इ. स. १८४२ ते १९४१ ज्ञानोदय लेखनसारसूची -प्रस्तावना

Parent Category: मराठी पुस्तके Category: ज्ञानोदय Written by सौ. शुभांगी रानडे

“ज्ञानोदय ' हे नियतकालिक शंभर वर्षांहून अधिक काळ चालू आहे. याचे जुने अंक अभ्यासकांना सर्वच ठिकाणी सहज उपलब्ध होण्यासारखे नाहीत. मूळ अंक आता इतक्या जीर्ण अवस्थेत आहेत को, ते हाताळणे म्हणजे ते पुढीळ संदर्भासाठी योग्य त्या अवस्थेत न ठेवणे, असा प्रकार आहे. म्हणून त्यांचे जतन वस्तुसंग्रहालयासारख्या पद्धतीनेच (म्युझियममध्ये) करता येणे शक्‍य आहे आणि आवश्यकही आहे. इतवया दीर्घकाळातील अंकांची छपाई करणे हे बरेच अवाढव्य काम आणि असे एखाद्याच ठिकाणी राष्ट्रीय प्रकल्पात उपलब्ष करणे शक्य आहे.

ही परिस्थिति लक्षात घेऊन या अंकांची शभर वर्षांची 'लेखनसारसूची' तयार करून प्रकाशित करण्याची कल्पना डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्या सूचनेद्वारा प्रथम नजरेसमोर आली. त्या अनुरोधाने डॉ. हिवाळे एज्यकेशन सोसायटी व अहमदनगर कॉलेज येथील अधिकारीवर्गाशी आणि अहमदनगर कॉलेजमधील मराठोवे प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. गंगाधर मोरजे यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. या सर्व विचारविनिभयातून व चर्चेतून 'लेखनसारसूची'चा आराखडा
तयार होऊ लागला. इ. स. १८४२ ते १९४१ या कालावघीतील अंकांमधील सर्व लेख-कविता-इत्यादी साहित्याची ही सार-सूची सहा खंडांत तयार करण्याची योजना नक्‍की करून हा प्रकल्प संघटित केला. मदतीसाठी तो महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळापुढे ठेवला. सं प्रकारच्या सहकार्याची आणि उवंरित मदतीचो जवाबदारी डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी, अहमदनगर कॉलेज, यांनी स्वीकारली. साहित्य आणि संस्कृती मंडळानेही हा भार उचलण्यास आम्हांस मदत करून आश्वासित केले.

"ज्ञानोदय या नियतकालिकाचे महत्त्व ते शंभर वर्षांहून अधिक काळ चालले आहे, ख्रिस्ती मराठी मंडळींनी ते चालविले आहे, इतकेच नाही.ख्रिस्ती मराठो संस्कृतीचे ते प्रतीक तर आहेच, पण त्याशिवायही महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वाइमयीन, इत्यादी अनेक जीवनांगांमधील स्थित्यंतरे, विचारमंथने, वस्तुस्थिती, यांचे दप्तर म्हणूनही ते महत्त्वाचे आहे. या विषयांतील अभ्यासकाला व जिज्ञासूलाही या नियतकालिकातील हे लेखन अवकोकनार्थ आणि चिकित्सेसाठी मिळाले नाही, त्याचा उपयोग करून घेता आला नाही, तर त्याच्या अभ्यासात व ज्ञानात बरीच मोठी
उणीव राहिल्यासारखे होईल. म्हणून ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या लेखनसारसूचीद्वारे केला आहे. या सूचीमध्ये केवळ सारकथन केलेले नाही, तर मुळांतील शैली व भाषा यांची जाणोवही वाचकाला होऊ शकेल, अशा धोरणाने संशोधन-संपादन केलेले आहे.

मराठीतील कोणत्याही नियतकालिकाची अशी सारसूची केली गेलेली नाही. या दृष्टीने ही अशी पहिलीच सूची आहे. इतकेच नव्हे, तर कोणत्याही विषयाची जशी सारसूची मराठीत अजून तयार झालेली नाही. प्रस्तुत सूचीने आरंभ करून दिला आहे आणि धडा घालून दिला आहे, ही वस्तुस्थिती नमूद करण्यात आत्मस्तुती नाही. हा पहिलाच आणि अलौकीक असा प्रकल्प आहे. त्यामुळे तो चुकतमाकत झालेला असणे शक्‍य आहे. प्रयोग करीत आणि अनुभव घेत यातील उणीवा दूर होतील. इतर काही विषयांत असे प्रयत्न मुरू झाले की, या प्रकारच्या सूचीचे प्रारंभिक प्रवर्तनाचे कार्य
म्हणून “ज्ञानोदया'च्या या सूचीकडें बघावे लागेल. अशा प्रकारच्या कार्याचे “द्तोउवाच करण्याची संधी आलोचना प्रस्थानला डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी-अहमदनगर कॉलेज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या बहुमोल साहाय्याने मिळाली आहे.

