नारळी भात

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे

साहित्य :-
चार वाट्या जुने तांदूळ, एक नारळ, सहा वाट्या चांगला पिवळया रंगाचा चिरलेला गूळ, दहा-बारा वेलदोडे

कृती :
तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे. नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा. नंतर त्यात वेलदोडे, दाण्याचे काप व बेदाणे घालून, वर तूप घालून भाताला चांगली वाफ आणावी.
Hits: 448
X

Right Click

No right click