२. स्वातंत्र्य संप्रामातील समर्पण - ६
ताराबाईंच्या बरोबर विवाह
एस्. एम्. आणि तारा पेंहसे यांचो मने जुळलो होतो. कर्वे विद्यापौठाच्या पदवीधर झाल्यावर ताराबाई पुण्याला भावे स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करू लागल्या. १९३० ते १९३६ या काळात एस्. एम्.च्या तुरुंगाच्या वाऱ्या सुरू होत्या. १९३६ नंतर समाजवादी पक्षाच्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या कामात ते गुरफटून गेले. फ्री प्रेसचे वार्ताहर म्हणून थोडे पैसे मिळत. पण एकूण कष्टानेच जगणे चालू होते. एस्. एम्. ताराबाईना म्हणाले, 'मी हा असा भणंग, माझा एक पाय सतत तुरुंगात असणार, तुझ्याबद्दल मला प्रेम वाटते पण माझ्यासारख्या माणसाला प्रपंच करणे कसे जमणार? शिवाय मी आता जवळजवळ पस्तीस वर्षांचा आहे.' ताराबाई म्हणाल्या, 'माझे तुमच्यावर प्रेम आहे. लग्न केल्यावर मी सगळं सोसायला तयार आहे.' ताराबाईची घरची सुस्थिती होती. त्यांच्या सर्वात थोरल्या भावाचा या लग्नाला विरोध होता,
पण सर्वात थोरली बहीण सौ. दमयंती गोखले आणि दुसरी सुंदराबाई यांचा मात्र या लग्नाला पाठिंबा होता. एस्. एम्.चे मित्र म्हणत, 'तू आता लग्न कर.' एस्. एम्.चे जिवलग मित्र ना. ग. गोरे यांनी त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये असलेल्या सुमती कीर्तने या विद्यार्थिनीशी पुनर्विवाह केला होता. नानासाहेबांच्या आईवडिलांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. नानासाहेबही चळवळोत पडल्यामुळे काही मिळवत नव्हते. सुमतीबाईनी सेवासदनमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी धरली आणि नंतरच त्यांनी गोऱ्यांवरोबर लग्न केले. गोरे एस्. एम्.ना म्हणाले, 'आपण चळवळीत काम करताना आपल्या बायकांनी प्रपंच सांभाळायचा हे आपण मान्य करावे. तू ताई पेंडसेशी लग्न केलेच पाहिजे, असे मला वाटते.'
एस्. एम्.च्या आईने खूप दुःखे सोसली. त्यांनाही एस्. एम्.चा संसार सुरू व्हावा, असे वाटत होते. अखेर १९३९च्या सप्टेंबर महिन्यात गोखले हॉलमध्ये नोंदणी पद्धतीने एस्. एम्. जोशी आणि तारा पेंडसे यांचे लग्न झाले. निमंत्रण पत्रिकाही छापल्या नव्हत्या. पण एस्. एम् वर प्रेम करणारे स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकतें आपल्या घरचे कार्य म्हणून लग्नाला आले. सातारकरचे हॉटेल गोखले हॉलसमोर होते. त्यांनी सर्वाना चहा दिला आणि विवाह समारंभ संपला. रावसाहेब पटवर्धन आणि त्यांच्या आई यांनी चाळीस निमंत्रितांना मेजवानी दिली. काकासाहेब गाडगीळांच्या पत्नी आनंदोबाई यांनी एस्. एम्. व ताराबाईंचे निकटचे मित्र-मैत्रिणी आणि निकटचे नातेवाईक यांना स्वत:च्या घरीच जेवण दिले. एका खोलीत राहणारे एस्. एम्. लग्नानंतर १८ रुपये भाड्याच्या तीन खोल्यांत पत्नी आणि आई यांच्यासह राहू लागले. असा हा संन्याशाचा संसार १९३९ साली सुरू झाला.
