अकौंटिंग भाग ४ - अकौंट बॅलन्सिंग

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योग Written by सौ. शुभांगी रानडे

डेटर्स - ज्या व्यक्ती वा संस्था आपल्या उद्योगाला / व्यवसायाला  काही देणे लागत असतील तर त्यांना डेटर्स ( ऋणको) असे म्हणतात.   बॅलन्सशीटमध्ये या सर्व डेटर्सचे एकूण येणे करंट असेट्समध्ये संड्री डेटर्स या नावाने लिहितात. कारण ही रक्कम प्रत्यक्ष मिळाली नसली तरी ती भविष्यात ती मिळणार असते. व्यापार्‍याने व उधारीवर माल विकला तर तर अशा सर्व सेल पार्टीज ह्या संड्री डेटर्स ठरतात.

  क्रेडिटर्स - ज्या व्यक्ती वा संस्था यांना आपला उद्योग वा व्यवसाय काही देणे लागतो त्यांना क्रेडिटर्स ( धनको) असे म्हणतात.  बॅलन्सशीटमध्ये या सर्व क्रेडिटर्सचे एकूण देणे करंट लायॅबिलिटीजमध्ये संड्री क्रेडिटर्स या नावाने लिहितात. कारण ही रक्कम प्रत्यक्ष आपण दिली नसली नसली तरी ती भविष्यात द्यावी लागणार  असते. आपण पर्चेस पार्टीजकडून उधारीवर माल घेतला तर अशा सर्व पर्चेस पार्टीज ह्या संड्री क्रेडिटर्स ठरतात.

बॅलन्सिंग ऑफ अकौंट्स - प्रत्येक खात्याला ( अकौंटला) डेबिट व क्रेडिट अशा दोन बाजू असतात. या दोन्ही बाजूच्या  रकमांच्या बेरजा करून त्या खाली लिहिल्या जातात. अकौंटिंगच्या नियमाप्रमाणे या दोन्ही बेरजा सारख्या असाव्या लागतात. या बेरजा सारख्या नसतील तर मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा केली जाते व ही वजाबाकी मोठ्या बेरजेच्या बाजूला करतात. याला बॅलन्सिंग ऑफ अकौंट्स असे म्हणतात.

जर एखाद्या अकौंटमध्ये डेबिट बाजूची बेरीज क्रेडिट बाजूच्या बेरजेपेक्षा मोठी असेल तर त्याला डेबिट बॅलन्स असे म्हणतात. याउलट जर एखाद्या  अकौंटमध्ये क्रेडिट बाजूची बेरीज डेबिट बाजूच्या बेरजेपेक्षा मोठी असेल तर त्याला क्रेडिट बॅलन्स असे म्हणतात.  या बॅलन्सचा उपयोग फायदा किंवा तोटा काढण्यासाठी केला जातो.

 ट्रायल बॅलन्स -
वरील पद्धतीने सर्व अकौंटचे बॅलन्सिंग केल्यावर या सर्व अकौंट्सच्या बॅलन्सच्या रकमा डेबिट व क्रेडिट बाजूला लिहून   ट्रायल बॅलन्सचे कोष्टक तयार करण्यात येते. ज्या तारखेपर्यंतचा असा ट्रायल बॅलन्स केला त्याची तारीखही  ट्रायल बॅलन्सच्या शीर्षकात नमूद करणे जरूर असते. उदाहरणार्थ ३१ जुलै २०१३ पर्यंतचा ट्रायल बॅलन्स.

फायनल अकौंटिंग - एका ठराविक कालमर्यादेत झालेला नफा वा तोटा काढण्यासाठी फाउअनल अकौंटिंग केले जाते. यात खालील तीन भाग पडतात.

१. ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकौंट - यामध्ये ट्रेडिंग किंवा खरेदी- विक्री प्रकारच्या व्यापारात, तसेच मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्तू निर्मिती व विक्री या व्यवहारात होणारा खर्च म्हणजे वेजेस, ट्रॅन्स्पोर्टेशन चार्जेस डेबिट बाजूला तर  विक्री किंवा सेल्स खात्याची रक्कम  क्रेडिट बाजूला मांडतात.

  ट्रेडिंग अकौंटमधील डेबिट व क्रेडिट बाजूंच्या रकमांची बेरीज करून  ट्रेडिंग अकौंटचे बॅलन्सिंग केले जाते. यात जर क्रेडिट बाजूची बेरीज डेबिट बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असेल तर येणार्‍या वजाबाकीला ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतात.

याउलट डेबिट बाजूची बेरीज क्रेडिट बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असेल तर येणार्‍या वजाबाकीला ग्रॉस लॉस असे म्हणतात.

  या  ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस ची नोंद  बॅलन्सिंगमध्ये  योग्य त्या बाजूला केली जाते.

२. प्रॉफिट लॉस अकौंट - यामध्ये व्यापाराशी थेट संबंधित असणारी खाती म्हणजे इन्डायरेक्ट अथवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्स्पेन्सेस, डिप्रिसिएशन, इन्शुअरन्स इत्यादींचा समावेश केला जातो. हे सर्व एक्स्पेन्सेस व ग्रॉस लॉस डेबिट बाजूला लिहिले जातात तर इनडायरेक्ट इन्कम प्रकारची खाती म्हणजे मिळालेले कमिशन , व्याज,  ग्रॉस प्रॉफिट इत्यादी. यांची नोंद क्रेडिट बाजूला केली जाते.

प्रॉफिट लॉस अकौंटचे बॅलन्सिंग केल्यावर जर क्रेडिट बाजूची बेरीज डेबिट बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असेल तर येणार्‍या वजाबाकीला नेट प्रॉफिट असे म्हणतात. याउलट डेबिट बाजूची बेरीज क्रेडिट बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असेल तर येणार्‍या वजाबाकीला नेट लॉस असे म्हणतात.

३. बॅलन्सशीट - यालाच ताळेबंद असे म्हणतात. बॅलन्सशीटवरून उद्योगाच्या एकूण आर्थिक स्थितीचे मूल्यमापन करता येते. यात दोन भाग असतात. एका बाजूला सर्व  असेट्स व असेट्सशी संबंधित खाती तर दुसर्‍या बाजूला लायॅबिलिटीज प्रकारात मोडणार्‍या सर्व खात्यांची नोंद केली जाते.

असेट्स मध्ये फिक्स्ड असेट्स म्हणजे जागा व  इमारत (लँड व बिल्डिंग), कारखाना (प्लँट व मशिनरी), फर्निचर यांचा समावेश होतॊ. तर करंट असेट्स मध्ये संड्री डेटर्स, कॅश इन हँड ( रोख रक्कम) व कॅश ऍट बँक ( बँकेतील रक्कम) यांचा समावेश होतो.

लायॅबिलिटीज मध्ये कॅपिटल (भांडवल), लोन (कर्ज) तसेच करंट लायॅबिलिटीजमध्ये संड्री क्रेडिटर्स यांचा समावेश केला जातो.

  नेट प्रॉफिट बॅलन्सशीटच्या लायॅबिलिटी बाजूला तर नेट लॉस बॅलन्सशीटच्या असेट्स बाजूला  दाखविले जातात.

Hits: 162
X

Right Click

No right click