Designed & developed byDnyandeep Infotech

७०. अहमदनगर १९९७ ना. सं. इनामदार

Parent Category: साहित्य संमेलने

नव्या ऎतिहासिक कादंबर्‍यांतून   जे मानवी जीवनाचं चित्रण केलेलं असतं ते त्या त्या वेळी या जगात वावरणार्‍या हाडामांसाच्या मानवाच्यासंबंधातलं असतं. आज आपण या भूतलावर वावरतो आहोत. वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत झगडत जीवन जगतो आहोत. तसंच गतकालीन वास्तवातील जीवन एकेकाली घडत होतं आणि निसर्गक्रमानुसार बदलतही होतं. मानवी जीवन प्रवाही आहे हे आपण एकदा ध्यानी घेतलं म्हणजे त्या प्रवाहातल्या एका भागाला गतकाल म्हणून संबोधल्याने एकूण जीवनात गुणात्मक फरक पडत नाही. वर्तमानकाळाला जसा भूतकाळ भिडलेला असतो तसा भविष्यकाळही असतो, आणि गतकाळाला त्याचा वर्तमानकाळ आणि भूतकाळही असणार हे उघड आहे. त्या त्या काळात माणसं पूर्वीच्या आणि नंतरच्या काळाचा विचार करीत असणार. हे नीट समजून घेण्यासाठी वर्तमानाचा भूतकाळ आणि भूतकाळाचा वर्तमान काळ याचं भान समतोल मनानं ठेवलं तर जीवनाचं हे कोडं उलगडणार आहे. ऎतिहासिक कादंबरीचे हे जीवित कार्य आहे.

X

Right Click

No right click