स्वातंत्र्यलढा क्षितिजावर
3 सप्टेबर १९३९ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारताच्या राजकीय जीवनावर त्याचा परिणाम होणे अपरिहार्यच होते. युद्ध पुकारले जाताच व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिवगो यांनी जाहीर करून टाकले की हिंदुस्थानही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाला आहे. पं. नेहरू हे त्या वेळी चीनच्या दौऱ्यावर होते. दौरा लवकर आटोपून ते भारतात परतले. व्हाइसरॉयनी काँग्रेसच्या नेत्यांढरोबर चर्चा न करता एकतर्फी हिंदुस्थान युद्धात सामोल झाल्याचे जाहीर केले, याबद्दल काँग्रेस वर्किंग कमिटीने तीव्र नापसंती व्यक्त केली. पं. नेहरूंनी असे स्पष्टपणे सांगितले को काँग्रेसचा फॅसिझमला विरोध असून काँग्रेस हो लोकशाहीवादी आहे. परंतु साम्राज्यवादी युद्धात आज भारत सामील होणार नाही. ब्रिटीश साग्राज्यवाद्यांनी भारताला फरफटत नेण्यास पं. नेहरूंचा विरोध होता. पुढे काँग्रेस वर्किंग कमिटीत अधिक चर्चा होऊन ज्या सात प्रांतांमध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळे होती. त्या प्रांतांतील काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामा द्यावा, असा ठराव करण्याव आला. त्या आदेशानुसार सातही काँग्रेस मंत्रिमंडळांनी एकाच दिवशी राजीनामे दिले.
एस्. एम्. आणि त्यांचे समाजवादी सहकारी यांना जे घडावे असे वाटत होते तेच काँग्रेस मंत्रिमंडळांच्या राजीनाम्याने घडले. एस्. एम्., गोरे आदी समाजवाद्यांचा हिटलर-मुसोलिनींच्या हुकूमशाहीला कडवा विरोध होता. मानवी स्वातंत्र्याचा गळा घोटणारी ही विनाशकारी विचारसरणी आहे, असे त्यांना वाटत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे, भारत हे हिंदू राष्ट्र आहे या संघाच्या भूमिकेवरून खटके उडतच. शिवाय संघ ही एकचालकानुवर्ती संघटना असल्यामुळे त्या संघटनेतील अनेकांना हुकुमशाहीबद्दल आकर्षण वाटत होते. त्यामुळे समाजवादी पक्षाचा संघाला विरोध होता, संघातील ना. द. आपटे, गोडसे आदी मंडळी सतत आक्रमक भूमिका घेत. १ मेच्या कामगारांच्या मिरवणुकींचे एस्. एम्. नेतृत्व करीत असताना ना. द. आपटे आदींनी त्या मिरवणुकीवर हल्ला केला. एस्. एम्. च्या डोक्यावर सळईने प्रहार केला. त्यामुळे झालेल्या एस्. एम्. यांच्या जखपेतून रक्तस्त्राव झाल्यामुळे टाके घालावे लागले. एकीकडे संघाच्या विरोधाला तोंड देतानाच एस्. एम्. यांचे एके काळी त्यांचे मित्र असलेल्या रॉयवादी मित्राबरोबरही तीव्र वैचारिक मतभेद झाले. रॉय यांनी लोकशाही आणि हुकूमशाही राष्ट्रांमध्ये महायुद्ध सुरू असताना भारताने लोकशाही राष्ट्रांनाच पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका घेतली. म्हणजे प्रत्यक्षात ब्रिटिश साग्राज्यशाहीबरोबरच सहकार्य करावयाचे, असा या भूमिकेचा अर्थ होता.
पं. नेहरू आणि समाजवाद्यांची भूक अशी होती की ब्रिटीश साप्राज्याची मगरमिठी जोपर्यंत भारतावर आहे. तोपर्यंत ब्रिटन हे हिटलरविरोधी असले तरी भारत त्याला पाठिबा देऊ शकणार नाही. दुसरे महायुद्ध सुरू झाले त्यावेळी कम्युनिस्ट पक्षानेही हे साप्राज्यवादी युद्ध असल्यामुळे त्या युद्धाला विरोध केला पाहिजे, अशीच भूमिका घेतली. रशिया आणि जर्मनीचा जोपर्यंत अनाक्रमणाचा करार होता तोपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने युद्धविरोधी भूमिका प्रेतली. परंतु पुढे हिटलरने रशियावर आक्रमण केले आणि नंतर इंग्लंड, फ्रान्स या दोस्त राष्ट्रांच्या आघाडीत रशियाही सामील झाला. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने ताबडतोब कोलांटी उडी घेऊन हे साम्राज्यवादी युद्ध नसून 'लोकयुद्ध' आहे अशी भूमिका घेतली. कम्युनिस्ट पक्षाचा युद्धविरोध मावळला आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांना युद्धप्रयत्नांमध्ये सहकार्य केले पाहिजे, या वेळी त्यांच्याशी संघर्ष करणारी स्वातंत्र्य चळवळ करू नये, असा पवित्रा कम्युनिस्ट पक्षाने घेतला.
Hits: 83