जागर मराठीचा

Parent Category: ROOT Category: वार्तापत्र Written by सौ. शुभांगी रानडे

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय सोहळा ‘जागर मराठीचा’ मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलवर रसिकांना पाहता येणार आहे.

दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी  दरम्यान नामांकीत लेखकांचे कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, मालिका, विनोदी, स्त्रीवादी, बाल साहित्य प्रवास वर्णन, विज्ञान साहित्य, कविता सादरीकरण असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व कार्यक्रमांचा दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत दररोज संध्याकाळी 4 वाजता मिती गृप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुकवर आणि युट्युब चॅनेलवर साहित्य रसिकांना आनंद घेता येणार आहे.

  • गुरुवार 14 जानेवारी 2021 (कथा) - सानिया,मिलिंद बोकील, मोनिका गजेंद्र गडकर
  • शुक्रवार 15 जानेवारी 2021 (कादंबरी)– राजन खान, अभिराम भडकमकर, शिल्पा कांबळे
  • शनिवार 16 जानेवारी 2021 (स्त्रीवादी साहित्य)– सिसिलिया कार्व्हालो, नीरजा, प्रज्ञा पवार
  • रविवार 17 जानेवारी 2021 (नाटक)– श्रीरंग गोडबोल, प्रसाद कांबळी, मनस्विनी लता रवींद्र
  • सोमवार 18 जानेवारी 2021 (चित्रपट)– महेश कोठारे, श्रावणी , समृद्धी पोरे
  • मंगळवार 19 जानेवारी 2021 (मालिका)– अजय भालवणकर, शिरीष लाटकर, मुग्धा गोडबोले, अभिजित गुरु
  • बुधवार 20 जानेवारी 2021 (विनोदी साहित्य)– मंगला गोडबोले, श्रीकांत बोजेवार
  • गुरुवार 21 जानेवारी 2021 (बाल कुमार साहित्य)– राजीव तांबे, शुभदा चौकर
  • शुक्रवार 22 जानेवारी 2021 (प्रसावर्णन)– राजेश्वरी किशोर, संदीप श्रोत्री
  • शनिवार 23 जानेवारी 2021 (विज्ञान साहित्य)– सुबोध जावडेकर, डॉ. बाळ फोंडके
  • रविवार 24 जानेवारी 2021 (कविता सादरीकरण) (कविता त्यांची !कविता आमची !!)– प्रवीण दवणे, डॉ. दिलीप पांढरपट्टे, अनुपमा उजगरे
  • सोमवार 25 जानेवारी 2021 (आत्मचरित्र)– उर्मिला पवार, ऐश्वर्य पाटेकर
  • मंगळवार 26 जानेवारी 2021 (प्रकाशन क्षेत्र)– मॅजेस्टीक प्रकाशनाचे – अशोक कोठावळे शब्दालय प्रकाशनाच्या – सुमती लांडे, पॉप्युलर प्रकाशनाचे – हर्ष भटकळ
  • बुधवार 27 जानेवारी 2021 (ऐतिहासिक साहित्य)– विश्वास पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे
  • गुरुवार 28 जानेवारी 2021 - कविता,गाणी आणि अभिवाचनांच्या साथीने मराठी भाषेची महती सांगणारा अविस्मरणीय सोहळा,(बोलतो मराठी)  गायक – नचिकेत देसाई आणि धनश्री देशपांडे, अभिनेत्री – कविता लाड, अभिनेता – आनंद इंगळे

 

 

Team DGIPR | जानेवारी 13, 2021 येथे 8:33 pm | Tags: जागर मराठीचा | Categories: वृत्त विशेष | URL: https://mahasamvad.in/?p=29440
Hits: 226
X

Right Click

No right click