२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ७
युद्धविरोधाबद्दल कारावास
एस्. एम्.चे एक सहकारी नाना पुरोहित हे महाड तालुक्यात काम करीत होते. त्यांनी बोरदाडी येथे १९४०च्या मे महिन्यात शेतकरी परिषद घेतली. परिषदेस त्यांनी एस्. एम्. जोशोंना बोलविले. एस्. एम् बरोबर बंडू गोरे आणि माधव लिमये हेही गेले होते. या परिषदेत या तिघांची भाषणे झाली. त्यात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्याला चळवळ करावी लागेल हे सांगतानाच एस्. एम्. यांने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाषण केले. कसणाऱ्याची जमीन झाली पाहिजे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले. भाषण करून आणि परिषदेचे काम संपवून एस्. एम्. पुण्याला गेले आणि १० जूनलाच पोलीस पकड वॉरंट घेऊन आले. वॉरंट बजावल्यावर एस्. एम्. म्हणाले, ''मला माझ्या
पत्नीला भेटायचे आहे.'' ताराबाई त्या वेळी बाळंतपणासाठी थोरल्या बहिणीकडे गेल्या होत्या आणि मुलाचा - अजेयचा - जन्म होऊन चौदाच दिवस झाले होते. एस्. एम्. यांनी शांतपणे ताराबाईंचा निरोप घेतला. ताराबाई म्हणाल्या, ''तुम्ही आमची काळजी करू नका. तुरूंगात प्रकृतीला जपून रहा.'' युद्धविरोधी भाषणाबद्दल खटला चालून एस्. एम्. आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना १ चर्षाची सजा झाली, प्रथम त्यांना ठाणे येथील तुरुंगात नेले आणि काही दिवसांनी नाशिक येथील तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली.
म. गांधींनी १९३९ मध्ये महायुद्ध सुरू झाल्यानंतर प्रथम इतकेच जाहीर केले होते की, ते अहिंसावादी असल्यामुळे त्यांचा युद्धाला विरोध आहे. त्याचबरोबर त्यांची अशीही भूमिका! होती कौ ब्रिटन युद्धात गुंतले असताना सामुदायिक लढा उभारून सरकारला अडचणीत टाकायचे नाही . परंतु १९४० च्या सप्टेंबरमध्ये म. गांधींनी त्यांच्या भूमिकेत बदल करून ऑक्टोबर महिन्यात युद्धाच्या विरोधामध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. आचार्य विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. त्यांना सरकारने चार महिन्यांची शिक्षा दिली. दुसरे सत्याग्रही पं. जवाहरलाल नेहरू हे होते. त्यांना मात्र सरकारने चार वर्षांची शिक्षा ठोठावली. एस्. एम्. यावेळी नाशिक तुरुंगात होते. ते बंडू गोरेला म्हणाले, 'यानंतर काही दिवसांनी पुढचे पाऊल म्हणून गांधीजी सामुदायिक लढा सुरू करतील असे मला वाटते.'एस्. एम्. नाशिकच्या तुरुंगात असताना १९४०च्या डिसेंबर महिन्यात जयप्रकाश नारायण अकस्मात पुण्यामध्ये नानासाहेब गोरे यांच्या घरी आले. जयप्रकाशजी युद्ध-विरोधी भाषणाबद्दल नऊ महिन्यांची शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटले होते. त्यांना पाहून नानासाहेब चकितच झाले. गांधीजींनी युद्धाच्या विरोधात वैयक्तिक सत्याप्रह नुकताच सुरू केला होता. जयप्रकाशजी
नानासाहेबांना म्हणाले, ''स्वातंत्र्याचा लढा हा केवळ वैयक्तिक सत्याग्रहाच्या स्वरूपात चालविणे मला अपुरे वाटते. आपल्याला देशभर जनतेचा उठाव करावा लागेल आणि त्याच्या जोडीला भूमिगत चळवळही चालवावी लागेल. हिटलरने युरोपात जे देश जिंकले तेथील स्वातंत्र्यवादी तरूणांनी भूमिगत चळवळ चालविली आहे. हिटलरच्या सैन्याने अनेकांना ठार केले तरी त्याच्याविरुद्ध हे शूर स्वातंत्र्यसैनिक भूमिगत राहून लढा देत आहेत. आपल्याला ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध असाच लढा द्यावा लागेल. भूमिगत चळवळ करून सरकार खिळखिळे (पॅरलाइज) करावे लागेल. याच्यासाठी आत्तापासून संघटना बांधावी लागेल. मी मुंबईला मेहेरअल्लीशी बोलतो. याचा तषशौल मी तुम्हाला नंतर पाठवीन.'' जयप्रकाशजी मुंबईला पोहोचतात तोच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि राजस्थानात देवळीच्या तुरूंगात स्थानबद्ध केले.
