वि.स. खांडेकर

Parent Category: मराठी साहित्य Category: सुविचार Written by सौ. शुभांगी रानडे
मोठी माणसे व छोटी मुले यांना जोडणारा एक पूल म्हणजे खेळकरपणा होय.
कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही.
मानवी जीवनाचे कीर्ती, पराक्रम, प्रतिभा, संपत्ती इत्यादी वस्त्रालंकार आहेत पण
त्याचा आत्मा म्हणजे प्रेम, वात्सल्य, भूतदया इत्यादी भावना होय.
कल्पकता ही शुक्राच्या चांदणीसारखी असते.
मरणात खरोखर जग जगते । आधि मरण, अमरपण मग येते ।
आशेची मंदिरे म्हणजे वाळूतले किल्ले होत.
पुस्तकातल्या सार्‍या खुणा पुस्तकातच राहतात. पण ज्यातल्या खुणा आपण कधीही विसरत नाही,
असा एकच ग्रंथ आहे, आणि तो म्हणजे जीवन !
चाळीशीच्या अलिकडे मनुष्य शूर वीर असतो, पण ती उलटताच तो मुत्सद्दी बनतो.
आयुष्य ही एक अकल्पित प्रसंगांची मालिकाच आहे.
सत्य हे कित्येकदा कल्पित कथेपेक्षाही चमत्कृतिजनक असते.
दुसर्‍याचे दु:ख कळायला आधी त्याच्याबरोबर जळायला हवं.
जग ही एक मयसभा आहे.
जगाचा अनुभव हा एक आरसा आहे.
श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात.
चेहर्‍याप्रमाणे माणसाच्या अक्षरावरही काळचा परिणाम होत असतो.
कीर्ती ही पाण्यात खडा टाकल्याबरोबर उत्पन्न होणार्‍या बुडबुड्याप्रमाणे असते.
कीर्तीचे फूल आज ना उद्या सुकत असेल, पण ते फुलत असताना मिळालेला उन्मादक आणि संजीवक सुगंध मात्र चिरंतन असतो.
वस्त्रांनी मनुष्याच्या शरीराचे, फुलांनी केसांचे तर सुभाषितांनी मनाचे सौंदर्य वाढते.
सुभाषितांची आवड ही मनाला लागलेली पूर्णत्वाची तहान होय.
आदर व आवड ही भावंडे असली तरी त्यांच्या स्वभावात मात्र महदंतर आहे.
चांदणे जगाला सुंदर करते पण अंधार त्याला एकजीव करतो.
आयुष्य हे एक पारिजातकाचे झाड आहे. त्यावर चिमुकली, क्षणात कोमेजून जाणारी पण विलक्षण सुगंधी अशी अगणित फुले नेहमी फुलत असतात.
कल्पना हे काव्याचे शरीर आहे तर कर्तृत्व हा त्याचा आत्मा आहे.
ऎन पंचविशीत मनुष्याला आयुष्य हा फुलांच्या पायघड्यांवरचा प्रवास वाटतो.
दिवस मनुष्याला यंत्र बनवतो तर रात्र त्याला काव्यमय करून सोडते.
काव्य व शास्त्र यांचा मधुर संगम म्हणजेच मनुष्याचे जीवन होय.
अहंकार हा जीवनाचा आवश्यक भाग, पण तो पावसासारखा असतो.
अहंकाराचा अभाव हा माणसाला दगड बनवितो, तर अहंकाराचा अतिरेक हा माणसला हिंस्र पशू बनवितो.
जसा मित्र निवडावा तसाच लेखकही निवडावा.
आदर्शाची गती वरवर असते तर शिष्टाचाराची गती खाली असते.
काल हाच सर्वोत्तम उपदेशक आहे, त्याच्या सल्ल्याने चाला.
सल्लामसलतीचा विश्वास हा माणसामाणसातील सर्वात श्रेष्ठ विश्वास आहे.
धर्म अनेक असतात, पण नीतिमत्ता एकच असते.
देवमाणूस होण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यातच सार्थक आहे.
जीवनाच्या वेलीला कागदी फुले चिकटविण्यापेक्षा ती आपोआप कशी फुलेले ते बघावे.
शेरभर कल्पनेपेक्षा गुंजभर अनुभव अधिक महत्वाचा.
धर्माचे आचरण करायला मनाचे फार मोठे सामर्थ्य लागते, ते बुद्ध, ज्ञानेश्वर, रामदासांच्या अंगी होते.
भावनाशील मनुष्य जीवनप्रवाहात पोहत जातो,तो प्रवाहपतित कधीच होणार नाही.
मनुष्य म्हातारा झाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर लहान मुलाप्रमाणे वेड्यावाकड्या रेघोट्या ओढण्याची काळपुरुषाला जरी लहर येत असली तरी चेहर्‍याचे वैशिष्ट्य काही त्याला नाहीसे करता येत नाही.
जगाच्या बाजारात उपदेशच अधिक स्वस्त असतो.
जी माणसं सुदैवानं डोंगरावर चढतात ती दरीत उतरतच नाहीत.
सत्य हे कल्पनेहूनही विचित्र असते.
जाळावाचून नाही कड । मायेवाचून नाही रड ।
संपत्तीने अमृतत्व प्राप्त होत नाही.
ज्याने वेळ घालविला त्याच्याजवळ घालवायला दुसरे काही उरत नाही.
मनुष्यातला देव प्रकट होतो तो परांच्या गाद्यांवर लोळून नव्हे तर काट्याकुट्यातून धावत जाऊन
माणसाला जे पाहण्याचे धाडस होत नाही तेच त्याच्यापुढे आणून उभे करण्यात दैवाला मौज वाटते.
मवियोगावाचून प्रीती फुलत नाही.
Hits: 908
X

Right Click

No right click