५६. रायपूर १९८१ डिसें. गंगाधर गाडगीळ
Category: संमेलने ५१-६०
प्रत्येक लेखक स्वत:च्या अनुभवातून साहित्य निर्माण करतो. बोलीभाषेत लिहिलेले साहित्य अत्यंत सामर्थ्यसंपन्न असते. भाषा ही कृत्रिम वा नैसर्गिक असे एकदम ठरवून टाकता येत नाही. पूर्वी जे लिहित नव्हते, मूक होते, ते आता आपले अनुभव लिहून दाखवीत आहेत त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध होत आहे. फक्त त्यात बहिणाबाईंप्रमाणे सच्चेपणा हवा. नाटकाच्या क्षेत्रात मरगळ जाणवते तीच मरगळ विनोदी लिखाणात. विनोद हा अनुभवातून निर्माण व्हावा लागतो. तो ठराविक साच्यात तपशील ओतून निर्माण करायचा नसतो.
Hits: 350