ठाउके ना - मराठी कविता

Parent Category: भाषांतर Category: संस्कृत Written by सौ. शुभांगी रानडे
ठाऊके ना
गोड गोड पाणी नारळालागूनी
येई कोठूनी ठाऊके ना ---- १

इवलीशी चिमणी गाई गोड गाणी
शिकविली कोणी ठाऊके ना ---- २

आकाशीच्या अंगणी चमके जी चांदणी
कैसी येई झणी ठाऊके ना ---- ३

कातळाला कोणी पाझर फोडोनी
काढीतसे पाणी ठाऊके ना ---- ४

संपता रजनी जाग स्वप्नामधुनी
कैसी ये नयनी ठाऊके ना ---- ५

जैसी ज्याची करणी तैसी असे भरणी
कधी ये सदनी ठाऊके ना ---- ६

सज्जनांच्या वदनी साखरपेरीवाणी
घातलीसे कोणी ठाऊके ना ---- ७

नामयाची जनी पांडुरंगचरणी
रंगे कैसी भजनी ठाऊके ना ---- ८

तैसी माझे मनी कवितासाजणी
कैसी ये नटूनी ठाऊके ना ---- ९
नाहं जाने -
मधु मधुरम` जलं, नारिकेलफले,
कथम्‌‌ भवति, नाहं जाने - १

लघ्वी चटका, गायति गीतानि,
केन पाठितानि नाहं जाने - २.

आकाशस्य अंगने, काशते तारका,
कुत: आयाति नाहं जाने - ३.

पाषाणेषू कश्चित` कृत्वा छिद्राणि,
कथम्‌‌ प्राप्नोति जलानि, नाहं जाने -४.

समाप्तायां निशायाम`, जागरिता स्वप्नेभ्य:,
कथम्‌‌ भावामि नाहं जाने - ५.

“यथा बीजं तथा फलम`”
कस्य एतद`सुभाषितं, नाहं जाने -६.

सज्जनानाम`मुखात` स्रवति शर्करा,
केन पूरिता नाहं जाने - ७.

नामदेवस्य जनी, पांडुरंगचरणे,
कथम्‌‌ भवति तल्लीना नाहं जाने - ८.

तथा मनो मम, सुंदरकाव्यानि,
कथम्‌‌ लिखति नाहं जाने - ९

ठाउके ना --- मूळ मराठी कविता –सौ. शुभांगी रानडे, सांगली – काव्यदीप संग्रह

संस्कृत रूपांतर- दयाकर दाब्के- भोपाळ- 09425693753. 20.01.2012.

Hits: 187
X

Right Click

No right click