१२. नाशकाजवळचीं लेणीं पाहून !
Parent Category: मराठी पुस्तके
Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता
Written by सौ. शुभांगी रानडे
१२. नाशकाजवळचीं लेणीं पाहून!
(इंद्रवजा)
लेणीं बघाया मग पांडवांची
गेलों वयस्यांसह मौज साची
अत्यंत रम्य स्थळ पाहतां तें
संतोष झाला बहु मन्मनातें ॥ १
परंतु जातां क्षण हर्ष गेला
शोकानलें दाह मनांत केला
कीं थोर विद्वान् पितरां अशांला
कुपुत्र झालों अम्हि हे कशाला? ॥ २