ज्ञानोदय पाने - 1-10
हिंदुस्थानातील ज्ञानदीप विझून ख्रिस्ती धर्माचा ज्ञानोदय व्हावा यासाठी मिशन-यांनी ज्ञानोदय नियतकालिक सुरू केले होते. सुदैवाने आमच्या ज्ञानदीपला तो ग्रंथ सापडला. आता त्यातल्या बातम्या त्या काळातील घडामोडींचे ब्रिटिशांच्या नजरेतून दर्शन घडवितात. हे सारे मुद्दाम वाचणे व त्यातील मतितार्थ प्रत्येक भारतीयाने समजून घेणे आवश्यक आहे.
There may be some errors as the text was extracted from old scanned pages. Next pages will be added in due course. )
ज्ञानोदय, पुस्तक १७, अंक १, मुंबई, १ ज्यानुपरी १८५८
१ (१७: १, १ ज्यान्युएरी ५८, २)
सत्राच्या पुस्तकाचा पहिला अंक ही देवाची मोठी व विशेष दया मानावी लागेल; कारण सात महिने या खंडात भयंकर फितुरी आणि भयंकर लढाया चाललेल्या आहेत. आम्ही किंवा आमच्या बापांनीही त्या पाहिल्या किंवा कल्पिल्या नाहीत. वाहत्या रक्ताचा आवाज आम्ही ऐकला त्याचे विषाक्त थेंब आम्हांवरही उडाले, आता आभाळ फाटून अस्मान दिसू लागेल. काही वेळाने सारे निर्विघ्न होईल, ख्रिस्ती धर्म पसरावा म्हणून जुलूम न करता आम्ही प्रयत्न करू, ख्रिस्ती धर्माची मदत करणे हा आमचा अभिप्राय आहे, एक पहिल्यावून दोन वेळां ज्ञानोदय येत जाईल. वार्षिक किंमत दीड रुपया राहील,
१ अ (इंग १-२)
१२९ (१७: १, १ ज्यान्युएरी ५८, ३)
मि. हेजण मडमेसह स्वदेशी जात आहेत. त्यांनी १९ वर्षे मिशनचे काम केले, गेली तीन वर्षे ते ज्ञानोदयाचे काम करीत होते. ज्ञानोदयाचा मजकूर हितकारक व मनोरंगक व्हाटावा म्हणून प्रयत्न करीत. सुझानासाठी व सुधारणेसाठी मेहनत घेत असत. हेजण मॅडमही उपदेशाचे काम करीत
असे.
२अं (इम: ३)
हे (१७: १, १ ज्वान्युणरी ५८, ४)
मि. टकर मडमेसह भारतात परत आले. ते पुन्हा तिनवल्ली प्रांतात जातील. त्यांनी तेथे १३ वर्षे काम केले व दोन हजार माणसांना बातिस्मा दिल्हा. ४८ भक्तिस्थाने बांधली, त्याच आगबोटीतून कित्येक जर्मन मिशनरीही मुंबईस येऊन पोहचले आहेत.
३ अ (इंग : ३)
% (१७: १, १ ज्यान्युएरो ५ट, ४)
फ्रीचचचे इन्स्टिट्यूशनची आणि जनरल असेंब्लीच्या शाळांची परीक्षा मॅडम नेसविट आणि पेटन यांनी घेतली. तेथील विद्यार्थी मेहनती असून
पवित्रशाखाबद्दल अगत्य दाखविणारे भाहेत. मणी स्कूलची नवी इमारत तयार झाली. या तीन शाळांत हिंदु-मुसलमान-पारशी मिळून ५००
विद्यार्थी शिकतात. इंग्लिश शिकणारी सर्व एतद्देशीय मुले मुंबईस सुमारे २५०० असतील,
शेअ(शंम:४)
७ (१७:१, १ ज्यान्युएरी ५८, ७-१०)
मुंबईच्या टपालखात्यात चौदा बर्षे काम करणारा तैयण आंबू हा हिंदू ग्रहस्थ खिस्ती झाला. गेले ८ महिने तो बातिस्मा मागत होता, लहानपणी कालिकत येथे असताना देव, सर्प व भुते यांची भक्ती पाहून तो त्रासला. तामसी व अन्यायी देवतांना कंटाळला, आपल्या अष्ट
मनाला सुटका मिळण्याचा मार्ग म्हणजे ख्रिस्तच अशी त्याची खात्री झाली. ब्रह्मचारी बाबाची व्याख्याने ऐकून त्यास असे वाटले की पाप व
पुण्य यांच्या कत्पनांतच मोठा गोंधळ आहे. दयाळू याचक येशू ख्रिस्त यालाच तो शरण गेला, कारण खिस्ती धर्मच ईश्वरापासून आहे. दोन
धर्मांमध्ये तो छंगडत होता. आता त्यास आशय सापडला. खांब उचलून ख्रिस्तामागे आला.
