ज्ञानदीपतर्फे शाळांत अटल ज्ञानदीप प्रयोगसंचाची सुविधा
रासबेरी पाय हा एका पट्टीवर बसविलेला छोटा संगणक असून त्याचा उपयोग लहान प्रोग्रॅमपासून ड्रोनसारख्या स्वयंचलित रोबोट बनविण्यासाठी करता येतो. रासबेरी पाय हा एका पट्टीवर बसविलेला छोटा संगणक असून त्याचा उपयोग लहान प्रोग्रॅमपासून ड्रोनसारख्या स्वयंचलित रोबोट बनविण्यासाठी करता येतो.
हा कार्यान्वित करण्यासाठी पॉवर कनेक्शन, इंटरनेट वा वाय फाय, मॉनिटर व माऊस यांची आवश्यकता असते. मॉनिटर किंवा टीव्ही जोडण्यासाठी एचडीएमआय केबल लागते व्हीजीए पोर्ट असल्यास व्हीजीए चे एचडीएमआय करण्यासाठीची विषेश सुविधा वापरता येते. रासबेरी पायसाठी एक मायक्रो चिप माहिती व प्रोग्रॅम साठविण्यासाठी वापरली जाते,
खालील चित्रातअटल ज्ञानदीप प्रयोगसंचा जोडण्यांची माहिती दिली आहे.
स्क्रॅच व पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकविण्यासाठी याचा उपयोग करता येतो
रासबेरी पायचे प्रात्यक्षिक
स्क्रॅच प्रोग्रॅमची उदाहरणे
माईनक्रॉफ्ट हा लोकप्रिय गेम व अनेक व्हिडिओ गेमही बनविता येतात
प्रत्यक्षात अटल ज्ञानदीप प्रयोगसंचावरील इतर कनेक्शन वापरून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविता येतात.
ज्ञानदीपने मराठी भाषेतून डिजिटल शिक्षणासाठी वेबसाईट आणि मोबाईल सुविधा केल्या आहेत. आता मायक्रोसॉफ्ट, शासन वा इतर संस्थांकडून यासाठी अर्थसाहाय्य कसे मिळविता येईल याविषयी आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.ज्ञानदीपच्या या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शाळांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा.
Hits: 316