चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - १०

Parent Category: मराठी पुस्तके Category: स्वातंत्र्यवीर सावरकर समग्र कविता Written by सौ. शुभांगी रानडे

चाफेकर नि रानडे यांजवरील फटका - १०

कालासम ते पती हरपले बाला झाल्या त्या अबला ।
सौभाग्याचा सुरम्य वाडा विद्युत्पाते हा दबला ॥ १

हे भगिनींनो असह्य संकट तरी कीर्तिकर समजावें ।
वरुनी ज्ञाना, करुनी कीर्तिस देवि जानकीसम जावें ॥ २

मायचि ती अुपमा ना दुसरी अंबर भरवी हंबरडे ।
तिघे गिळियले लाल तियेचे घोरतम किती यमनरडें ॥ ३

त्यज शोकासी, रत्ने अशीं जननि निपजती तुझ्या कुशी ।
कीर्ति तयांची स्नुषा अमर तव चुंबी हर्षे ऊठ कशी ॥ ४

पिता म्हणविता पुत्रत्रयीचा निपुत्रिक कसा हो बनला ।
किंवा विधिने अननुभवे सुत-शोक सह्य की हा गणिला? ॥५

अद्वितीय यश तिहीं जोडिलें देशपिते हे कुला भले ।
शतांश त्यांच्या वृद्ध होअुनी तुम्हां आम्हांला न लाभलें ॥ ६

अजरामर ते धन्य पुत्र तव कीर्तीरूपे लखलखती ।
हिरे! असोनी मर्त्य जाहले अमर तथापी कां खंती? ॥ ७

नररत्नांच्या वियोगयोगे पशुपक्ष्यादिक धाय रडे ।
बलिदानाविण वीरांच्या परि राष्ट्रोद्धारहि कसा घडे ॥ ८

Hits: 163
X

Right Click

No right click