शिर्डी

Parent Category: महाराष्ट्र दर्शन Category: मंदिरे Written by सौ. शुभांगी रानडे

  

संतश्रेष्ठ श्रीसाईबाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावपासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर आहे. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांचे नाव सदैव घेतले जाते असे लोकप्रिय संत सिद्ध साक्षात्कारी आणि विदेही होते. विशेष म्हणजे सर्व धर्मातील लोक श्रीसाईबाबा यांना पूजनीय व वंदनीय मानतात. श्रीसाईबाबांचे पूर्वायुष्यही फारसे ज्ञात नाही. तर्कानेच ते वर्णन करून सांगितले जाते. नाव, जात, धर्म यांचा थांग नसलेले हे संत एक चमत्कारी सत्पुरूष होते व त्यांच्या मनुष्यप्रेमी स्वभावामुळे ते लोकप्रिय ठरले.

शिर्डीला भक्तांची रोजच हजारोंच्या संख्येने गर्दी लोटते. शिर्डी इतकी लोकप्रियता इतर अन्य कोणत्याही स्थानाला क्वचितच असावी. गुरूवारच्या दिवशी तसेच रामनवमी व गुरू पौर्णिमा या दिवशी शिर्डीला भक्तमंडळीची दूरदूरहून गर्दी लोटते.

Hits: 437
X

Right Click

No right click