ष् अ (इम: ५-७) व
दे (१७: १, १ ज्यान्युएरी ५८, ११)
ग्लिसरिन ४ औंस, पेपरमिंटाचे तेल २३ औस आणि, टँपे्टिन तेल ४ ग्राम ह्यांचे मिश्रण करून, शरीराचे उघडे भागास चोपडावे. डांस, मत्सर 'वगैरे जिवांच्याने उपद्रव होणार नाही.
दवे अ (इम : ११)
७७ (१७: १, १ न्यात्युएरी ५८, ११)
अहमदनगर जिल्ह्यातील होवगाव तालुक्यात कांबी येथे पन्नास लोकांनी दरोडा धातला होता. लोकांनी ३ रोहिळे ब ४ महार यांना पकडले,
जडूज पार्टिबर यांनी या सात लणांना फाशी सुनावली व ती अंमछात आणली,
क॑ (१७: १, १ ज्यान्युएरी ५८, ११-१२)
लखनौ येथे बंडखोरांच्या वेढ्यात सापडलेले इंग्रज लहान किल्ला बांधून राहात होते, जनरल हावलाक आणि ओऔटराम यांनी फार प्रयत्न केले,
पण बंडखोरांची संख्या एक लाखावर असल्यामुळे इंग्रांची सुटका होऊ शकली नाही. सर कांबिल यांनी ६ हजार सैनिकांसह त्यांवर हल्ला केला,
शिकंदर बागेत घनघोर लढाई झाली, १५०० बंडखोर मेले, इंग्रजांची सुटका झाली.
९ (१७: १, १ ज्यात्युएरो ५८, १२-१३)
उत्तर हिंदुस्थानांत जागोजाग बंडे होत आहेत. बंडवाल्यांचा मुख्य जमाव दिल्लीत होता, पण पराक्रमी ब शूर इंग्रज सैनिकांपुढे त्यांचे काही
चालले नाही. अनेक बंडलोर मृत झाले, कित्येक पळाले, मोठ्या शहरात आता त्यांचा पायरवसुद्धा ऐकू येत नाही, इंग्रजांच्या इमानी फौजांनी
त्यांना जेरीस आणले, इंग्रज सेनेस आणखी मदत मिळून ती फौज एक लक्षावर जाईल. दुष्टांची दुष्ट वासना लवकरच लयास जाणार आहे,
ईश्वराने अशीच कृपा बकर करून आमच्या सरकारास यश द्यावे अशी आमची इच्छा आहे, ( ज्ञानप्रकाशवरून)
4 ५७ (१७: १, १ ज्यान्युएरी ५८, १४)
कनेळ जेकप यांच्या विदयु्ठतेच्या तारेबरून असे कळते को, गेल्या महिन्याच्या ६ तारखेत अनेकांनी बंड करून कोऱ्हापूर शहर ताब्यात
घेतले. गावाची पुर्ण नाकेबंदी केली, कर्नेठ जेकन यांनी ताजडतोज चाल करून वंडवाल्यांना पकडले. ३६ वंडवाल्यांवर कोर्ट मार्शल करून
राजवाड्यासमोर त्यांची डोकी उडविली. ५० लोक केदेत ठेवले. कोल्हापुरच्या राजाने मात्र इंग्रजांनाच मदत केली, राजवाडा उडवून
देण्याचा बंडखोरांचा बेत इंग्रज फौजेने अयशस्वी केला.
(बर्तमानदीपिकेवरून )
११ (१७:१, १ ज्यात्युएरी ५८, १३-१४)
आज बेल्जियन बोटीतून इंग्रजी फौजेची नवी कुमक आली आहे. तिने ग्वाल्हेर छावणीतील बंडखोरांचा पूर्ण पराभव केला. दारूगोळा ताब्यात
घेऊन इंग्रजांच्या बायकामुलांना अलाहाबादेत सुरक्षितपणे पोहोचविले.