सारसूचीमध्ये प्रत्येक अंकातील मजकुराचे क्रमवार आणि कालानुक्रमाने सारकथन केलेले आहे. त्यांचे संदर्भही नमूद आहेत. विषयवार सूचीचीही जोड दिलेली आहे. उपयुक्तता, संदर्भ सहजतेने सापडणे आणि पद्धतशीर मांडणी, यांच्याकडे लक्ष देऊन सारसूचीची रचना केलेलो आहे. हे काम निव्वळ संकलनाचे जाही. शास्त्रीय संशोधनपद्धती नजरेसमोर ठेवून, सार करताना मुळातील विचार, अनुभव, , मांडणी, इत्यादींना धक्का लागणार नाही, काळजी घेत, भस्थासनोती पाळीत सारसूचीतील लेखन व त्याची मांडणी केलेली आहे. अभ्यासकांची सोय जाणि एका मराठी सांस्कृतिक ठेव्याचे मुळाशी संवादी राहून जतन, या दृष्टींनी वा सारसूचीची पूर्तता करण्यासाठी अवश्य ते संयोजन केलेले आहे. असे हे काम
करण्यांत सहभागी होण्याची संधी आलोचना प्रस्थानला मिळाली, याबद्दल संबंधित सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

पहिल्या खंडाच्या सूत्रीप्रमाणे या सुचीच्या दुसऱ्या खंडाच्या पहिल्या भागांची मुद्रण मांडणी, तिचे मुखपृष्ठ, यांबाबत श्री. शांताराम पवार यांचे साहाय्य
उल्लेखिल्याविना न्याय देणे योग्य होणार नाही. तसेच, महाराष्ट्र राज्य मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयाचे संचालक व उपसंचालक, शासकीय मुद्रणालय, वाई, येथील व्यवस्थापक, संबंधित इतर सर्व अधिकारी आणि कामगार-सेवक यांनी ज्या आस्थेने व तत्परतेने, या किचकट कामासंबंधी मुद्रणव्यवस्था केली व हे काम पार पाडले, त्याचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला पाहिजे. डॉ. मोरजे, प्रा. सौ. पद्मा मोरजे, डॉ. मुळे यांच्या संपादनकार्यांचाही आकृतीबंध आवश्यक वाटतो. डॉ. सुरेंद्र बारलिंगे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सर्व सभासद,व सेवक यांचाही हातभार हे काम यथोचितपणे पार पाडण्याच्या कामी लागला आहे, याचाहो निर्देश करणे कर्तव्य आहे. डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्याप्रमाणे अहमदनगर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. टी. बार्नाबस, डॉ. सौ. एम्‌. बार्नाबस आणि आजी प्राचार्य डॉ. पी. एच. जेकब यांनी हे काम आपलेच मानून पाठीशी उभे राहून या कामाच्या पूर्तीची निश्चिती कायम ठेवली आहे, याचाही कृतशतापूर्वक उल्लेख केत्माशिवाय या मनोगताची पूर्ती करता येणार माही.

वसंत दावतर,

आलोचना प्रस्थानकरिता या प्रकल्पपूर्तीमागे आहे, हे नमूद करण्यात मला अभिमान वाटतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि साहाग्याने आम्ही काम चालू ठेवू शकलो आहो.

आलोचना प्रस्थान (मुंबई) चे भा. वसंत दागतर यांचा जाणि सदर कॉलेजचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. या प्रकल्पास आलोचना प्रस्थानास साहित्य आणि संस्कृती मंडळाने मान्यता दिली. प्रा. वसंत दादतर यांनी या प्रकल्पसिद्धीसाठी खरे मार्गदर्शन आणि अन्य सक्रिय साहाय्य केलेले आहे, ते अण केवळ आभार मानून संपणारे नाही. त्यांचे आमचे ऋणानुबंध अधिकाधिक वृद्धिगत होवोत.
भास्कर पांडूरंग हिवाळे एज्युकेशन सोसायटी (अहमदनगर)चे चिटणीस व माजी प्राचार्य डॉ. टी. बार्नावस, हे सदैव अशा कामांना प्रेरणा व प्रोत्साहन
देत आले आहेत. त्यांचे बळ आमच्या पाठीशी आहे. तसेच प्रा. डॉ. सौ. मनोरमा बार्नाबस, यांना महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळींत विशेष रस. कारण तो त्यांच्या अभ्यासाचा विषय. या उभयतांचे मनःपूर्वक आभार.

* ज्ञानोदयलेखनसारसूची ' महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक आदी चळवळींचा इतिहास साधार उभा करण्यास अभ्यासकांना उपयोगी होईल, असा भरवंसा आहे. जाणकार अभ्यासक व सामान्य वाचक या कार्यांची योग्य ती दखल घेतील, याबद्दल मला खात्री आहे.

अहमदनगर काँलेजने स्वीकारलेल्या संशोधन-व्रताची ज्योत अशीच अधिकाधिक तेजाने उजळत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, हे खरे.

