५४. १९८० बार्शी - गं. बा. सरदार
Category: संमेलने ५१-६०
साहित्यिक म्हणून समाजाशी आपले काही नाते आहे याची जाणीव ठेवून आपल्या वाङ्मयीन माध्यमाच्याद्वारे आपली सामाजिक जबाबदारी तन्मयतेने व समर्थपणे पार पाडणे म्हणजेच सामाजिक बांधिलकी होय. साहित्य दोन प्रकारचे असते. विचारप्रधान व कलात्मक नवनिर्मितीला प्राधान्य देणारे. . विचारप्रधान लिखाण सामान्य वाचक वाचत नाही. सामान्य वाचकाला मनोरंजन स्वरुपाचे लिखाण अधिक भावते. ललित साहित्यापासून हॊणारा आनंद केवळ आकृतिसौंदर्याचा असत नाही. तर त्याच्या आशयाची अपूर्वता, मौलिकता व अंत:संगती यांचाही आल्हाददायकेत प्रमुख वाटा असतो. ललित साहित्याच्या आशयात सामाजिकता ओतप्रोत भरून राहिलेली असते. भाषा म्हणजे नुसते शब्द नव्हेत तर शब्दांच्या साहायाने आपल्या अंत:करणातील आशय प्रकट करण्याची धाटणी वा शैली म्हणजे भाषा होय.
Hits: 416