चाफेकर नि रानडे यांजवरील फटका -१

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका -१
(जाति : स्वरगंगा)

महच्चरित सत्सुधांबुधीमधि करू सुमन हें पाणबुडें ।
अखंड-सद्गुणमंडित मौक्तिक निधान सद्यश मग उघडें ॥ धृ ॥

हांगकांगहुनि ठिणगि अुडोनी गाठी अवचित मुंबईला ।
अपूर्व अवचित अघोर रूपें प्लेग हुताशन संचरला ॥ १

हाय! बाप! हा! अरेरे! करी गाई! अगाई! नरमहिला ।
भयाण शब्दश्रवणें शेषहि टाकू पाही धृत महिला ॥ २

युवतीस्फुंदन वृद्धक्रंदन तो प्राणांतिक कण्ह यांहीं ।
भुतें भयंकर किंकाळति त्या भयासही जें भयदायी ॥ ३

काळापरिसहि काळहृदय तो विषापरिसही विषारि तो ।
पवनापरिसहि जवन असोनी गिरिपरि अचलत्वा धरितो ॥ ४

भारतभूचे कुंकुम केलिस स्वतंत्रता जिथ पावतसे ।
धन्य अशा श्रीपुण्यपत्तना पहावया हा धावतसे ॥ ५

अस्मानाची खोड मोडण्या सुलतानाचे मनि भरलें ।
प्रजाहिताहित मुळि न पाहता कडक कायदे बहु ठरले ॥ ६

प्लेगनिवारक नियम परी ते संवर्धकचि न त्या असती ।
लोकमतिस त्या ब्रिटिश न मानी सती-वच जसें ती असती ॥७

प्रदीप्त असा प्लेग-पावकी काय कायदा आज्य पडे ।
रॅड-वायु हा हाहाकारचि करीत सुटला चहूकडे ॥ ८

X

Right Click

No right click

Hits: 157
X

Right Click

No right click