पी. एस्‌. जेकब, प्राचार्य, अहमदनगर कॉलेज,अहमदनगर कॉलेज सुरू केले, तेव्हा ग्रामीण परिसरातील लोकांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा, असा संस्थापकांच्या मनांत एक प्रमुख हेतू होताच, पण त्याचबरोबर आपल्या सभोवतालच्या परिसराची, संस्कृतीची वाढ नव्याने होऊ घातलेल्या
जीवनसंदर्भात व्हावी, यासाठी नगर कॉलेज सदैव जागृत राहिले आहे. ग्रामीण विकास, जीवरसायनशास्त्र, आादी क्षेत्रांत नगर कॉलेजने केलेले संशोधन व कार्य सर्वश्रुत नाहे. यामागे होणाऱ्या विचारांत, प्रत्येक देशाच्या परिसराचा विचार, त्या त्या परिसराच्या भूभागाशी संबंधित संस्कृतीच्या, समाजधारणेच्या संदर्भात होणारे विचार, यांना स्थान लाभत आहे.

अहमदनगर शहराला महाराष्ट्राच्या इतिहासांत आणि सांस्कृतिक जीवनात एक महत्वाचे स्थान आहे. याच शहरात ज्ञानोदय नियतकालिक सुरू झाले. ब्रिटिश राजवटीच्या आगमनापासूम स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जडणघडण समजण्यासाठी, ज्ञानोदयाच्या संचिका म्हणजे अभ्यासकाला महत्त्वाची साघनसामग्री आहे. महाराष्ट्राचा सर्वांगांनी नव्याने इतिहास लिहिण्यासाठी अशा साधनांची मरज भाहे. अहमदनगर कॉलेजने अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेऊन, तो सिद्ध करणें, हे कठिणतेने स्वीकारलेल्या एका व्रताचे फलित आहे. तसेच, अहमदनगर कॉलेज केवळ कॉलेज चालवून समाधान न मानता, नव्या नव्या ज्ञातक्षितिजांच्या अंगांनी झेपावत आहे, याचा नगर कॉलेजला सार्थ अभिमान आहे.

आमच्या कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. गंगाधर मोरजे महाराष्ट्रातील एक मान्यवर संशोधक आहेत. या प्रकल्पाची कल्पना, आणि आणि प्रकल्प पुरा करण्याची त्यांची तळमळ व जिद्द लक्षणीय आहेच. पण त्यांना या प्रकल्पसिद्धीसाठी साहाय्य करणारे डॉ. त. वा. मुळे व संपादनसाहाय्य करणार्‍या प्रा. सो. पद्मा मोरजे, यांची प्रशंसा करणे, तितकेच महत्त्वाचे आहे.
आरंभापासून या प्रकल्पसिद्धीसाठी प्रयत्नत्तीळ असनारे डो. सुरेंद्र बारलिंगे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, यांची स्वीय प्रेरणा,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हाती घेतलेल्या बामयीन कार्यक्रमात दुर्मिळ साहित्याचे संकलन, संपादन करून घेऊन ते प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमाचाही समावेश करण्यात आला माहे. महात्मा फुल्यांच्या समग्र वाड्मयाचे संपादन करण्याचे तसेच “ दोनमिख ” साप्ताहिकातील सत्यशोधक समाजासंबंधीचे लेख संकलित, संपादित करून घेऊन त्यांचे प्रकाशन मंडळाच्या वतीने करण्याचा प्रस्तावही मंडळाच्या
विचाराधीन आहे.

मंडळाने हाती घेतलेल्या या कार्यक्रमांचाच एक भाग म्हणजे ख्रिस्ती मिशन-यांनी अहमदनगर येथून * ज्ञानोदय ” मासिक १०० वर्षांवर चालविले, त्याची सारसूची करून ती प्रसिद्ध करण्याची योजना आलोचना प्रस्थान, मुंबई या संस्थेच्या सहकार्यांने मंडळाने कार्यान्वित केली आहे. र्ण शंडात व १२ भागात प्रसिद्ध व्हायच्या या सारसूचीचे संपादन अहमदनगर येथे डॉ. मंगाधर मोरजे यांच्या देखरेखीखाली चालू आहे,

या सूचीचा खंड १ (भाग १ व २) मंडळामार्फत यापूर्वीच प्रकाशित करण्यात आला असून खंड २, भाग ३ चे मुद्रणाने काम शासकीय मुद्रणालय, वाई येथे चालू आहे.

डॉ. मोरजे व प्रा, वसंत दाबतर यांनी सूचीच्या खंड २ भांग १ चे काम पूर्ण करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. अभ्यासक सूचीच्या या भागाचेही स्वागत करतील याबद्दल शंका नाही.

यशवंत मनोहर,

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई- ४०० ०३२.

१५ ऑगस्ट, १९८९.

Hits: 257
X

Right Click

No right click