३७. १९५४ दिल्ली - लक्ष्मणशास्त्री जोशी

 

पंडित नेहरूंचा आशीर्वाद लाभलेले, भारतीय संघराज्याच्या राजधानीत भरलेले हे पहिले संमेलन ! लक्ष्मणशास्त्री जोशींच्या मते साहित्य किंवा ललितकला हा मानवी संस्कृतीचाच आविष्कार असतो. विद्या व व्यावहारिक अनुभव आत्मसात केल्यावरच संस्कृती कलेच्या व साहित्याच्या कळ्या धरते. जीवनाची सहजरीतीने उमलणारी ती फुले आहेत. ती स्वत: सिद्ध व रमणीय असतात यात शंका नाही. स्वतंत्र सृजनशीलता हे मानवी संस्कृतीचे पहिले गृहीतकृत्य होय. स्वत:ला व निसर्गाला बदलल्याशिवाय मानवी आस्तित्व टिकाव धरूच शकत नाही. नैसर्गिक स्वरूपातल्या ईश्वरसृष्ट विश्वावर संस्कार करून माणसास ते सुधारावे लागते. देवाने दिलेला देह किंवा निसर्ग सुधारण्याची क्रिया म्हणजे संस्कति-निर्मिती. ह्या जगातील न्यूनतेचा परिहार करणे व त्याला अधिक उदात्त रूप देणे ही संस्कृतीची प्रक्रिया होय. संस्कृतीचा विकास हा संस्कृतीच्या स्थैर्यावर अवलंबून असतो

Hits: 405
X

Right Click

No right click