावा न मिळाल्यामुळे तो खटला उभाच राहिला नाही, पुढे एस्‌.एम्‌.ना नाशिक तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे नानासाहेब गोरे आणि साने गुरुजी त्यांच्या समवेत होते. तेथे गोकुळअष्टमीला साने गुरुजींनी राजबंद्यासमोर कीर्तन केले. त्या दिवशी एस्‌. एम्‌. यांनी त्यांच्या दैनंदिनीत लिहिले, 'आज गोकुळअष्टमीचा दिवस. अनेकांनी उपास केला. मी मात्र केला नाही, तरीपण मन प्रसन्न आहे. साने गुरुजींचे कीर्तन फार सुंदर झाले. गुरुजींना गाता येत नाही, पण काय तन्मयता. जणू गंगेचा प्रवाहच चालला आहे. माझ्या भावना आज अगदी उचंबळून आल्या. मी अत्यंत भाविकपणे साने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले. माझ्या डोळ्यांत अश्रू आले. शेवटी आरतोच्या भजनाला तर तल्लीनतेने मी नाचलोदेखील. लोकांना आक्षर्य वाटले. मला वाटले मो भावुक म्हणून असे झाले. पण कीर्तनानंतर बराकीत परत येताना नानासाहेब गोरेही म्हणाले, की साने गुरुजींच्या कीर्तनामध्ये आणि वक्‍तृत्वामध्ये सुचितेकडे नेण्याची विलक्षण शक्ती आहे. आमचे साने गुरुजी म्हणजे निर्मळ प्रेमाचा समुद्रच. नाशिक, साबरमती आणि येरवडा कॅंप जेल अशा तीन तुरुंगाचा अनुभव दोन वर्षे घेत अखेर १८ सप्टेंबर १९४५ला एस्‌. एम्‌.ची अन्य सहकार्ऱ्यांच्या समवेत तुरुंगातून मुक्तता झाली.

फाळणीचे अग्निदिव्य

एस्‌. एम्‌. १९४७च्या जुलैमध्ये केलेल्या एका भाषणात म्हणाले. '१९४५ साली आम्ही समाजवादी जेलमध्ये होतो. तरीं पण निराश नव्हतो. परंतु सुटका झाल्यावर देशातील हिंदु-मुसलमान दंगे, नोआखली आणि बिहारमधील रक्तपात, यामुळे मन फार खिन्न झाले, ४ जुलै १९४६ मुंबईला अ. भा. काँग्रेस कमिटीची बैठक झाली. त्या वेळी त्या बैठकीत जयप्रकाश नारायण आणि युसूफ मेहेरअल्ली या समाजवादी नेत्यांनी देशाच्या फाळणीस कडाडून विरोध केला. परंतु आम्ही अल्पमतात होतो. त्रिमंत्री योजनेचा ठराव मंजूर झाला त्या वेळी म. गांधींनाही देशाची फाळणी होणे मंजुर नव्हते. मे १९४७ पर्यंत गांधीजी हे फाळणी अपरिहार्य मानीत नव्हते. परंतु ४ जूनला प्रार्थनेच्या वेळो ते म्हणाले, 'देशाच्या विभाजनाची योजना काँग्रेस आणि पुस्लिम लोंग यांनी मान्य केली आहे. मी काँग्रेसचा सेवक असल्यामुळे काँग्रेस विरुद्ध बंड करणार नाही.' यानंतर आम्हां समाजवाद्यांपैकी जयप्रकाश नारायण आणि डॉ. लोहिया यांनी गांधीजोंचो भेट घेऊन विचारले, 'आपण पूर्वी फाळणीस विरोध केला असताना आता मान्यता का देत आहात?' यावर गांधोजी म्हणाले, "माझे आजपर्यंत जे निकटचे लोक मला सोडून गेल्यानंतर तुमच्यांतून नवे नेतृत्व घेऊन, फाळणीच्या विरोधात संघर्ष उभा करण्याइतकी शक्ती आता माझ्यापाशी उरलेली नाही."

एस्‌. एम्‌. पुढे त्यांच्या भाषणात म्हणाले, 'देशाची फाळणी झाली याचे आम्हां समाजवाद्यांना तीव्र दु:ख होते आणि आहे. फाळणीच्या विरोधी शक्ती आम्ही संघटित करू शकलो नाही, ही आमची कमजोरी आहे. फाळणी हा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत निर्माण झालेल्या राष्ट्रवादी शक्तींचा पराभव आहे.'

एस्‌, एम्‌. जोशी हे दलप्रमुख म्हणून पुन्हा काम करू लागले. राष्ट्र सेवा दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी १९४२च्या स्वातंत्र्य संग्रामात धैर्याने काम केले. भूमिगत चळवळीत, तसेच मोर्चांमध्ये आणि सत्याग्रहात भाग घेतला. त्यामुळे अनेक तरूण राष्ट्र सेवादलाकडे आकृष्ट झाले. या सैनिकांचा एक भव्य मेळावा घ्यावा, असे एस्‌. एम्‌. यांनी ठरविले. त्याप्रमाणे सातारा येते १९४६ला राष्ट्र सेवादलाचा प्रचंड मेळावा भरला. सुभाषबाबृंच्या आझाद हिंद सेनेतील एक थोर कॅ. शहानवाजखान सातारा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. एस्‌. एम्‌. यांनी तरुणांना राष्ट्र सेवादलाचे, राष्ट्रोयत्वाचे आणि समतेचे संस्कार समाजातील विद्यार्थि विद्यार्थिनींच्यावर करण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्याची मंगलप्रभात

१५ ऑगस्ट १९४७ बद्दल एस्‌. एप्‌. जोशींनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे, 'स्वातंत्र्य प्राप्तीच्या क्षणी मी पुण्यात होतो. मी, अजेय आणि ताराबाई पोलिस ग्राऊंडवर झालेल्या सरकारी ध्वजवंदनाचा सोहळा पाहण्यासाठी गेलो होतो. अजेय त्यावेळी सात वर्षांचा होता. आम्ही इतरांप्रमाणे गर्दीत उभे राहूनच तो सोहळा पहात होतो. स्वातंत्र्य सैनिक म्हणून मला खास निमंत्रण नव्हते. गर्दीत उभे राहून अजेयला समारंभ दिसत नव्हता. म्हणून मी त्याला उचलून धरले आणि त्याला ते दृश्य दाखाविले. स्वतंत्र भारताचा तो पहिला स्वातंत्र्यदिन, ध्वजवंदनाचा समारंभ जनसागराच्या वेढ्यात राहून बघत असताना माझ्या अंगावर रोमांच उभे शहिले.'

Hits: 100
X

Right Click

No right click