८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, महाबळेश्वर

८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजित केले होते. अध्यक्ष म्हणून आनंद यादव यांची निवड झाली होती. समाजाच्या असहिष्णू वृत्तीमुळे हे संमेलन अध्यक्षाविना घेण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली. अध्यक्षांविना पार पडलेले एकमेव संमेलन अशी या संमेलनाची नोंद झाली. आनंद यादव यांनी त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकारामांचे विपर्यस्त चित्रण केले असल्याचा वाद याकाळात निर्माण झाला. कादंबरी आधीच प्रकाशित झाली होती. मात्र लोक जणू काही यादव अध्यक्ष होण्याची वाट पाहत असावेत. या प्रश्नामुळे मोठा धुमाकूळ माजला. आनंद यादव यांनी माफी मागितली. प्रकाशकांनी कादंबरी मागे घेतली. एवढ्यावर लोकांचे समाधान झाले नाही. त्यांनी संमेलन उधळून लावण्याची भाषा कायम ठेवली. त्याचे पर्यवसान आनंद यादव यांच्या राजीनाम्यात झाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न आणि समूहांच्या भावनादुखीच्या अस्मितांची टोके किती तीव्र आणि गढूळ झाली आहेत, याचे प्रत्यंतर या घटनेत आहेत.

Hits: 95
X

Right Click

No right click