काल्पी गावाच्या रस्त्याने कित्येक बंडखोरांचा पाठलाग करून त्यांना मारले. ५६ तोफा हस्तगत केल्या, इंग्रज फौजेचे मात्र सांगण्याजोगे
नुकसान झाले नाही. (ज्ञानप्रकाशवरून )
१ २ (१७:१, १ उ्यान्पुएरी ५८, १४-१५)
प्राचीन काळापायून कबुतरे जलद जासुदाप्रमाणे पत्न नेण्याचे काम करतात. त्यांची गति मिनटास एक मेळ असते, आलेप्पोच्या डाक्तर
रसेठ याने खग्रुतरांचा उपयोग करून साठ मेलांवर टपाल पाठविले. फ्रान्समधील कबुतरे एका तासात सहा कोहपर्यंत जातात व पत्र देऊन
पूर्वस्थळी येतात, धुक्यामुळे काही वेळा त्यांचा मार्ग चुकतो, उशीर लागतो. जलप्रलयाच्या वेळी सतत वाढणाऱ्या पाण्याची बातमी एका
पारव्याने नोहापर्यंत आणली असे पवित्र शास्त्रात म्हटलेले आहे.
१६३ (१३: १, १ ज्यान्यपूएरी ५८, १५)
आजपर्यंत कोटापध्ये काळ्या सैनिकांचा पहारा असे. आता ते बदलून गोऱ्या लोकांचे पहारे ठेविले आहेत. (वर्तमानदीपिकेवरून)
१४ (१०:१, १ अ्यान्युएरी ५, १६)
गेल्या दोन बर्षांत मुंबईकर मंडळी स्टार्किंग (बूट) ब इंग्रजी जोडे वापरू लागली आहेत, सफेद अंगरख्याऐबजी आलढ्पाकाचे कपडे वापरीत
आहेत. यामुळे धोबी लोकांना भिक्षांदेही करावी लागेल, किंवा गाव सोडून दूर जावे लागेल. आता साहेबी टोपी घातली की ते पुरे इंग्रज
अनती रू! ( बर्तमानदीपिकेबरून )
१९७ (१७:११, १ ज्यान्युएरी ५८, १६)
सरकारने जाहीरनाम्याद्वारे प्रकट केले आहे की बंडवाल्यांची जी जी मिळकत नस झाली ती सरकारजमा समजली खाईल. ज्या लष्कराने ती
जिंकली त्याला सहा महिने नादा मचा मिळेल. (वर्तमानदीपिकेवरून )
१६ (१७: १, १ ज्यात्युएरी ५८, १९)
सन १८७५८ चे पंचांग छापून तयार आहे. किंमत १ आणा आहे.
अमेरिकन मिशन प्रेस, मुंबई, टी. ग्रॅहॅम, फ्रिटर *
ज्ञानोदय, पुस्तक १७, अंक २, मुंबई, १५ ज्यान्युएरी १टणद
१७ (१७०: २, १५ ज्यान्युएरी ५८, १७-१८)
सन १८५८ च्या सरकारी सुट्या जाहीर झाल्या. प्रत्येक धर्माच्या सणाप्रमाणे विशेष सुट्टी घेता येते. मात्र चौकीदारांना व चपराशांना हे
नियम लागू नाहोत. रविवारी सुटी दिल्यामुळे वा सरकारवर ईश्वर आशीर्वाद पाठवील, लोकांनी परघर्मीय सुटीच्या दिवशी काम करून
सरकारी नुकसान टाळावे.
यावरील ज्ञानप्रकाशचा अभिप्राय :
सदरहू सरकारी ठराव फार योग्य आहेत. रविवार जो विसाव्याचा दिवस त्या दिवशी सरकारी हपीसातील कामकाज बंद असावे असा
ठराव केल्यामुळे ज्यादा सरकार एकच खरा बघ जिवंत देव असे मानितात त्याचा त्यांनी योग्य सन्मान राखिला. (ज्ञानप्रकाशवरून )
१७३ (इंम : १९)१८ (4७: २, १५ ज्यात्युएरी ५८, १९-२२)
मार्गशीर्ष पोर्णिमेस मांडवगणला ( अहमदनगर) सिद्धेश्वरची जत्रा भरते. पद्चूपरमाणे निरंड्जपणे व्वभिचारादि दुष्ट कर्मे करणाऱ्या कोल्हाटणी
सर्वांत आधी पाले उभारतात, यात्रेचा खर्च ५०० रुपयांवर जातो. तमाशे पाहाताना कज्जे करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त
असतो. यंदा यात्रा कमी भरली, कारण मद्यपानाबर बंदी आहे! खिस्ती धर्मोपदेशफांनी तमाशेवाल्यांची समजूत घालून अनेक तमाशे गुंडाळाववास
लावले. शास्त्रीलोकांशी वाद करून खऱ्या देवाची जाणीव दिल्ही. न चगाड, दारू व तमाशा यांना बंदी झाली की यात्रा अगदी कमी भरते.
