बालकविता-४

Parent Category: मराठी साहित्य Category: बालकविता Written by सौ. शुभांगी रानडे
अनुदिनि अनुतापें तापलो रामराया ।
परम दिन-दयाळा नीरसी मोह-माया ।। ....... रामदास.
आजीच्या जवळी घड्याळ कसलें आहे चमत्कारिक,
देई ठेवुनी तें कुठें अजुनि हें नाही कुणा ठाउक ; .......केशवकुमार.
आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ।।
सत्यास ठाव देई, ......आनंदराव कृष्णाजी टेकाडे.
आनंदी आनंद गडे !
इकडे तिकडे चोहिंकडे....बालकवि ठोंबरे.
आमुचें घर छान
शेजारी वाहे ओढा ......माधव ज्युलियन.
आस ही तुझी फार लागली ।।
दे दयानिधे बुध्दि चांगली ।।
उंच पाटी पालथी उशाखालीं
हात दोन्हीही आडवे कपाळी;.......केशवकुमार.
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें .......कुसुमाग्रज
एका कोळियाने एकदां आपूलें ।
जाळें बांधियेलें उंच जागीं ।। ......

करी आरती घेउनी आर्यबाला
त्वरें पातल्या नर्मदेच्या तटाला ; ......माधवानुज

कशासाठी पोटासाठी-
खंडाळयाच्या घाटासाठीं ....... माधव ज्युलियन.
कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जगासी एकला तो ।।
फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयासी कोण घाली ।। .......तुकाराम
कावळा म्हणे मी काळा ।
पांढरा शुभ्र तो बगळा । ....... रा. देव
कुणा आवडतो मोर पिसार्‍याचा
असे कोणाला छंद कोकिळेचा; .....दत्तप्रसन्न कारखानीस.
गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी
कडक उन्हानें जीव घाबरे, कपोल सुकले घमें भिजले
पायीं चटके तापे डोकें, धांपा टाकीत पळे जरी ......श्रीधर बाळकृष्ण रानडे.
Hits: 1029
X

Right Click

No right click