सांगली भूषण श्री रामसाहेब वेलणकर

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे


सांगलीतील विविध संस्थांचे आधारवड राहिलेल्या उद्योगरत्न वि. रा. वेलणकर यांच्या दानशूरतेचा आणि उद्यमशीलतेचा वारसा पुढे चालविणारे गजानन मिल्सचे मालक व दानशूर समाजसेवक रामचंद्र विष्णुपंत तथा रामसाहेब वेलणकर ९४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. १९ नोव्हेंबर १९२६ मध्ये जन्मलेल्या रामसाहेबांनी गेली ७३ वर्षे गजानन मिल्सची धुरा वाहिली आहे.अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी आपल्या कर्तबगार सुकन्यांच्या मदतीने या व्यवसाय सुरू ठेवण्याची जिद्द बाळगली आहे. चारित्र्यवान उद्योजक म्हणून त्यांचा सांगलीकरांना परिचय आहे. तीव्र सामाजिक जाणिवेने त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना नेहमीच मदतीचा हात दिला. वेलणकर अनाथ बालकाश्रम संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. साधी राहणी, चिकाटी-प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते आज नवउद्योजकांसाठी आदर्शवत आहेत. विश्‍वजागृती मंडळाच्या वतीने त्यांना सन २०१७ साली सांगली भूषण पुरस्कार यांना देण्यात आला.

Hits: 166
X

Right Click

No right click