५. श्रीटिळक-आर्यभू भेट
५. श्रीटिळक-आर्यभू भेट
(खालील आर्या लोकमान्य टिळक तुरुंगातून सुटले तेव्हा त्यानिमित्त मिळालेल्या सुटींत केलेल्या होत्या. वय १५.
सन १८९८ 'जगद्वितेच्छु, पुणे' ह्या पत्रात छापून आल्या होत्या.
॥ श्री योगेधरी प्रसन्न ॥
रा. रा. जगद्विच्छुकर्ते यास :-
स. न. वि. विशेष - कृपाकरून आपल्या जगन्मान्य पत्रांत खालील मजकूर छापाल अशी आशा आहे.
येये बाळा ये । क्षेम असो! हो शतायु कुलतिलका ॥
भरते ये दाटुनि किति? स्वास्थ्य असे कीं गुणानुकुलटिळका ॥ १ ॥
दे भेट, जवळि ये चल चुंबन करण्यासि चित्त अुत्सुकलें ॥
गेले ते दिन गेले, 'बाळा' किति तरि शरीर तवसुकले ॥२॥
एकेक मोजुनि दिन अब्दवरी अंतरासि साहियलें ॥
पळभरहि धिर न धरावे तोंच सुदैवें मुखासि पाहियलें ॥३ ॥
कां तेथेचि उभा रे? वाटे कीं ही न आपली आई ॥
परि शोकें कृश असी स्तनपान्हा - चिन्ह तापली दाई ॥४ ॥
की आश्चर्ये थक्कचि शुद्धीपूर्वच ही कशी शिवते ॥
'बाळा, प्रेम उमाळा शुद्ध स्वयें ? मान मानसीं शिवतें ॥५ ॥
की क्रुद्ध मानसीं तूं? ओवाळायासि केंवि आअु नये ॥
भेटीसी विलंब नको, ऐक तसें की गृहांत जाऊुंनये ॥६॥
'श्री बाळ' बहुप्रेमे धांवे तों आर्यजननि घेच करीं ॥
सप्तमि दिनीं सकाळीं भेटीला दाटली घनश्चकरी ॥७ ॥
दोषस्थलांची माफी असावी.
नाशिक ता. ७-९-१८९८
आपला
एक क्ष