६०. मुंबई १९८८ - विश्राम बेडेकर
Category: संमेलने ५१-६०
काव्य हा सर्वोत्तम कलाप्रकार आहे असे जर्मन तत्वज्ञ हेगेल यांचे मत आहे. साहित्याला शब्दांचे वरदान असते. हे शब्द सत्याचे, शिवाचे व सौंदर्याचे स्वरूप अधिक स्पष्टपणे जाणवून देऊ शकतात. उत्कृष्ट कलेच्या निर्मितीसाठी कलावंतास, साहित्यिकास पूर्वीच्या, समकालीन साहित्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. यासाठी मोठेच सारस्वत तप लागते. अशा तपाने सिद्ध झालेली कला जीवनात वरदन ठरते. भावनामयी प्रज्ञेमुळे कलेस सामर्थ्य येते.
Hits: 334