खऱ्या आत्म्याने व सत्यतेने देवाची भक्ती केली पाहिजे.
१८अ (इस: रर)
१९ (१७: २, १५ ब्यान्युएरी ५८, २२-२३)
(नेटिन्ह स्वित्रन ) लक्ष्मीबाई अवघ्या २६ व्या वर्षी अतिसाराने वारली. प्रभू येशूच्या दयाळूपणावर तिचा पूर्ण विश्वास होता. आता ती अक्षय
सुखात वास करील, कारण की, जो मनाने ईश्वराकडे जातो त्यास तो घाल्बीत नाही. ती हिंवूच राहिली असती तर अक्षय नरकवासात पडली
असती. नुसत्या नामोच्याराने तारण होत नसते, तर खऱ्या भक्तीने मोक्ष मिळतो.
असे ' ज्ञानोदय वाचणारा ' पत्रात लिहितो.
२५७ (१७: २, १५ ज्यात्युएरी ५८, २३-२५)
' फिरस्ता ' आपल्या पत्रात लिहितो की, खेड्यातील लोकांची इंग्रजी राज्यावर फार आवड आहे. त्यांची खात्री झाली की पूर्वीच्या
राजवटीपेक्षा इंग्रजी अंमलात लुटारू व परचक्र यांपासून जास्त संरक्षण मिळते. बंडाबद्दल ते अगदी अज्ञानी आहेत, इंग्रजी इन्साफावर त्यांचा
पूर्ण विश्वास असुन दुब्च्या कामदारांमुळे भापर्णांवर अन्याय होतो, असे ते समजतात. मारवाडी-सावकारांच्या जुलम़ामुळे ते फार खिन्न
आहेत. शेकडा २५ किंवा ५० टके व्याजाच्या योगाने त्यांच्या डोक्यावर कर्जाचे पर्वत तयार होतात, शेतीतील अल्प प्राप्तीमुळे कर्ज लवकर
फिटतही नाही. सावकार त्यांची जिनगी व शेतमळे हिसकावून घेतात. कजंबाजारी होण्याची चालच या देशात पडून गेली आहे. त्यांची गरज
पाहून चढ्या व्याजाने सावकार पैसा देतो व शेवटी जप्ती आणतो. मग यांच्याजबळ दमडीसुद्धा उरत नाही, सावकाराला शिव्या देऊन ही
भयंकर दशा संपणार नाही,
१२० अ (इंम : २५-२६)
२९१ (१७: २, १५ ज्यान्युएरी ५८, २५-२८)
* स्वदेशस्थ लोकांचे कल्याण इच्छिणारा ' लिहितो की : पावसाळ्यात धाब्याची धरे कोसळून अनेक माणसे मरतात, परदेशस्थ लोकांना ही घरे
बोड॒खी वाटतात, यांत प्रकाश आणि वारा यांचा अभाव असतो. मातीच्या पॅंडाने पावसाळ्यात घरे गळत राहातात. उन्हाळ्यामध्ये मनस्वी
उकडते. खेपाक करणाऱ्या रीचे तर अनन्वित हाल होतात, ढेकणांचा त्रास तर इतका की एखाद्या वज्रदेहीलाच सुखाने झोप यावी. हे लोक घरास
बळद करून त्यात धान्य ठेवतात, पण उदाऱ्याने घान्यही लराव होत असते. चोरापासून बाव व्हावा म्हणून ही पेटीसारखी घरे बांधण्याची
चाल पडली, परंतु मानवी प्रकृतीस ती अनर्थकारक आहेत. ही घरे मलीन व अस्वच्छ राहातात, या घरांना खिडक्या पाडाव्यात व मनासही
शुद्ध व पुण्याचा वारा मिळू द्यावा,
११९ (१५७: २, १५ ज्यान्युएरो ५८, २८-२९)
' एक ज्ञानोदय वाचणारा ' लिहितो की ; अहमदनगरजवळच्या खोकर या गावात मारवाड्याच्या घरावर दरोडा पडळा, मारवाड्याच्या आईला
दिवस असल्यामुळे घरमंडळी लाडू वळीत होती. रात्री दरोडेखोरांची टोळी आली. तिने सर्वांना मारहाण करून ५०० रुपयांचा ऐवज नेला.