नाशिक तुरूंगात असताना एस्. एंम्.ना घरची मात्र फार काळजी वाटत होती. ताराबाई आणि तान्हा अजेय कसे राहात असतील, य कल्पनेने ते अनेकदा अस्वस्थ होत. सुदैवाने एस्. एम्.चे मित्र शंकरराव आगाशे यांनी ताराबाईना सर्व तऱ्हेची मदत केली. एस्. एम्.ना हे कळल्यावर त्यांच्या मनाची तगमग कमी झाली, परंतु त्यांचे पित्याचे अंत:करण मुलासाठी व्याकूळ होत होतेच. अखेर शिक्षा भोगून एस. एम्., बंडू गोरे आणि माधव लिमये हे १९४१च्या एप्रिल महिन्याच्या शेवटी सुटून बाहेर आले.
राष्ट्र सेवादलाची स्थापना
एस्. एम्. तुरुंगात असताना आणखीही एक महत्त्वाची घटना झालो. एकीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीला गती येत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार वाढत चालला होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ "सैन्यात शिरा" अशी भूमिका घेऊन ब्रिटिशांना युद्धप्रयत्नांतही मदत करीत होता. त्या वेळी शाळा कॉलेजात अभ्यासाव्यतिरिक्त फारसे अन्य कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी नसत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या तरी संघटनेत जावेसे वाटत होते. काँग्रेसचे राजकीय कार्य वाढत होते. परंतु तरुणांसाठी कॉँग्रेसची प्रभावी संघटना नव्हतो. विद्यार्थ्याच्या मनावर स्वातंत्र्यवादी आणि पुरोगामी विचारांचा संस्कार करण्यासाठी युवक संघटना असली पाहिजे असे अनेकांना वाटत होते. वा बाबतीत विचारविनिषय करण्याकरिता शिरुभाऊ लिमये आणि नानासाहेब गोरे यांनी पुण्यात काही निवडक मंडळींची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्र सेवादलाची स्थापना करावी असा निर्णय घेण्यात आला. या संघटनेने मुख्यत: तरुणांच्या मनावर व्यापक राष्ट्रवादी विचारांचा संस्कार करून त्यांच्या मनात स्वातंत्र्य चळवळीबद्दल आकर्षण निर्माण करावे, असाही निर्णय घेण्यात आला. एस्. एम्. जोशींना या संघटनेचे प्रमुख होण्याची विनंती करावी असेही एकमताने ठरले. या बेठकीनंतर काही दिवसांनीच नानासाहेष गोरे यांना गुलबर्गा येथील भाषणाबद्दल अटक होऊन शिक्षा झाली. काँग्रेसच्या वैयक्तिक सत्याग्रहाचा सरकारच्या युद्धप्रयत्नांवर, फार मोठा जरी परिणाम झाला नाही तरी शिस्तबद्ध रीतीने देशभरातून तीस हजार सत्याग्रही तुरुंगात गेले. याचा परिणाम म्हणजे राजकीय जागृती मोठ्या प्रमाणावर होऊन, स्वातंत्र्य आंदोलनास अनुकूल वातावरण निर्माण झाले.
एस्. एम्. जोशींना शिरुभाऊ लिमये यांनी पुण्यातील बैठकीचे वृत्त सांगितले आणि राष्ट्र सेवादलाची स्थापना करून एस्. एम्.ने दलप्रमुख व्हावे, अशी त्यांना विनंती केली. एस्. एम्. जोशींनी या सूचनेचा विचार करून राष्ट सेबादलाची सूत्रे हाती घेतली. जून १९४१ मध्ये राष्ट्र सेवादलाची स्थापना होऊन एस्. एम्. जोशी हे दलप्रमुख झाले. एस्. एम् चे आतापर्यंतचे जीवन राजकीय चळवळीत गेले होते. राष्ट्र सेवादलाची जबाबदारी घेताना स्वातंत्र्य चळवळीत समर्पण करण्याची प्रेरणा तरुणांना द्यावयाची असाच निर्धार त्यांनी मनाशी केला.
Hits: 94