७७. औरंगाबाद २००४ प्रा. रा. ग. जाधव

इंग्रजीच्या मृगजळामागे म्हणा किंवा सुवर्णभूमीकडे म्हणा, मराठी समाजच धावू लागल्याचे दिसते. मराठीबाबतची सर्वंकष उदासीनता, आळस, निरंकुश वृत्ती यांना त्वरित आवर घातला पाहिजे. सगळ्या भाषा व्यवहारात संस्कारभाषा, साहित्यभाषा व ज्ञानभाषा म्हणून मराठीचेच मोल केवढे मोठे ठरते, हे ठसठशीतपणे पटवून देणे निकडीचे आहे. मराठी समाजाने यासाठी स्वयंस्फूर्तीने एक विविधस्तरीय भाषिक चळवळच खरे तर सुरू केली पाहिजे. आपली भाषा हरविणारा समाज स्वत:ला हरवून बसण्याची नियती टाळू शकत नाही. आपली मराठी भाषिकता टिकविणे हे स्वयंसिद्ध सांस्कृतिक मूल्य आहे आणि ते आज-उद्याच्या बहुभाषिक - बहुसांस्कृतिक विश्व व्यवस्थेशी सुसंगतही आहे.

Hits: 380
X

Right Click

No right click