थ्याचरसाहेबांनी बहिमी भिल्लांची चौकशी सुरू केली, पोलिसांनी फिरता बंदोबस्त ठेवला आहे.
४२३३ (१०: २, १५ ज्यान्युरी ५८, २९-३०)
(वृक्षवर्णन चालू) चीन, इराण देशांत ब हिमालयाच्या परिसरात अक्रोडाची झाडे आढळतात. यांची फळे पेरूएवढी असतात. कवच कठीण होण्यापूर्वी त्याचे लोणचे द्दी करतात, जंताच्या उपद्रवावर त्याचा भक्ष म्हणून उपयोग होतो, आश्विन ब कार्तिक महिन्यांत या फळांचा हंगाम असतो. पण वृक्ष लावल्यावर फळे येण्यास मोठा काळ जावा लागतो, आपल्या नातवंडांकरिता हे फळ-लावले पाहिजे, कारण आपल्या आजोबांनी लावलेले अक्कोड आपण खातोच की! दुसऱ्याच्या हिताकरिता श्रम करण्यात मोठा आनंद आहे.
२९४ (१०: २, १५ ज्यान्युएरी ५८, ३०-३१)
गवर्नमेंट ग्याजेटात सरकारने असे प्रसिद्ध केले आहे की, एतद्देशीय फौजेमधील फितूर लोकांच्या कुशीत काखेखाली एम् अक्षर कोरण्या'चा
अधिकार इंग्रज अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. फरारी कैदी पकडत्यावर हे अक्षर कोरले जाईल, हा हुकूम ताबडतोब अंमलात येत
आहे, (गवर्नमेंट गेंजेटवरून )
२२७ (१२: २, १५ ज्यान्युएरी ५८, ३५)
काचेवर वितळलेल्या मेणाचा थर देऊन त्यावर अक्षरे किंवा ठसा हवा तो कोरावा, सुईने कोरल्यावर फूलआारस्पार व गंघकाम्ल तापवून त्याच्या
वाफेवरती ही काच धरावी, म्हणजे अक्षरे टिकाऊ बनतात.
(ज्ञानप्रसारकवरून )
२९६ (१७: २, १५ उयाम्युर्री ५८, २१)
मद्रास, मुंबई, भडोच व कलकत्ता ही शहरे तारायंत्राने जोडली गेली.
( धूमकेतुवरून )
१२७ (१५: २, १५ ज्यान्युएरी ५८, ३5)
न्यूजीम बेटावरील नदीत दिवसाला साडे चार शेर सोने मिळते,
(ज्ञानप्रसारकवरून )
२८ (१७: २, १५ ज्यान्युएरी ५८, ३१)
तीन वेस्ट इंडियन फलटणी भारताकडे निघाल्या. (घूमकेतूवरून )
२९ (१७: २, १५ ज्यान्युएरी ५८, २१)
बाळाराम रामचंद्र असि. इनाम कमिशनर यांचे निघन झाले.
६३० (१७: २, १५ ज्यान्युएरी ५८, ३र)
स्लासगोच्या झार्टीन या संशोधकाने आगीवर चालणारा नांगर शोधला आहे. एका यंत्रास रोजी ८ हंड्रेडवेट कोळसा लागतो. दोन माणसे सहा
एकर जमीन रोज नांगरतील अशी या नांगराची क्षमता आहे.
(नगनमित्रवरून )
डू १ (१७: २, १५ ज्यान्पुएरी ५८, ३२)
फ्रान्स देशातील टाकसाळीत एका वर्षात ६० कोटी सोन्याची नाणी तयार झाली. (ज्ञानप्रकाशवरून )
३९ (१७: २, १५ ज्यान्युएरी ५८, ३२)
प्रिन्स नेपोलियनचे पदार्थालय पाहण्यासाठी लावलेल्या तिकिटापोटी ५१ लाख ६२ हजाराचे उत्पन्न झाले, ( ज्ञानप्रकाशवरून )
३३ (१७: २, १५ ज्यऱ्युएरी ५८, ३२)
विलायतेतील एका देवळासाठी खाणीतून काढलेला ४५ हजार पोंडाचा दगड वापरला जाणार आहे. ( ज्ञानप्रकाशवरून )