अनारसे

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
पाव किलो तांदूळ, पाव किलो गूळ, पाव वाटी दूध, तळण्यासाठी तूप, ५० ग्रॅम खसखस

कृती :
तांदूळ स्वच्छ धुऊन तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालावेत. पाणी दररोज बदलावे. चौथ्या दिवशी तांदळातील पाणी पूर्ण काढून ते सावलीत सुकवावेत. नंतर मिक्सरमधून बारीक करावेत. ते सोजीच्या चाळणीने चाळून घ्यावे. चाळलेल्या पिठामध्ये गूळ किसून ते मिश्रन एकजीव करावे व परत एकदा गूळ व पिठाचे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यावे. हे मिश्रण दोन-तीन महिने चांगले टिकते. अनारसे करताना पिठामध्ये थोडेसे दूध घालून पीठ चांगले मळून घ्यावे. छोटे छोटे गोळे करून खसखशीवर थापून तुपामध्ये मंद गॅसवर तळावेत. तळताना खसखशीची बाजू वर यायला पाहिजे. थोडासा लाल झाल्यावर झाऱ्याने कढईतील तूप अनारशाच्या वरील बाजूस टाकावे म्हणजे छान जाळी पडते. तळून झाल्यावर झाऱ्यावर घेऊन तूप निथळून ताटात काढून ठेवावेत.
Hits: 542
X

Right Click

No right click