खवापुरी

Parent Category: मराठी संस्कृती Category: खाद्यपदार्थ Written by सौ. शुभांगी रानडे
साहित्य :-
दीड वाटी मैदा, पाऊण वाटी रवा, दीड वाटी खवा, दीड वाटी पिठीसाखर, दोन चमचे वेलची-पूड, तूप

कृती :

रवा व मैदा एकत्र करून, दोन चमचे तुपाचे मोहन घालून, घट्ट भिजवून, तासभर झाकून ठेवावा. रवा-मैदा कुटून घ्यावा. खवा परतून घेऊन, त्यात पिठीसाखर व वेलची-पूड घालून, चांगले मळावे. रवा-मैद्याच्या पिठाच्या लाट्या करून पातळ पुऱ्या लाटाव्या. एका वेळी दोन पुऱ्या लाटाव्या. एका पुरीवर खवा-साखरेचे सारण पसरून, त्यावर दुसरी पुरी ठेवून, कडा दाबून घ्याव्या. सर्व पुऱ्या झाल्यावर त्या तुपातून तळून काढाव्या.

 

Hits: 435
X

Right Click

No right click