जुमला वेबसाईट डिझाईन -४

Parent Category: मराठी साहित्य Category: माहिती तंत्रज्ञान Written by सौ. शुभांगी रानडे
जुमला वेबसाईटमध्ये दर्शनी भाग आणि व्यवस्थापन कक्ष यात असणा-या फाईल व फोल्डरची माहिती आपण घेतली. आता नवी जुमला वेबसाईट करताना या सा-या फाईल व फोल्डर तयार करण्यासाठी खूप वेळ आणि बुद्धीकौशल्य लागेल असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र प्रत्यक्षात सॉफ्टवेअर पद्धतीने हे कार्य होत असल्याने कोणालाही सहज अगदी कमी वेळात जुमला वेबसाईट कार्यान्वित करता येते.  जुमलाच्या डिझाईनचे हे वैशिष्ठ्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.

यासाठी जुमला वेबसाईटच्या मूळ संचामध्ये दर्शनी भाग आणि व्यवस्थापन कक्ष याशिवाय एक वेगळा विभाग (इन्स्टालेशन या नावाचे एक फोल्डर) असतो.

इन्स्टालेशन फोल्डरची रचना

जुमला वेबसाईटची  सर्व साधनसामुग्री तयार करण्याचे काम या विभागातर्फे केले जाते.जुमला प्रस्थापनेचे कार्य झाले की तो काढून टाकला जातो.

हे कसे काय होते ते आता आपण प्रत्यक्ष नवी वेबसाईट करून पाहू शकतो. वेबसाईट पाहण्यासाठी ब्राऊजर आणि वेबसाईट जेथे ठेवली जाते तो सर्व्हर अशा दोहोंची गरज असते.  यासाठी आपल्या कॉंम्प्युटरवर स्थानिक सर्व्हर (लोकलहोस्ट ) तयार करावा लागतो.

स्थानिक सर्व्हर (लोकलहोस्ट ) प्रस्थापना -
यासाठी आधी  आपल्या कॉंमप्युटरवर अपाचेचे झॅंप (XAMPP) नावाचे सॉफ्टवेअर स्थापित करावे लागते.
https://www.apachefriends.org/index.html 
हे वेबपेज उघडले की खालील स्क्रीन दिसतो.


आपल्या कॉंम्प्युटरवर असणा-या कार्यप्रणाली प्रमाणे विंडोज,लिनक्स (उबुंटु) वा ओएसक्स (मॅक मशीन)साठी झॅंप  सॉफ्टवेअर डाऊनलोड करता येते.



हे सॉफ्टवेअर कार्यान्वित झाले की नवे XAMPP फोल्डर तयार होते आणि स्थानिक सर्व्हरचा खालील स्क्रीन दिसतो.


मायएसक्यूएल आणि अपाचे सर्व्हर कार्यान्वित केले की आपल्या कॉंम्प्युटरवर स्थानिक सर्व्हर तयार होतो. 


आपल्याला http://localhost/phpmyadmin या लिंकवर स्थानिक सर्व्हरवरील डाटाबेस व्यवस्थापन कक्ष दिसतो.
XAMPP फोल्डरमध्ये असणा-या htdocs या फोल्डरमध्ये वेबासाईटच्या नावाचे फोल्डर करून त्यात वेबसाईट केली की  http://localhost/name_of_folder या लिंकवर ती वेबसाईट पाहता येते.

जुमला पॅकेज-
जुमला प्रणाली २००५ मध्ये उदयास आली. तेव्हापासून त्याच्या नवनवीन आवृत्या प्रसिद्ध होत असतात. सध्या ३.८.२ ही आवृत्ती सर्वात आधुनिक व विश्वासार्ह अाहे. (नजिकच्या भविष्यकाळात ४.० ही सुधारित अवृत्ती प्रसिद्ध होईल.) जुमला प्रणालीची मुख्य वेबसाईट https://www.apachefriends.org/index.html  की त्यात आपल्याला डाऊनलोड जुमला अशी सूचना दिसते.


त्यावर क्लिक केले की डाऊनलोडचे पान उघडते आणि तेथून जुमला ३.८.२ या सर्वात नवीन आवृत्तीची झिप आपल्याला डाऊनलोड करता येते.
https://downloads.joomla.org/cms/joomla3/3-8-2/Joomla_3-8-2-Stable-Full_Package.zip?format=zip



आता या XAMPP फोल्डरमध्ये असणा-या htdocs या फोल्डरमध्ये वेबासाईटच्या नावाचे फोल्डर ( उदा.dnyandeep) करून त्यात जुमला पॅकेजची झिप फाईल उघडली आणि http://localhost/dnyandeep ही लिंक उघडली
की जुमलाच्या इन्स्टालेशन  फोल्डरचे कार्य सुरू होते.


Hits: 175
X

Right Click

No right click