४०. १९५८ मालवण कवी अनिल

कवी अनिल उर्फ आ. रा. देशपांडे - महाराष्ट्राचे एक राज्य निर्माण झाले पाहिजे. शास्त्रे, विद्या, कला, साहित्य इत्यादीनीच संस्कृती घडविली जाते, पोसली जाते व वाढते. कला आणि साहित्य यांच्या निर्मितीच्या मूळ प्रेरणा चेतन, अधोचेतन आणि निश्चेतन अशा तिन्ही प्रकारच्या मनातून येत असतात. त्यांना साहित्यातील दुर्बोधता आणि विफलता त्याज्य वाटते. कलेसाठी कला, सौंदर्यासाठी सौंदर्य, साहित्य आणि कला म्हणजे केयळ सौंदर्याविष्कार अशा तत्वांचा हिरिरीने पुरस्कार. आधुनिक यंत्रयुगाने मानव्याची जी भयाण व भेसूर दुर्दशा उडविली आहे तिचा आम्ही स्वनुभवात्मक व सौंदर्यपूर्ण आविष्कार करतो.

Hits: 427
X

Right Click

No right click